वास्तूशास्र – रत्ने

पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्‍नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्‍नांचा उल्लेख नवरत्‍ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणाऱ्या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्‍न वापरण्याचा सल्ला देतात. चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांनाच ज्योतिषी नवग्रह मानतात.

१) माणिक – हे रवी (सूर्य) या ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न डाळिंबी रंगाचे असते. क्वचित गर्द लाल रंगाचे असते. हे वापरल्याने मन उल्हासीत होते. जे लोक राजकीय क्षेत्रात काम करतात तसेच सरकारी अधिकारी आहेत त्यांनी आपल्या भाग्योदयासाठी हे रत्न वापरावे.

२) मोती – हे चंद्र या ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न पांढरे शुभ्र किवां किंचित गुलाबी, निळसर झाक असलेले असते. चंद्र हा मनाचा कारक असल्याने वेडे, मंदबुद्धी, मानसिक अस्वस्थ, मानसिक चांचल्य असणाऱ्या माणसांनी हे रत्न वापरावे. याचा फारच चांगला उपयोग दिसून आलेला आहे. कुठल्याही क्षेत्रात खुप कष्ट करूनही नेहमी अपयश पदरात येत असेल त्यांनी मोती हे रत्न चांदी मध्ये उजव्या हाताच्या करंगळीत वापरावे. (हि रत्ने सिद्ध करून मगच वापरावी)

३) पोवळे – हे रत्न मंगळ या ग्रहाचे आहे. हे रत्न लाल किंवा नारंगी रंगाचे असते. माझ्या मते विशेष गर्द रंगाचे पोवळे वापरू नये. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडू करिता हे रत्न फायदेशीर ठरते. दृष्ट लागू नये यासाठी स्त्रिया आपल्या मंगसुत्रात सौभाग्याला दृष्ट लागू नये नये यासाठी पोवळे घालतात. (वापरण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला आवश्यक)

४) पाचू – बुध या ग्रहाचे रत्न आहे. याला पन्ना किवा मस्तक असे पण नाव आहे. हे रत्न हिरवट किंवा हिरवें असते. या रंगाचा रंग जितका गर्द तितके हे उत्तम समजले जाते. बुधाचे हे रत्न बुद्धीचे कारक समजले जाते. मेंदूला पुष्टीवर्धक व स्मरणशक्ती वाढवणारे आहे. उन्माद, फेपरे हे रोग बरे होण्यास मदत होते. बुध हा ग्रह लिखाणाचा आणि व्यापाराचा कारक असल्याने साहित्य क्षेत्रातील लोक तसेच व्यापारी वर्गाला मदत होते.

५) पुष्कराज – हे गुरु या ग्रहाचे रत्न आहे. हे सामान्यतः पिंगट रंगाचे असते. त्यात हिरवट, लालसर, पान्ध्र्की झलक असते. हे रत्न वापरल्याने घरातील अस्वस्तता कमी होते. सांपत्तिक स्तिती सुधारते, गृह्कलह कमी होतात. हे रत्न अध्यापक, शिक्षक, संशोधक, लेखक यांना हे फार फलदायी ठरतात. पुष्कराज हे रत्न लाभत नाही असे सहसा होत नाही. पुष्कराज हे रत्न सोन्यामध्ये उजव्या हातात तर्जनीत वापरावे.

पन्नाअहवाकरंडजहरमोरादांतला
हिराअबरीगौरीझरणाधुनेला
मोतीअमलीयागुदडीडूरनरम
पुष्कराजअलेमानीगौंदताटेडीपृनधूम
माणिकओपेलगौंदतीतामडापितोनिया
मुंगाउदाऊचकमकतीलीयरपारस
लह्सुनियाएमोनोचित्तीतुरमलीफिरोजा
निलमकतैलाचुंबकतुरसाचाफिटेक
गोमेदककुदरतजबरजददारचनाबासी
अजुबाकसौटीजजेमानीदानफिरंगबेरुंज
कासलाकहरुवाजराहतदूरेनजफमरगज
मकडीमरियममाखरमुसामूवे नजफ
यशबरात स्तुवालालडीलाजवर्तलुधिया
लासबसरीसंग सितारासंग सिमाकसुलेमानी
संगेसुनेहलासिंदुरियासीवारसिंजोरी
संगीयासिफरीसोहनमाशीसुरेमासिंगली
स्फटिकहकीकहदीदहजरते बेर

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: