दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.
गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला.
वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला.
वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावेत मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे.
माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली 25 वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीटसांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी.
आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या कुटूंबियांना ही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे.माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे.
त्यांने अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत.
आई- वडिलांना सांभाळन्यासाठी दोनों भाऊ कोर्टात भांडत आहेत हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळना-या नालायक अवलादीच्या गालफडात लावलेली जबरदस्त चपरा आहे.
जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्ध आश्रमात ठेवनारा जमाना आला आहे. तेथे हे श्रावणबाळ कसे जन्माला आले. जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले आपली काय ईच्छा आहे. तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.
तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावनार याचे खुप दु:ख झाले. धन्य ते आई वडिल ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले.या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणा-या जन्माला आल्या आहेत.
आईवडिलांना वृदाश्रमात ठेवनारे आयआयटी पास नालायक आहेत. सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत
उच्च भ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवन्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत
कळस म्हणजे न्यायनिवाडा करना-यां न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.
या देशात शिकून परदेशात नोकरी करनारे महाभाग आहेत. ज्यांनी देशसेवा करायची सोडून परकियांची नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अवस्था निपुत्रिका सारखी झालेली आहे.
शेतकरी आत्महत्या करतील पण आईवडिलांना सांभाळतील.
पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत.
वरिल कथा आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृती ची सर्वात मोठी अधोगती आहे.
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
Khup Chan
केस नंबर सागा, तेव्हा विश्वास बसेल.
काही आजी आजोबच नातवांना सांभाळत नाही, कधी त्यांना खाऊ अनात नाही, गडगंज पैसा असून सणावाराला कधी त्यांना नवीन कपडे घेण्यात आनंद मानत नाही. फक्त मला काय मिळ नाही याचा हिशोब ठेवतात, स्वतःच्या मुलंमुली मध्ये नव्हे तर नातवडांमध्ये फरक करतात त्यांचे काय?
Tumchya sarkhyan kadun hich apeksha ahe….. story pan asli tari tase wagle pahije
याचसाठी केला होता अट्टाहास l
शेवटाचा दिस गोड व्हावा ll
किंवा
कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक l
तयाचा हरेकु वाटे देवा ll
किंवा
पावित्र ते कूळ पावन तो देश l
जेथे हरी हे दास जन्म घेती ll
कथा छान आहे
पण मोठ्या भावाने आज पर्यन्त सांभाळल आणि लहान भाऊ आता सांभाळ करायला तयार आहे. 90 वय झाल त्यांचं ( आई वडील ) ते किती वर्ष जगतील. 5 ते 6 मग त्यांची सगळी प्रॉपर्टी लहानच मागणार.. its true
कथा छान आहे
पण मोठ्या भावाने आज पर्यन्त सांभाळल आणि लहान भाऊ आता सांभाळ करायला तयार आहे. 90 वय झाल त्यांचं ( आई वडील ) ते किती वर्ष जगतील. 5 ते 6 मग त्यांची सगळी प्रॉपर्टी लहानच मागणार.. its true
त्या दोघांना एवढेच प्रेम आहे एकमेकांबद्दल एव्हडी काळजी आहे एकमेकांची तर ते वेगळे का राहत आहेत…?
मोठा भाऊ वयस्कर झाला आहे त्याला आई वडिलांना सांभाळायला त्रास होत आहे तर मग छोट्या भावाने मोठ्या भावाची पण काळजी घेणे बनत आहे ना।
माहिती खरी असेल तर खूपच चांगली आणि बाकीच्या लोकांची डोळे उघडणारी गोष्ट आहे पण दिलेल्या माहिती वर विश्वास ठेवणे थोडे अवघड जात आहे।
Khara bolat, it’s hard accept but sensitive story ..
भेटला हा एक!
जर दोघे कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर ,
कशे एकत्रित राहतील??
काही प्रश्न निर्माण करू नका, चांगला बोध घ्या.
अगदी बरोबर बोललात. मातृ पितृ देवो भव
काही महाभाग सासु सासरे ह्यांच्या साठी आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात.
ekdam barobar bol lat…
Changli gosti cha avalab lavar hot nahi… Ayush he sarv tapasnyat nighun jat..
एकदम बरोबरी मि ह्या विचाराशी अगदी सहमत आहे
Max mat aahe yekatra kutub padhat rahawe
भाऊ कधीच वेगळे राहण्याचा विचार करत नाहीत. पण बायकांचं काय. त्याच्यामुळेच हे रामायण आणि महाभारत.
कुठली घटना आहे ,गाव ,जिल्हा .त्यांचे नाव ,आडनाव .काहीही detail नाही .गुजराती लोकात एवढी माणुसकी ? स्वतः pm त्यांच्या आईला pm निवास मध्ये ठेवत नाही .
विश्वास ठेवणे अवघड जात आहे,कारण ज्यांना आई वडीलांना सांभाळणे योग्य वाटत नाही अशा लोकांना विश्वास ठेवणे ही योग्य कसे वाटेल.
Nice.,pan te sare kutumb ekatr rahu shaktat n. Jar tyana ek mekachi awdi kalji aahe.
बंधूंनो, लहान भावावर एवढे संशय घेता ?
एकत्र राहण्यासाठी त्याची पण काही मजबुरी असेलच,
हा प्रश्न कोर्टाने विचारलाच असणार,
तुम्ही त्याची काळजी करू नये,
चांगले बघण्याची आणि विचार करण्याची शक्तीच लोप पावली आहे असे वाटते,
I am agry with you
खरंच लोक चांगला विचार करतात की नाही तेच समजत नाही
काही प्रश्न निर्माण करतात.
Wow ……………… superb two Brathers sweet hurt touch story of the latest stutas is well my dear ………….. Lack lack naman that’s Mata Pita …………..
Both bro is best
Dhanya ahe tya aai vadilana jyani ASE Sanskar dile
त्या दोन्ही मुलांवर त्यांच्या आई आणि वडील यांनी केलेले चांगले संस्कार👌👌👌👌👌
Aajchya Yugat Ashi Ghatna Ghadne Mhnje Kalpne Palikdche Aahe Ase Vatte Pn Khrech Ya Donhi Bhavana Shravan Balachi Upma Dene Yogyach Aahe Aai Baba & Tyanchya Ya Donhi Shravan Balana Shatkoti Naman
Khar Anand tyanna tehva watnar jehva te doghe n bhandta ektrit rahnar, Rahil prashna rahaycha tr tyanchi jithe icha no jajge, (Aai baba) ani tyanchi icha Karan tyanche shabda pude Jane pap ahe, luv you ,Maa,
It’s very important to check that what parents feel
their opinion where they feel comfortable to stay.
They are not a commodity it can be handed over one person to another based on the arguments from both side. They are human beings. Court can not rely on the emmotions of these brothers. Court will have to check the wish of parents. It can not be a matter to decide by court.
It’s really incredible in Kaliyuga that two brothers are in race to take care of their parents.
एक दंतकथा
एक अप्रतिम दंतकथा
Really great parents and their teachings to their great sons.All sons must follow this both brothers
it’s very touching story. But Something is wrong with artical. In the end it switched the context and blamed all educated people who left country n does not take care of parent. And gave example of famers who commit sucide but does take care of parents. My common sense asks, how can someone take care of anyone after commiting sucide. And now I started doubting the whole story, if the second brother feels so much for his parents n his older brother, why is he not taking care of all including old Brother? Old brother is not family?
Anyway, being NRI I personally felt bad when author used foul language towards all NRIs n took all NRIs granted by saying they don’t take care. They don’t work for country etc. Is author of this artical work for country?
I would recommend people to not share such biased artical.
या पोस्ट मधील कथानक खरे असल्याबद्दल खात्री देता येणं अशक्य आहे.
लेखकानं तसं नमूद करायला हवं होतं.
असो.
केवळ इतक्या कारणासाठी हा मामला कोर्टात जाईल हे पराकोटीचे असंभवनीय वाटते.
कारण या कुटुंबव्यतिरिक्त इतर देखील व्यक्ती, म्हणजे मामा, काका किंवा जवळचे स्नेही, यात सहभागी असणे स्वाभाविक आहे. आणि त्यांनी यात मध्यस्थी करणे सहज शक्य आहे. लहान भावाने व्यक्त केलेल्या भावनांचा विचार करून देखील मोठा भाऊ आणि वडील, त्याच्या कडे येण्यास का तयार नव्हते हे गुलदस्त्यातच राखलेले आहे.
म्हणजे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वडील लहान भावाकडे जाण्यास, त्यांच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध तयार झाले असाच अर्थ निघतोय.
दोन्ही भावांच्या इतिहासाबाबद आपण अनभिज्ञ आहोत.
आईवडील लहान भावाकडे जाण्यास नेमके का अनुत्सुक होते हेही समजत नाही.
स्वतः, आई-वडील तसेच मोठा भाऊ देखील वयस्कर आहेत हे आईवडिलांना माहितीच आहे ना.
तरीही ते का नाकारतायत?
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, प्रत्येक कुटुंबात, वडिलधाऱ्यांची देखभाल करणे शारीरिक दृष्ट्या अशक्य असण्याचे कारण जरी गृहीत धरले तरी ताज्या दमाची नातवंडे असतातच की.मदतीला.
आता वेगळा तर्क.
कल्पना करा की, वडिलांच्या जवळ खूप सोने-नाणे आहे आणि त्यांना ते केवळ मोठ्या भावाचं द्यायचे आहे. मृत्युपत्र वगैरे गोष्टी अजूनही सुशिक्षितांमध्ये सुद्धा तुरळक प्रमाणात दिसतात. सोन्यानाण्याचा विचार सार्वजनिक करायचा आणि शिवाय वडिलांना सोन्यानाण्याचा थांग पत्ता लहान भावाला लागायला नको असल्याने वडिलांनी मृत्युपत्र केले नसावे. मात्र लहान भावाने, सोनेनाण्याबद्दल माहिती नसूनही वडिलांना आपल्याकडे येण्याची गळ घातली आहे. वडील केवळ लहान भावाकडे यायचे टाळत गेले. सोन्यानाण्याचा उल्लेख ते करूच शकत नव्हते. मात्र कोर्टाचा निकाल लागताच त्यांना जायलाच लागले.
ही शक्यता आपण नाकारू शकतोय का?
ही पोस्ट काल्पनिक असण्याची जास्त शक्यता वाटते.
तथापि लेखकांनी आणखी प्रकाश टाकण्याची गरज आहे,
कोर्टाचे कामकाज सार्वजनिक करणे देखील शक्य आहे.
नैतिक मूल्यांचे अध:पतन झालेले पदोपदी आपल्याला दिसतंच आहे. तथापि तमाम पुढच्या पिढीला सरसकट धोपटून काढणे अनाठायी वाटते. आजही अनेक क्षेत्रांमधून तरुण पिढी आपापल्या यशाच्या पताका मिरविताना दिसत आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, शास्त्रीय, वैद्यकीय, संशोधन संधीत, लष्करी कामगिरी अशा अनेक आघाड्यांवर तरुण तळपताना दिसत आहेत.
वडीलधाऱ्यांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तुरळक घटना या आपण सरसकट प्रातिनिधिक कशा बरे मानणार? मग माननीय बाबा आमटे यांच्या मुलांनी जसा समाज कार्याचा वास घेतलाय त्याला तरुण पिढीचा प्रतिनिधी मानून तमाम तरुण पिढी समाजकार्यातच रस घेणारी आहे असा निष्कर्ष काढला तर तो योग्य थोडीच रहाणार आहे?
वाचकांच्या कल्पनाशक्ती वरती सोडून देत आहे.
शिरीष भातलवंडे
Really, it is heart touching case, We prey God to crake make mind of all sons like those two Brothers, Parents in this whole world should be happy.🌹🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏
Really great parents, and two great brothers,
Every sons in this world 🌍 follow them🎂🌹🌹🙏🙏🙏🙏
संस्कार व शिकवण याचे महत्व अधोरेखित करणारी कथा. अधिक विस्ताराने मांडणी करून ह्रुदयस्पर्शी बनवता आली असती. पण गाभा महत्वाचा… तो आवडला.
केस नंबर कळेल काय ?
मलाही हेच म्हणायचे आहे, कि दोघाही भावांनी एकत्र कुटुंब पद्धती टिकवून दोघांनाही आई वडील यांच्या वर प्रेम करता आले असते. आणि आई वडील यानाही दोघे मुले बरोबर राहतात याचा खूप आनंद झाला असता. कारण दोघांचेही आई वडील आहेत. तर हे दोघे भाऊ आहेत. आणि मोठा भाऊ थकल्या मुळे तेही आई वडील यांच्या सारखे आहेत. मग छोट्या भावाने आई वडीलांन ईतकीच भावाचीही जबाबदारी घेतली पाहिजे. ऐकमेकांचे प्रेम टिकवून ठेवले पाहिजे. आणि खरेतर एकत्र कुटुंब पद्धतीने संस्कार मिळतात. हि प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य, जबाबदारी असली पाहिजे. म्हणजे नाते संबंध टिकून राहतात. खरे तर आपल्या आधी आपले आजी आजोबांच्या काळी तो जमाना छान होता. नाहीतर आता फक्त माणसांपेक्षा पैशावर प्रेम केले जाते. म्हणून आजची पिढी बिघडली आहे.
Ekdam barobar ahe tumch!
Ple come together one hut along with parents & take it naturally piece & heavenly climate & invisibly God power bless you
we should stay as joint family because ter will be alwas blessing of parents wit teir childrens n ter will be no partition in siblings too i luv joint family n taking care of parents is givng back the love n care which tey gav us in our childhood
Dogi bhavache aai vadilan var yevde prem aahe tar mag te eketr rahile pahije jene karun aai vadilana dogana hi sambhalta yeel
Mind blowing, hats off for both the brothers.
दोन्ही मुलांवर त्यांच्या आई आणि वडील यांनी केलेले चांगले संस्कार👌👌👌👌👌
गोष्ट व नवीन पिढीस द्रुष्टांत देणारी बोधकथा म्हणून ठिक! पण कपोलकल्पीत असावी.बटबटीत व भ्रष्टाचारी वातावरवरणातुन चांगल्या वातावरणात जाण्याच्या प्रयत्न करण्यासाठी बाहेर गेलेल्या मुलांवर येवढा राग असणे बरे नाही.
भिकाजी चिले कोल्हापूर
This is happened in Saudi Arabia, if it is true and happened in gujrat then why no names of brothers, parents, court, judge nothing is there.
Because this is copied and published in the name of gujrat model.
You can explore the below link to know truth
https://www.emirates247.com/news/region/a-touching-legal-battle-for-mom-s-love-2012-04-08-1.452769
Media aur kitna ullu banayegi
लहानपणी केलेले संस्कार ही मोठ्यापणी दिसून येतात👌👌👌👌👌
त्या दोन्ही मुलांवर त्यांच्या आई आणि वडील यांनी केलेले चांगले संस्कार👌👌👌👌👌
So at the age of 90??? The younger son realised that he also needs to care for parents????
So that the property is not all gone to older son.
masta mirch masala launn story banavne soppe ahhe.
please solve unemployment problems in Maharashtra.
people like gujjus n other non maharashtrians migrate to mumbai and other cities for job opportunities. it is necessity.
please dont discourage others (especially maharashtrians ) to explore work and career opportunities out of the native villages. everybody has equal right to prosper. Children are not slaves to the parent. children do reciprocate love if they are loved by their parents.
discouraging maharashtrians to explore opportunities in other cities.
for 90 years younger brother didnt bother to take custody of parents. when their expiry date is ciming soon , it was necessary for that gujju younger brother to do some seva in order to get share in meva.
समोर आपण काय बातमी बघतोय ती पटतीय का नाही ए्वढेच उत्तर द्या तूम्हाला चेपायला लावले चापलायला नाही लावले. तुमचे दूषित विचार येथे मांडू नका.
भारतीय इतिहास जर आपण पाहिला तर आपल्यातील बरेच कुटूंब हे एकत्र राहणाऱ्या पैकीच पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
यात काही विदेशी आले व त्यांनी इथं घरोबा केला हळूहळू तेही आपल्याच समाजात मिसळून गेले परंतु आपल्या परोपकारी वृत्तीने हे समजून घेतले नाही, या कारणांवरून या विदेशी लोकांनी आपल्या एकत्रित कुटुंब पद्धतीस भांडणे हेवेदावे अशा प्रकारे पेरुन कळत न कळत ही व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव केला तरीही ही समाजव्यवस्था आजही कायम आहे.
वरील लेखनानूसार यात नवल नाही कारण आजच्या समाजाला बरिचशी मुलं वेगळे असून सुद्धा घरातील सर्व माणसांची काळजी घेताना दिसतात.
