SMS : आमची भाषा…

iphone_messaging

एवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच.!

कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी कळत काहीच नाही.

‘योलो’ वाचलं मागच्या अंकात.
आणि मज्जाच वाटली.
म्हणजे आम्ही काही सणकी टाळकीच भाषेचा लसावी करून टाकतो, असं आम्हाला वाटायचं.
पण तसं काही नाही, आमच्यापेक्षाही भन्नाट काही जण आहेतच, हे वाचून बरं वाटलं.
भाषा शुद्ध पाहिजे, लिहिताना तर एकदमच शुद्ध पाहिजे, असे आग्रह होतात. त्याला आमचा काही विरोध नाही. मात्र हातांनाच आता अशी काही सवय झाली आहे की, काही शब्द आणि काही ‘लघुरूपं’ आम्ही आमच्याही नकळत वापरून टाकतो.
म्हणजे इमेल किंवा मेल फॉरवर्ड करताना लक्षात असतं की, आपल्याला लिहायचंय की, ‘फॉर युवर इन्फॉर्मेशन’ पण आम्ही सवयीनं लिहितोच, ‘kFYII’.
आणि खरं सांगू असं लिहिणं आम्हाला दोन गोष्टीनं सोपं जातं.
एकतर कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेजेस. मग उघड उघड काही लिहिण्यापेक्षा त्यांना न कळणार्यात भाषेतच लिहिणं सोपं असतं. ते फोन घेतात, वाचतात. पण त्यांना काही कळत नाही.
आणि तुझ्या फोनमधल्या मेसेजचा अर्थ सांग असं उघड विचारण्याचं धाडस ते कधी करत नाहीत. कारण तसं विचारलं तर तेच पकडले जाणार, मग वैताग होणार हे त्यांना माहिती असतं.
दुसरं म्हणजे कमीत कमी कींनी काम भागतं. वेळ वाचतो. वाचणार्यातला कळतं आम्हाला काय म्हणायचंय ते.!
मग कशाला लांबचं लांब शब्दांचा घोळ घाला.
आता काही उदाहरणंच देतो म्हणजे मी काय म्हणतो, यातली गम्मत कळेल. कुणीतरी मला विचारतो की, काल लेर आपण बंक केलं आता नोट्स कुणाकडे मिळतील.
मी रिप्लाय पाठवतो.

सोपंय की नाही, मला माहिती नाही. आय डोण्ट नो. एवढंच मी फक्त तीन अक्षरात सांगून मोकळा होतो.
तेच आय लव्ह यू चं पण.
तुम्ही काहीही बोला, कितीही एसएमएस करा. गर्लफ्रेण्डसचं समाधानच होत नाही. तिला तो एसएमएस हवाच. मी आपलं एक टेम्पलेट सेव्हच करून ठेवलंय.
143
एवढं द्यायचं पाठवून डोक्याला झंझट नाही.
आणि समजा पाहिलंच घरच्यांनी तरी, त्यांना कळत नाही.
एका दगडात बरेच पक्षी मरतात.
असे बरेच शब्द आहेत, जे आम्ही सर्रास वापरतो.
4, (बीफोर)
f2f, (फेस टू फेस)
r8, (ग्रेट)
4f, (जस्ट फॉर फन)
omg (ओह माय गॉड)
np, (नो प्रॉब्लम)
lmk, (लेट मी नो)
tia, (थॅँक्स इन अँडव्हान्स)
आमचा हॅण्डसेटवरचा हात हे सारं शून्य सेकंदात टाईप करतो. आम्ही चॅट करतो तेव्हा तर सेकंदाला मेसेज इकडून तिकडे जातात. पटापट रिप्लाय जातात.
वेळ कुणाला असतो, भाषण द्यायला. पटकन कमी अक्षरात जास्तीत जास्त लिहून टाकायचं. पोहचल्या भावना झालं काम.
आता कुणी म्हणा आम्हाला एसएमएस जनरेशन. असा आरोपही करा की, १४0 शब्दांपेक्षा जास्त नाही आमचा स्पॅन.
पण आम्हाला तरी हेच सोपं वाटतं.
जे सोपं, जे सहज तेच आम्ही करतो. उगीच कसलेही आव न आणता. आणि कुणालाही न दुखवता.
आता आमचं एक सिक्रेट सांगू का तुम्हाला.
बाकीची मुलं मारतील मला.
पण तरी सांगूनच टाकतो.
एखाद्या वेळेस मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन येत असतो. किंवा सतत एसएमएस येत असतो.
समोर वडील किंवा आई बसलेले.
लक्ष आपल्यावरच.
अशावेळेस फोनवर बोलता येत नाही. फोन किंवा एसएमएस करूनको असं सांगताही येत नाही.
मग फोन उचलायचा. मेसेज बॉक्समध्ये जायचं आणि टाईप करायचं.
9 काम होतं. न मग फोन वाजतो. न एसएमएस येतात. काय कळवलं मी.
9 चा अर्थ होतो. पॅरेण्ट इज वॉचिंग. म्हणजे आईबाबा पाहताहेत, आता नको.
वाचणारा ९ अंक पाहून काय ते समजतो.
काही वेळानं आईबाबा गेले बाजूला, बोलता येणं शक्य असलं आणि आपल्याकडे बॅलन्स नसला तर फक्त एसएमएस करायचा.
99 म्हणजे पॅरेण्ट इज नो लाँगर वॉचिंग. आई-बाबा नाहीत आता, कर फोन असा याचा अर्थ.
तो लगेच फोन करतो.
आहे की नाही, भाषेची गम्मत.
पूर्वी होत्याच न ‘च’, प, फ च्या भाषा.
तशीच आता ही एसएमएसची भाषा.
त्या भाषेत आम्ही काही बोलत नाही.
ती फक्त संवादाचा एक शॉर्टकर्ट.
तरुण मुलांना झोडपायच्या आधी ती भाषा काय आहे, त्यातली गम्मत काय आहे हे समजून तर घ्या.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

One thought on “SMS : आमची भाषा…

Leave a Reply to Ayush Kumar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: