परी
मी कुठे म्हणालो ‘ परी’ मिळावी
फक्त जरा ‘बरी’ मिळावी,
प्रयत्न मनापासून आहेत मग
किमान एक ‘तरी’ मिळावी!!
स्वप्नात तशा खूप भेटतात
कधीतरी खरी मिळावी…
हवीहवीशी एक जखम
एकदातरी उरी मिळावी!!
गालावर खळी नको तिच्या
फक्त जरा हासरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी!!
मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी…!!!
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)