ज्याचे वडीलोपारजित मोठ्यांच्या आशिर्वादाने संपूर्ण संसार चालविले जातात ते त्यांचा सर्वत्र प्रसिद्ध करण्यात व मोठेपणा दाखवणे हे टाळतात.
👌👌
आणखी या मातृभूमीत चांगले सत्यवचनी लोक आहेत. तथापि, काही नालायक आवलादीची पैदास मग ते उच्चशिक्षित असो किंवा नसेलही पण अशांची प्रवृत्ती आणि समाजातील/तसेच आईवडीलाना चांगली वागणूक तसेच वृद्धापकाळात संभाळ करु शकत नाहीत अशा नीच व्यक्तीचा निषेध नोंदविनेच योग्य कार्य आहे.
Really both brothers eligble for do parents seva with heart matru pitru devo bhav
He ek bodhkatha aso kinvha hakikat vachun khup chhan vatl
Pratyek aai bapala ashich mule milali pahije.
Mg vrudhashramachi garaj nhi lagnar
Khup chhan kharch khup chhan vatl
Really both brothers eligble for do parents seva with heart matru pitru devo bhav
Hi gosht austreliya mdhli aahe tyacha anuvad mrathit kela aahe baki gosht khri aahe
ह्या खटल्याचा निकाल जर खरा असेल, आणि आईवडील दोघेही लहान भावाकडे असतील, तर निकालाची प्रत जाहीर करावी, मला सदर कुटुंबाला भेटायचे आहे. खुप म्हणजे खूप अप्रतिम संस्कार मय कुटुंब आहे. मी आणि माझे कुटुंब , माझा भाऊ आणि त्याचे कुटुंब आम्ही एकत्रित ह्या खटल्याचा निकालातील कुटुंबाला भेटायचे आहे, तरी आपण आमची भेट घडावावी ही मनःपूर्वक विनंती.
धन्यवाद
आपला कृपाभिलाशी
विनायक सिताराम शिंदे
आणि कुटुंबीय, बोरी,पुणे
Wonderful 🙂
ही घटना खरी असेलही,पण आजचे वातावरण बघता ही केस केवळ काल्पनिकच वाटते.कारण आई-वडीलांना सांभाळणाऱ्या ९०% भावांना इतर भावांकडून असा अनुभव ९९.९९% हमखास येत नाही. करणारा करतच राहतो,आई-वडील ही समजदार असतात ते सुद्धा करणाऱ्या भावाजवळच राहतात, न करणाऱ्या भावाकडे कधीच दिसणार नाहीत.न करणारा नेहमीच म्हणेल की तेच आमचे कडे येत नाहीत. एकंदरीत लोकांना बनीया भाऊ सहजच कळतो.
जी कथा इथे सत्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करताना लिहिली गेलीये ती साहित्यिक दृष्ट्या उत्कृष्ट आहे असे मानायला हरकत नसावी. पण हि कथा प्रश्न चिन्ह निर्माण करते ती त्यात वापरल्या गेलेल्या भाषे मुळे. कुठे तरी लेखक एक ‘अजेन्डा’ चालवतोय कि काय असा प्रश्न निर्माण होतो.
गुजरात न्यायालयात किंवा कुठल्याही न्यायालयात असा खटला कधी आलेला असावा ह्यावर माझा विश्वास नाही. उच्च न्यायालयI मध्ये असे ‘विचित्र’ प्रकारचे कस्टडी अँप्लिकेशन “ऍडमिशन” स्टेज ला उडायला हवे किंवा निदान अँप्लिकेन्ट्स ना समाज देऊन प्रकरण निकाली काढायला हवे. माझी जी काही कायद्याची बालिश समज आहे त्यानुसार ह्या कथे मधील कस्टडी अँप्लिकेशन हि एक कवी कल्पना आहे.
