माकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला..
माकड म्हणलं जीवनाचा
कंटाळा आला
पृथ्वीवर काहीतरी
घोटाळा झाला
माकडाचा दोस्त म्हणला
येड्यावणी करू नको
माणसाचे रोग
आपल्यात आणू नको
आपल्यात कुठं जीवनाचा
कंटाळा येत असतो का ?
आपण कधी एकेठिकाणी
मुकाट्यानं बसतो का ?
पहिल्या सारखे माणसं आता
का हासत नसतील
पारावर , वट्यावर
निवांत कधी बसतील ?
दुसरं माकड म्हणलं येड्या
माणूस झाला प्रगत
पहिल्या सारखं हसून खेळून
आता नसतेत जगत
काय राव याला कुठं
विकास झाला म्हणतेत का ?
मार्क कमी पडले म्हणून
लेकराला हाणतेत का ?
माकड म्हणलं लहानपणी
पोट्टे माघ लागायचे
शाळागीळा सगळं सोडून
आपल्या बरोबर हिंडायचे
माकडाचा दोस्त म्हणला
आता तसं नसतं
आय टी आय होणाऱ्याला
आय आय टी व्हायचं असतं
चित्रकला , संगीत , नाट्य
सगळं आलं पाहिजे
एवढं करून ते पुन्हा
मेडिकलला गेलं पाहिजे
अरे बाबा माणसां मध्ये
शिक्षण पाहिजे असतं
त्यांना म्हणे सगळ्यात जास्त
संस्कारित व्हायचं असतं
कुणाला व्हायचंय श्रीमंत
कुणाला बांधाचाय बंगला
ताच्यामुळं आजकाल माणूस
बघ नं कसा खंगला
गाय म्हैस कुत्रं गाढव
काहीच बदललं नाही
माणसां मधे पहिल्या सारखं
काहीच राहिलं नाही
प्रगती झाली म्हणावं तर
फाशी कामुन घेतेत
आपल्या सारखंच दातं इचकून
अंगावर धावून जातेत
माकडाचा दोस्त म्हणला
आपल्याला काय करायचं
आपण आपलं मस्त पैकी
उड्या मारीत फिरायचं
दोन्हीही माकडांनी
गळा भेट घेतली
दोघांनीही एकमेकाला
सारखीच शप्पथ घातली
दोस्ता पुन्हा जीवनाला
कंटाळायचं नाही
सारखं सारखं माणसां मधे
मिसळायचं नाही…
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)