WhatsApp च्या पोतडीतून… भाग ३

Happy Thoughts through Whatsapp…

आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही.!
मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसुन खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.
आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.!

तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाने आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.
जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैशे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैशे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते.
एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या.

आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा.
हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो नं..

“आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो,
पण माथ्या आड गेलेला “जिवलग”
परत कधीच दिसत नाही” ………..
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.”

🌹

º•○●º•○●º•○●º•○●º•○●

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: