गब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

Amjad-Khan-Gabbar-Singh_7142011185651

शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमारअमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. आज ही शोले सिनेमातील गब्बरसिंग अर्थात अमजदखान यांचे पात्र भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अजरामर कलाकृती मानली जाते.

आजपर्यंत आपण सर्वजण गब्बरला एक क्रूर / खलनायक म्हणून ओळखत आलो आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही अप्रकाशित पैलू.. 😉

गब्बरची स्वभाववैशिष्टे :

  • गब्बर हा एक अत्यंत हसरा माणूस होता.
  • त्याला हसायला आणि हसवायला खुप आवडायचं.
  • तो हसता हसता कधी बंदूक काढून मारेल याचा नेम नव्हता.
  • गब्बरला तंबाखू खुप आवडायची.
  • फावल्या वेळात त्याला माशा मारायला खुप आवडायचे.
  • गब्बरला कटिंग आणि दाढ़ी करायला आवडायचे नाही.
  • त्याचा गणवेश ठरलेला होता.
  • गब्बर अशिक्षित असला तरी त्याला गणित खुप आवडायचे, तो नेहमी त्याचा ख़ास लोकाना “कितने आदमी थे? तुम २ वोह ३” अशी अवघड गणिते विचारायचा.
  • त्याला पकडून देणाऱ्याला पूर्ण ५०,००० चे बक्षिस ठेवले होते….. तेव्हाचे ५०,००० म्हणजे आत्ताचे… 😮
  • गब्बरला Dance शो पहायचा खुप नाद होता.
  • त्याला रिकाम्या बाटल्याचा पसारा आवडायचा नाही…. तो त्या बाटल्या लगेच नाचणारी च्या पाया खाली फेकायचा.
  • त्याचाकडे एक घोडा पण होता.
  • गब्बर ने गावत येण्या जाण्या साठी एक पुल देखिल बांधला होता.
  • गब्बर हा परावलंबी होता…. गावकारी जे देतील ते तो खात होता.
  • गब्बर ने ठाकुर चे हात कापले, पण त्यानी कधी ते वापरले नाहित.
  • सांभा हा त्याचा ख़ास माणूस होता.
  • गब्बर ला सर्व सण आवडायचे पण होळी हा त्याचा सर्वात आवडता सण होता…

गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र…

  • साधे जीवन व उच्च विचार:
    गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, ‘जो डर गया, सो मर गया’ या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.
  • गब्बरची दयाळू प्रवृत्ती:
    ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.
  • नृत्य आणि संगीताचा चाहता:
    ‘मेहबूबा ओ मेहबूबा’ या गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत या कलेच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.
  • अनुशासन प्रिय गब्बर:
    जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच परत आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.
  • हास्य प्रेमी:
    त्याच्याकडे कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूपहसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते. तो आधुनिक युगातला ‘लाफिंग बुध्द’ होता.
  • नारीच्या प्रती सन्मान:
    बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितल असत.
  • भिक्षुकी जीवन:
    त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.
  • सामाजिक कार्य:
    एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात ‘कोन बनेगा करोडपती’ नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.

आपल्याकडेही गब्बरविषयी काही अप्रकाशित माहिती असल्यास, आम्हाला अवश्य कळवा.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: