खोलवर विचार करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो?

खोल विचार ही प्रक्रिया एकाच एक व्याख्येत बसवता येणार नाही. शालेय शिक्षण, करियर, व्यवसाय या बाबतीत खोल विचार बर्‍याच अंशी यशस्वीतेशी निगडीत आहे. असा विचार करता येत असून त्याचा कंटाळा येणं आणि त्याचा परिणाम म्हणून सुमार यश मिळाल्यावर आपल्यामध्ये ही क्षमता नाही असा विचार काहींच्या मनात येतो पण खोल विचार हा त्यासाठी लागणारा वेळ किंवा विचारप्रक्रियेचे सातत्य यावर अवलंबून नसून त्या क्षणापर्यंत चिंतनिय विषयाबद्दल उपलब्ध असलेल्या ज्ञांनावर विश्वास असण्याचा किंवा नसण्याचा आहे.

Deep thinking किंवा खोलवर विचार करण्याची क्षमता प्रत्येक सजीवाकडे आहे पण तशी ती दर्शविली किंवा वाढवली जात नाही कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे उपलब्ध ज्ञांनावर आपला विश्वास असतो किंवा आपली गरज विनासायास भागत असताना वेगळ्या दृष्टीकोणातून, वेगळ्या गृहीतकातून, वेगळ्या मांडणीतून निष्कर्ष तोच निघेल असा अनुभव, भीती किंवा खात्री असते. आपली एकूणच शिक्षण पद्धती खोल विचारांना डोळ्यापुढे किंवा अपेक्षित ठेऊन आखलेली नसून केवळ पाठांतर आणि जुजबी विषय प्रवेशावर गुणवत्तेचे आभासी निकष निश्चित करणारी आहे त्यामुळे ही क्षमता चुकीच्या पद्धतीने मोजली जात असून ती वाढवायची म्हणजे मुळात कमी आहे, होती किंवा अजिबात नव्हती असं गृहीत धरावं लागतं.

वाचन, चिंतन, मनन, शोध, संशोधन,प्रयोग आणि निष्कर्ष हे उपलब्ध ज्ञानाचे टप्पे असून हे निष्कर्ष विविध विषयांसाठी अजूनही आव्हान म्हणून उभे आहेत. शंका किंवा आक्षेपांचे निरसन ही खोलवर विचारांची पार्श्वभूमी असेल तर वादातीत निष्कर्षापर्यंत पोचणे हे त्याचं उद्दीष्ट आहे. कुठल्याही कारणाने किंवा साधनाने ते सहज पुरं होत असेल तर त्याची सिद्धता deep thinking नाही असा दावा करता येणार नाही. कार्यशून्यतेकडे नेणारं तर्कशास्त्र म्हणजे खोलवर विचार नव्हे. खोल विचार म्हणजे घटनेच्या, प्रश्नाच्या किंवा कल्पनेच्या गाभ्यापर्यंत पोचणारा विचार. मूळचा प्रश्न किंवा उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्या सम्यक ज्ञांनासाठी जे अनावश्यक अडथळे किंवा विषयबाह्य आवरण आहे ते साधार, सप्रयोग दूर करणं हे खोल विचारांशी निगडीत आहे आणि ते साध्य करण्याची क्षमता वाढवणे म्हणजे खुद्द आपणच असलेल्या क्षमतेच नव्याने ज्ञान करून घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच त्याची कमी-जास्त गरज भासणे हे ती क्षमता कमी-जास्त ठरवण्याच प्रमाण सर्वसामान्यपणे गृहीत धरलं जाईल.

तत्वज्ञानी, मनोवैज्ञानिक किंवा भौतिक सुखवादी ज्या प्रश्नांना किंवा कल्पनांना आपआपल्या विचार किंवा प्रयोगशीलतेच्या कक्षेत आणत असतात त्यात विचारांची किंवा बुद्धीची किमान सर्वसाधारण पातळी सञुक्तपणे घट्ट धरून ठेवलेल्या लोकांना निरर्थक झटापटीचा आटापिटा वाटत असतो पण तेच निकष सर्वसामान्य जीवन कलहांना लावायचे ठरवले तर घटनांची किंवा विचारांची पूर्तता आणि सातत्य यांची अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंग हे दोन्ही खोलवर विचर न करताही आपोआप साधले जात असल्याने, त्यात मुद्दामहून विचारही न करण्याइतपत विस्मृती झालेली असते. हा खोल विचार म्हणजे काहीतरी प्रयत्नपूर्वक केला तरच अस्तीत्वात असल्याचा भ्रम आपल्याला होत असल्याने ही क्षमता वाढवण्यासाठी फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. तर्कशास्त्राशी विपरीत, अनुत्तरित पण निर्विवाद अनुमान असलेले असंख्य विचार किंवा प्रश्नांचा नियतीशी संबंध जोडून अधिक प्रयत्नांकडे पाठ फिरवल्याने deep thinking ची क्षमता एकाच विशिष्ट बिंदुपर्यंत गोठली गेली आहे अशीही आपली एक समजूत होते आणि तिला कदाचित निष्फळ पण आव्हाने देत राहण्याने ही क्षमता अधिक वरची पातळी निःसंशयपणे गाठेल. Deep thinking, खोल विचारांची क्षमता वाढवण्यासाठी अंतर्मुख होण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. आपल्या अभ्यासातून, विचार मंथनातून, अंनुभावातून आपल्याला जे काही मिळालं आहे त्याच्या मुळाशी, गाभ्याशी जाण्यासाठी स्वतःच स्वतःला आणखी प्रश्न विचारण्याची गरज आहे. जमावपासून स्वतःला वेगळं ठेवून, निर्द्वंद्व, निर्विकल्प, निःशंक मनोव्यापार करण्याची सवय लावली पाहिजे. निरुत्तर होणं हा खोल विचारांचा सर्वात मोठा पराभव आहे.

खोल विचार स्वामताच्या चिकीत्सेसाठी वापरला गेला पाहिजे. आपलं मत चुकीचं ठरलं किंवा बरोबर आलं तरी त्यामुळे विचार प्रक्रियेला अधिक गती किंवा सूक्ष्मावस्था मिळत गेली पाहिजे. त्यासाठी वाद संवाद, चर्चा, श्रवण, वस्तुस्थितीची विविधांगी जाणीव, पूर्वानुभवाचे विश्लेषण किंवा त्यावर विश्वास, निष्कर्षा बाबत साशंकतेची अवस्था, उपलब्ध साधने किंवा पुराव्यांची पुनर्रचना किंवा पुनर्मांडणी यासाठी मान्यता अंगी बाणवली पाहिजे. आपल्या भावना, अपात्र अभिमान, अहंकार, गर्व, आपलं ममत्व, वात्सल्य यांना deep thinking मध्ये थारा देता कामा नये. कारण सोईस्कर अर्थ काढून स्वमताच्या आग्रहाचा हेकटपणा संभवतो. खोलवर विचार करून बदल घडवून आणण्यात कायद्यांमुळे (परंपरांमुळे ) येणारे अडथळे करणीभूत ठरतात कारण निसर्ग क्रमाने वस्तुस्थितीत होणारे परिवर्तन त्यात बहुदा गृहीत धरलेले नसते पण सद्य स्थितीत अंतिम परिणाम किंवा निष्कर्ष परंपरा फक्त समोर मांडलेले पुरावे किंवा वस्तुस्थिती यांवर ठरवत असते पण त्याची अतार्किकता deep thinking ने सिद्ध केली तरी तिचा स्वीकार करत नाही. पण अपेक्षित बदल करण्यासाठी केलेला खोलवर विचार, ग्राह्य मानून त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा वजा सूचना करत असतो आणि म्हणूनच परंपरांमध्ये होणार्‍या बदलांना एका अर्थाने करणीभूत देखील होतो.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: