चांगली व्यक्ति कशी ओळखावी?
व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात). चेहर्याचे सौन्दर्य, वेशभूषा, शरीराची प्रमाण बद्धता, सौन्दर्य प्रसाधंनांचा वापर यावरून व्यक्तीच्या चांगले वाईट पणाची कल्पना केली जाते. बहुतांशी ती चुकीची निघते हा भाग वेगळा पण…
व्यक्तीगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर एकाच व्यक्ति प्रसंगानुरूप चांगली वाईट असू किंवा ठरू शकते. आपला पैसा, शिक्षण, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचा वापर योग्य वेळी, योग्य काली, योग्य स्थळी करणारी व्यक्ति सर्व साधारणपणे चांगली या सदरात मोडते.
अचूक निर्णायशक्ती आणि पारख याबाबतीत जी व्यक्ति पारंगत असेल ती चांगली व्यक्ति म्हणवून घेण्यास पात्र आहे कारण गरजवंत कोण हे ठरवता येत नसेल तर हा चांगुलपणा बहुदा वाया जाण्याची पर्यायाने काहींच्या नजरेत हा चांगुलपणा व्यक्तीच्या चांगुलपणाशी निगडीत राहत नाही.
आपली चूक प्रांजळपणे काबुल करून माफी मागण्याची आणि दुसर्याच्या चुकीबद्दल त्याला माफ करण्याची ज्याची तयारी आहे ती व्यक्ति विविध प्रसंगी चांगली म्हणूनच ओळखली जाते. क्षमा करण्यासाठी आणि मागण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर भावनिक आणि/किंवा व्यावहारिक नुकसान होते त्याबद्दल खंत न बाळगण्याची खबरदारी घ्यायला लागत असल्याने हा निकष जरा जास्ती महत्वाचा आहे.
वक्तशीरपणा, काटेकोरपणा, आत्मस्तुति, पोकळ डामडौल किंवा सामर्थ्याचे प्रदर्शन न करण्याने व्यक्तीची गणना चांगल्या व्यक्तींमध्ये होते. त्यांच्या बद्दल एक किमान विश्वासाची भावना कायम राहते आणि त्याविरुद्ध मत प्रदर्शन करणार्यांना परस्पर त्या व्यक्तीबद्दल खात्री दिली जात असेल तर ती व्यक्ति चांगलीच असली पाहिजे.
जबाबदार पालक, पाती/पत्नी किंवा कौटुंबिक घटक म्हणून आपली जबाबदारी सदैव ध्यानात ठेवणारी, आपला धार्मिक किंवा पारंपरिक आचार विचार आपल्या पुरता मर्यादित ठेवणारी, बिकट प्रसंगात तारतम्याने वागणारी, सामाजिक भान किंवा जबाबदारीच्या प्रसंगी पळ न काढणारी, आधुनिकतेच्या नावाखाली बेबंद वागण्याला नकार देणारी, पण नव्या बदलांना स्वीकारण्याची मानसिकता जपणारी, जुनं तेच सोनं हा अट्टाहास न धरता काळाची पाऊले ओळखुन वाटचाल करण्यात कमीपणा किंवा पराभव न मानणारी व्यक्ति चांगली म्हणायला हरकत नाही.
सरकारी कर, सरकारी सेवांचा मोबदला, देण्याबद्दल जागरूक आणि आभारी असणारी, हक्काइतकीच कर्तव्यांच्या बाबतीत आग्रही असणारी, कायद्याचे नितिंनियमांचे कसोशीने पालन करणारी आणि ते पाळल्यामुळे आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे किंवा मोडण्यामुळे आपण कोणीतरी विशेष गुणवत्ता धारक आहोत असे न मानणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.
आपला स्वभाव, मत, कृती, उपस्थिती, गैरहाजेरी यांपैकी कशाचाही उपद्रव समाजाला होणार नाही याची जाणीव किंवा तारतम्य चांगल्या व्यक्तीकडे असले पाहिजे. अगदी तुमचा वेष, कायिक आणि वाचिक प्रतिक्रिया प्रसंगानुरूप योग्य नसल्या तरी चांगल्या व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का पोचू शकतो.
आपण किंवा आपल्याशी संबंधित व्यक्तिचा अपमान किंवा उपमर्द, शारीरिक इजा, आर्थिक फसवणूक या बाबतीत संयमित शब्दात आणि संयमित, कायदेशीर प्रकारे प्रतिवाद करण्यास कुचराई न करणारी व्यक्ति, अकल्पित किंवा आणीबाणीच्या प्रसंगी समोरच्या व्यक्तिचा स्वतः वरचा ताबा तुटत असला तरी त्याचा भावनोद्रेक समजून घेऊन शांत करणारी व्यक्ति, मत बनवण्या पूर्वी सगळ्या शक्यता विचारात घेण्याची तयारी असलेली व्यक्ति बहुतांशी लोकांच्या मतांनी चांगली म्हणावी लागेल.
व्यक्तीगत, कौटुंबिक, आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर आपल्या करतव्यांप्रती दक्ष असणारी, अपुर्या ज्ञानाने किंवा माहितीवर आधारित संभ्रम किंवा निराधार भीती न पसरवणारी व्यक्ति, आपल्या अपयशाची किंवा परिस्थितीची योग्य कारण मीमांसा करून त्यावरून बोध घेताना इतरांच्या यशाबद्दल, उत्कर्षाबद्दल कडवट प्रतिक्रिया किंवा निंदा न करता उलट आपल्याशी संबंधित नसलेल्यांच्या यशाबद्दलही योग्य ते श्रेय त्याला देवून आनंदी होणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.
