सक्सेस – बेस्ट ऑफ़ नेपोलियन
नेपोलिअन हिल (ऑक्टोबर २६, इ.स.१८८३ – नोव्हेंबर ८, इ.स.१९७०) एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक. थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधीक खपाच्या पुस्तकाचे मुळ लेखक. स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे प्रणेते.
सक्सेस – बेस्ट ऑफ़ नेपोलियन हिल या पुस्तकातील काही निवडक महत्वाची यशाचे तत्व पुढे देत आहे.

1. दोन किंवा अधिक मने सुसंवादी पद्धतीने एका निच्छित हेतुपुर्तिसाठी संयुक्तपने कार्य करतात, त्या संयुक्त मनाला मास्टर माइंड म्हणतात.
2. यशाची सुरवात तीव्र इच्छेतुन होते.
शक्तिप्रेरके:
• आत्मरक्षनाची तीव्र निकड
• लैंगिक संबंधा विषयी तीव्र आसस्क्ति
• पैसा मिळव्ण्याची तीव्र इच्छा
• पुनर्जन्माची तीव्र आसक्ति
• शक्ति ताकद प्रसिद्धि
• प्रेम
• बदला ( अविकसित मनाचा एक गुण)
• अहं पणा कड़े जाण्याची इच्छा
या आठ प्रेरक उत्तेजना बल विक्रय कला साठी सुद्धा उपयोगी ठरतात जर मोठ यश मिळवायच असेल तर मनामधे अत्यंत प्रबल अशा प्रेरणेचे बीजारोपण करा
3. एक निच्छित घ्येय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे यांच नुसत ज्ञान जरी माणसाला झाल, तरी तो एक नवमान्शा इतका यशस्वी झालेलाच आहे अस म्हणायला काहीच हरकत नाही.
4. यशस्वी होण्यासाठी स्वतावर आत्मविश्वास असायला हवा. स्वतातल्या गुण दोषाची यादी करा त्यापैकी उपयोगी आणि सशक्त असे गुण निवडून एक निच्छित आराखडा बनवा.
5. टिकेची, अनारोग्याची, गरिबिची,वार्धक्याची, मत्सराची आणि मृत्यूची भीती या 6 भीतिवर विजय मिळवा म्हणजे आत्मविश्वास वाढेल आणी यशस्वी व्हाल.
6. तुमची मिळकत किती आहे हे फारस महत्वाच नाही. तुम्ही यातला किती भाग कसा बचत करता हे महत्त्वाच आहे.
7. तत्पर , ठाम आणि योग्य निर्णय घेण्याचे नेतृत्व आणि पुढाकार असावा. गप्पा नको , कृति हवी
8. माणसाच्या मनामधुन निघालेले अत्यंत फायदेशीर उत्पादन म्हणजे नवकल्पना आणि त्यांची निर्मिती कल्पनाशक्ति मधून होते. तसेच हे उत्पादन विकण्यासाठी उत्कृष्ट विक्रीकला आवश्यक असते.
9. जी माणसे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात ती माणसे यशस्वी व्हायला फारसा वेळ लागत नाही. त्यात त्याना कमालीचा उत्साह मिळत असतो. मनाला संगीत तसेच वर सांगितलेले शक्ति प्रेरके सुद्धा उत्साह प्रदान करतात.
10. आपल्या भावनांवर नियंत्रण स्व – नियन्त्रण असावे मुख्य करून रागावर.
11. नेहमी मिळणार्या मोबद्ल्यापेक्षा जास्त सेवा देण्याची सवय ठेवावी.
12. प्रसन्न व्यक्तिमत्व असावे ज्याचे मुख्य घटक पुढील: हस्तांदोलन , देहबोली, कपड्यांची निवड, आवाज त्याची पट्टी, दर्जा, मृदुता, समतोल, निस्वार्थीपणा, हावभाव, ठाम छाप पाडणारे विचार, उत्साह, प्रामाणिकपणा, चुम्बकत्व, शब्दांची निवड, उद्दिष्टान्साठी कळकळ आणि उत्साह..
13. एखादी वस्तुस्तिथि लक्षात आली की तीच दोन वर्गामधे वर्गीकरण कराव, आयुष्याचा ध्येय प्रत्यक्षात आणण्यास महत्त्वाची आणि बिन महत्त्वाची किंवा सम्बंधित नसलेली वस्तुस्थिति.
14. आपले कार्य फक्त मन लावून करा त्यामधे आपल्या ह्रदयाची आणि आत्म्याची देखील उर्जा केन्द्रीभूत करा. एकाग्रतेने निच्छित उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते कार्य तडीस न्या!
15. आपल्या क्ष्रेत्रात अमाप यश मिळवायच असेल तर आपल्यासोबत काम करनार्यांच सहकार्य मिळन तसेच इतर कंपन्यांच सहकार फार अत्यावश्यक असत.
16. इतरांवर वाईट परिणाम होइल अशा कुठल्याही कामात सहभागी होवू नये.
17. जी विधाने सत्य नाहित असा विश्वास आहे ती कधीच बोलू नये.
18. जास्तीत जास्त माणसांच्या भल्यासाथी जी सेवा देता येइल तीच सेवा देण्याचा कळकळीने प्रयत्न करावा.
19. पैशापेक्षा माणसाना जास्त महत्त्व द्याव.
20. ज्यांच्यावर आपण कृपा केली नाही त्यांच्याकडून कृपेची अपेक्षा पण ठेवू नये.
21. हक्क असल्याशिवाय मागु नये.
22. अत्यंत शुल्लक कारणासाठी वाद घालू नये.
23. फुकटचा सल्ला देवू नये.
24. लोकांकडून काम करून घेण्यासाठी खुशामत करू नये.
25. अपयश किंवा संकटा पासून दूर न पळता अनुभवाने त्याचा हिशोब पूर्णपने चुकता करूँन यश गाठावे.
26. सहनशीलता अंगी बाळगावी.
27. समान गोष्टी परस्परांना आकर्षित करतात..तुम्ही जे पेराल तेच उगवते.
28. आरोग्यदायी आहार, योग्य व्यायाम , उपवास, डायटिंग करावे.
29. नशिबाला दोष देवू नये, परिस्थिति गेली खड्यात मी मला हवी तशी परिस्थिति निर्माण करू शकतो असा विश्वास असावा.
30. मानवाला मिळनारे यश हे केवळ मनाची अवस्था आहे, तुम्हाला हव आहे ते प्रथम तुमचे विचार तुमच्याकडे खेचून आणतात.
31. एखाद्याच्या मनात एका चांगल्या विचाराचे बी पेरने हे त्याचे उनेदुने काढणारे भरपूर लोक असतात त्यांच्या तुलनेने कितीतरी मोठे कार्य आहे.
(साभार – मन माझे /लेखक /कवी)