असो, तर मुद्दा असा कि अशा प्रकारच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या कथा प्रकाशित करण्या मागे हेतू काय असावा? माझी बालिश समज असे सांगते कि ” कामुकता आणि दुःख” प्रचंड प्रमाणात साहित्या मध्ये तसेच मीडिया मध्ये विकले जाते. समाजाला आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती ह्या दोन गोष्टी मध्ये आहेत. तुमच्या साहित्या मध्ये, लिखाणI मध्ये (ऑनलाइन व ऑफलाईन) ह्या गोष्टी आल्या कि तुमच्या साठी एक तयार मंच निर्माण होतो व समाज आकर्षित होतो. आपल्या मानवी मनाला ह्या दोन गोष्टींचे एक सुप्त आकर्षण असते व आपण अत्यंत नैसर्गिक रित्या आकर्षित होतो अशा साहित्या कडे, लिखाणI कडे. असे का होते ह्याचे सुद्धा माझ्या कडे उत्तर आहे, पण तो मुद्दा पुन्हा केव्हा तरी चर्चेत आणता येईल.
ह्या लेखाने , एक काल्पनिक कथा तयार करून अनेक वाचका मध्ये अपराधी पणाची एक विचित्र भावना निर्माण करण्याचा एक विचित्र प्रयत्न केलेला दिसत आहे. परदेशात नोकरी करणाऱ्यांना लेखकाने ‘महाभाग’ असे म्हटले आहे. कोणी अधिकार दिला लेखकाला असा अत्यंत ‘आक्षेपार्ह्य’ शब्द वापरण्याचा? सत्य हे अत्यंत वेगळे असू शकते. वृद्धाश्रम नावाची कन्सेप्ट केव्हाच कालबाह्य झाली आहे . सेकंड होम नावाची संकल्पना आता अस्तित्वात आहे. तुमच्या माहिती साठी सांगतो, अनेक उच्च शिक्षित सिनियर सिटिझन्स “सेकंड होम” प्रेफर करतात- स्वतः – स्वतःच्या मर्जीने कारण त्यांना मुलांची लुडबुड त्यांच्या आयुष्यात नको असते. बरेच सिनियर सिटिझन्स ( आज च्या काळातील) स्वतःच्या स्वातंत्र्याला जास्त महत्व देतात. आणि हो, असे हि सिनियर सिटिझन्स आहेत जे तरुणांना हि लाजवतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आधुनिक शैली मध्ये आयुष्याचा जल्लोष साजरा करतील. माझ्या माहिती मधील एक निवृत्त पोस्ट खात्यातील कर्मचारी आहेत. ते त्यांच्या फार्महाउस वर एकटे राहणे पसंद करतात, आणि निसर्गाच्या सानिध्यात लिखाण करताना आयुष्यावर प्रेम करतात (त्यांचे वय आहे ८१ वर्ष ) आणि त्यांचा निर्णय त्यांच्या ४ मुलांनी केव्हाच स्वीकारला आहे. हे पहा, ज्यांना मेडिकल सर्विसेस ची गरज आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांचे शरीर आणि मन शाबूत आहे, कणखर आहे त्यांना कोणी कसे काय त्यांच्या मर्जीशिवाय एखाद्या वस्तू सारखे इकडून तिकडे, तिकडून इकडे ठेवू/हलवू शकतो?
कसे आहे, आई वडील, आजी आजोबा, हि मंडळी वस्तू नाहीत हो. आले का लक्षात? त्यांना त्यांचे मत आहे. उद्या मी ८५ वर्षांची झाल्यावर सुद्धा मला माझ्या आयुष्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार मी शाबूत ठेवणार आहे. कृपया सिनियर सिटिझन्स वर जबरदस्ती करू नका. त्यांना जिथे राहायचे आहे, जे करायचे आहे, जसे आयुष्य जगायचे आहे तसे कृपया जगू द्या. आई वडिलांचा सांभाळ अशी जी संकल्पना आहे तिला अनेक पैलू आहेत. त्याची विस्तृत चर्चा होऊ शकते. अंत्यविधी चा हि उल्लेख केला आहे लेखI मध्ये. Corona च्या काळा मध्ये अनेक मृत्यू झाले. खूप लोक वाहतुकीची साधने नसल्या मुळे नातेवाईकच काय स्वतःच्या आई वडिलांच्या अंत्य विधीला हि हजर राहू शकले नाहीत. त्याच प्रकारे, अशी अनेक करणे असू शकतील ज्या मुळे कदाचित मुलांना सामान्य परिस्थिती मध्ये सुद्धा काही गोष्टी नाही करता येऊ शकल्या. तरी हि १०० पैकी ९८ टक्के मुलं त्यांचे जे काही कर्तव्य आहे ते त्यांच्या प्रॅक्टिकल मर्यादे मध्ये चोख बजावतात. तात्पर्य- मुलगा किंवा मुलगी आई वडिलांचा किती सन्मान करतो किंवा करते , किती प्रेम करतो किंवा करते, ह्या साठी बाह्य सर्टिफिकेशन ची खरंच गरज नाही.
