दृष्टी..
मराठी स्क्रॅप – नक्की वाचा ही गोष्ट… आणि आवडल्यास शेअर करा…!!!
एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला…
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही…
तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत….
गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.
.
.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला…
.
.
.
खिचात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर पडतो.
.
.
त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
.
.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.
.
.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
.
.
“मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक दमडादेखील नाही, पण माझ्याकडे कला आहे, माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे…. ती मी तुला देउ शकतो…
तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?”
.
.
“साहेब” भिकारी म्हणतो ”
माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही… मी एक गरीब आंधळा भिकारी… तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा.”
.
.
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
.
.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की,
एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू लागलाय.
.
.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते…
.
.
तो भिकारी बेचैन होतो… नाण्यांची रास वाढतच जाते…
.
.
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो “साहेब माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल… मी एक गरीब आंधळा भिकारी आहे…
मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील.”
.
.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो…
.
.
.
.
“वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी, आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.”
.
.
.
.
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
.
.
.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?
या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी?
कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं??
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल… माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात … पण “काय बोलावे” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते…
ओढ म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही…..
प्रेम म्हणजे काय ते स्वतः
केल्याशिवाय कळत नाही…..
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही…..
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग
झाल्याशिवाय कळत नाही…..
सुख म्हणजे काय ते दुसर्यांच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही…..
समाधान म्हणजे काय ते आपल्यात
शोधल्याशिवाय कळत नाही…..
मैत्री म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही…..
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही…..
सत्य म्हणजे काय ते डोळे
उघडल्याशिवाय कळत नाही…..
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न
पडल्याशिवाय कळत नाही…..
जबाबदारी म्हणजे काय हे त्या
सांभाळल्याशिवाय कळत नाही…..
काळ म्हणजे काय हे तो निसटून
गेल्याशिवाय कळत नाही…..
मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की,
माझ्या मृत्यूनंतर मी कमावलेली संपत्ती मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही,परंतु मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई असेल…
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)