उक्ति आणि कृतीत अंतर न ठेवणारी किंवा कमीत कमी अंतर ठेवणारी आणि सामर्थ्याचा अनुचित वापर न करणारी व्यक्ति चांगली व्यक्ति म्हणून घ्यायला पात्र आहे.
चांगल्या व्यक्तीचे निकष किंवा लक्षणं खरं म्हणजे आणखी खूप सांगता येतील पण एखाद्या समाजोपयोगी कामात व्यक्तिशः पदरमोड करून सुरुवात करणारी आणि ठराविक टप्प्या पर्यन्त त्याला मूर्त रूप देऊन योग्य वेळेला त्यातून स्वतःला वेगळे करून घेण्याची आणि ते कार्य संस्थात्मक अगर वैयक्तिक पातळीवर सुद्धा इतरांच्या हातात (योग्य असतीलच असं नाही ) सोपवून त्या कार्याच्या यशापयशाचा स्वकेंद्रित डांगोरा न पिटणारी, कार्य विपुलतेमुळे निर्माण झालेले परस्पर संबंध किंवा विविध क्षेत्रातल्या, सत्तेतल्या, प्रभावशाली लोकांशी असलेल्या प्रासंगिक किंवा वैयक्तिक संबंधांबद्दल ज्यांना फार काही विशेष किंवा अप्रूप वाटत नाही पण या व्यक्तींना अशा कामासाठी चालना द्यायला लावण्याची ज्यांची ताकद आहे अशा व्यक्ति चांगल्या म्हणता येतील.
एका विशिष्ट क्षणी अनेक लोकांची मनःस्थिती एका विशिष्ट अशा नीतीमत्तेच्या आणि जबाबदारीच्या पातळीवर सामूहिक रित्या गेली असेल तर संख्यात्मक दृष्ट्या तेव्हाढ्या सगळ्या व्यक्तींची गणना तेव्हड्या क्षणांपूरती चांगल्या लोकात करावी लागेल किंवा कोणत्याही बिकट, आणीबाणीच्या प्रसंगी विशिष्ट अशा व्यक्तीची किंवा समूहाची गरज अधोरेखित होणे ही गुणात्मक दृष्ट्या चांगल्या व्यक्तीची व्याख्या आहे. अशा प्रसंगी त्या व्यक्तीची शारीरिक, आर्थिक ताकद दखलपात्र नसेल पण त्यांचं मनोबल अशा प्रसंगात कधीही डळमळीत होत नाही याचा अनुभव ज्यांच्या बाबतीत इतरांना आलेला असेल त्यांच्या दृष्टीने अशी व्यक्ति किंवा व्यक्ति समूह चांगल्या व्यक्ति म्हणून सर्वमान्य होतात.
आपल्या वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा, शिक्षणाचा, संपत्तीचा प्रभाव खूप मोठ्या समाज मनावर टाकणार्या व्यक्ति जेंव्हा ही ताकद समजाच्या अत्यावश्यक पण जबाबदारी कोणाची? ह्या सनातन प्रश्नावर अडून बसलेल्या सेवेसाठी, बिन तक्रार उपयोगात आणतात किंबहुना ही ताकद अशा तर्हेने उपयोगात आणणे हे आपले प्रधान कर्तव्य मानते ती व्यक्ति चांगली म्हणावयास काहीही प्रत्यवाय नाही. कारण त्यांचे अनुयायी विभिन्न पंथांचे, मतांचे आणि गुणवगुणांचे प्रतिंनिधि असतात पण त्यांना एकाच एक प्रेरणेने कार्य प्रवण करणे हे निश्चितच चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. आणि त्या व्यक्तीकडे पर्यायी म्हणिण नव्हे तर अधिकारी म्हणून पहिले जाते.
प्रसंगोपात यांपैकी एखादा किंवा जास्तीत जास्त निकष पळणारी कोणतीही व्यक्ति त्या त्या काळापुरती चांगली व्यक्ति ठरू शकते. चांगली व्यक्ति म्हणून न ओळखली जाणारी व्यक्ति एखाद्या विशिष्ट क्षणी अशी एखादी कृती करते की त्यामुळे समजाच्या बर्याच मोठ्या भागाला बर्याच काळापर्यंत दिलासा मिळतो. ही उत्स्फूर्तता अनाकलनीय आणि क्षणिक असली तरी तिचा आविष्कार त्या व्यक्तीच्या तेव्हढ्या काळा पुरत्या चांगुलपणाचा पुरावा असतो.
थोडक्यात चांगली व्यक्ति ही कल्पना आणि वस्तुस्थिती दोन्ही सापेक्ष असली तरी वरील निकषांमध्ये स्वतः ला जास्तीत जास्त काळ आणि जास्तीत जास्त वेळा बांधून ठेवू शकणारी व्यक्ति ही चांगली अशी सामान्य व्याख्या करूया.
अर्थात या सगळ्या निकषांपैकी प्रसंगोपात आवश्यक ते निकष किंवा यातले जास्तीत जास्त निकष पाळू शकणारी व्यक्ति तरी व्यवहारात पाहायला मिळेल अशी अशा करूया.
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)
मानसाचे मन कस आहे हे ओळखन खुप अवघड आहे
锘?
vmate might be software that lets you copy vmate video in addition to the songs through the Youtube, Metacafe, Vimeo, Soundcloud and therefore for all other in style hiburan online stores. which software package lets you best free download any number of classes nicely songs of varied benefits. okay, it is possible to downloading just about very good quality akin to on-line video and / or maybe song you select that you want to. we can retrieve full high definition (hd) video tutorials perfect here significantly. All recognized and working acquire sites are provided over here plus you don鈥檛 need to bother about that within the. It allows timepiece the training videos or else songs themselves without the require them to be vmate saved. best free download – vmate software package.