तू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”
डॉ. प्रकाश बाबा आमटे – दि रियल हिरो हा चित्रपट महान समाजसेवक बाबा आमटे मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
या चित्रपटातील ही एक श्रवणीय अशी प्रेरणादायी प्रार्थना,
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
गीतकार : गुरु ठाकूर,
गायक : विभावरी आपटे,
संगीतकार : राहुल रानडे ,
गीतसंग्रह/चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)
For mp3 Song – Click Here
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)