आणि काय हो, परदेशात नोकरी करणे पाप आहे कि काय? भारता मध्ये जे काही परकीय चलन येते, त्या मध्ये प्रचंड वाटा “प्रवासी भारतीय” मंडळींचा आहे हि गोष्ट का नाकारावी? हि देशसेवा नाहीये का? कृपया एक गोष्ट समजून घ्यावी कि सत्याचे असंख्य पैलू असतात. मी असंख्य उदाहरणे आपणास देऊ शकतो ज्या मध्ये आई वडील मुलां बरोबर राहून हि सुखी नाहीत. कुठे तरी त्याचे व्यक्तित्व हरवल्या सारखे त्यांना वाटते किंवा कुठे तरी काही तरी चुकतंय असे वाटत राहते. अशा आई वडिलांना तुम्ही जबरदस्तीने मुलां बरोबर ठेऊ शकता का? किंवा आई वडीलांची जवळ राहण्याची इच्छा नसताना मुलांनी त्यांना ( समाज काय म्हणेल ) ह्या भीतीने आपल्या जवळ ठेऊन घेणे कितपत योग्य ठरेल?
कृपया विचार करा. शेतकरी आत्महत्या आणि आई वडिलांचा सांभाळ हे असले गणित तर्क शुद्ध नाही . “उच्चशिक्षित अवलादी” ज्या तुमच्या म्हणण्या नुसार “फार बिघडलेल्या” आहेत म्हणजे नक्की काय? कुठला “अजेन्डा” चालवला जातोय ह्या लेखा मार्फत? सळसळत्या रक्ताच्या आधुनिक, उच्च शिक्षित, अत्यंत कर्तबगार व जबाबदारीची जाणीव व जागतिक आकांक्षा असणाऱ्या तरुणांना “अपराधी भावनेने” ग्रसित करण्याचा प्रयत्न का केला जातोय?
कृपया भावनांचे “आर्थिकीकरण” केले जाऊ नये. अपवाद हा नियम नसतो. समाजI मध्ये प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात..नात्या मध्ये सुद्धा अपवाद असतील नाही असे नाही..पण तुमचा हा लेख अपवादांना नियम शाबीत करण्याचा प्रयत्न दिसतोय.
धन्यवाद !
Jyala jeevanachaa Saar Kala tyala kuthlyahi proof chi garaj nahiye, ithech jagat devavar vishwas thevanare hi ahet ani Nahi thevanare pan ahet, that evadhya Bhishan balatkar ani itkya krur ASHA ghatna ghadnyachi ani to krurataa aikun ghenyachi savay maanavi manavar zaleli Astana vishwas tyancha haravlay mhanun he proof Nagar ahet tyani krupaya aadhi vishwas Jinka ani mag kalel matru pitru bhakti Kay ahe, pundalikane keval Mata pityachi seva Karun Yash milavle, aapan sagale hech karayla aalo ahet pan yaa mayarupi jagat Ase adaklelo ahet ki ya mayarupala aapan khar maanun ghatt vishwas theun pudhe chaltoy kuthe vaet gosht ghadli ki romanchak pane aiktat , balatkar zala ki tyacha video baghnyasathi dhadpad kartat but goshtitun Kay body ghyaycha he sodun sagle chalale proof magayla, Kahi Kahi mahabhag tar evadhe swatala Shane samajtat ki tyana fakt the boltil tech khar ASA ahankar asto kadachit the joparyant Sutat Nahi toparyant asech chalu rahanaar. Changlya goshti kharya asot athva banavlelya but tyatun body Kay ghyaycha the mann kya divashi olakht tya divashi tumhi jaganehi shiklat ani tumhala aayushyacha bodhahi Kala. Kahi chuk zali Asel tr sorry, kunala vyktigat bolnyacha hetu nahiye ani kunalahi kinva kashalahi anusarun bolat nahiye. Thank you