साखरझोप
सकाळचे सहा वाजले असतील…
तो आजून झोपलेलाच…
तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये गेली की बारीक होत होता… बेडरूम मध्ये आली की मोठा होत होता… काहीही असो त्याला मात्र सुखवून जात होता…सुखावणार का नाही ओ!!! नुकतंच लग्न झालेलं… तिच्या रुपानं स्वर्ग त्याच्या दारात उतरलेला… तो पैंजनाचा आवाज येतंच होता… तो अगदी तल्लीन होऊन ऐकत होता… अशातच तो आवाज मोठा मोठा झाला आणि त्याच्या बेडजवळ येऊन बंद झाला… हा पाठमोरा झोपलेला… अर्धवट झोपेत म्हणा की झोपेचं नाटक करत पडलेला… बायकोने बेडवर बसत हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला… आणि अगदी त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन हळुवार आवाजात म्हणली…
“अहो…”
“अहो उठा ना…”
“सकाळ झाली… दहा वाजले की!!!”
तो गालातल्या गालात हसला… न म्हणला
“हम्मम्म्मम्म्मम…!!!”
बायकोने त्याला थोडंस हलवलं
“अहो खरंच दहा वाजलेत… उठा!!”
अचानक त्यानं बायकोचा त्याला हलवणारा हात पकडला न पुढं ओढला!!!
तशी ती त्याच्या अंगावर पडलीच!!! हात सोडवण्यासाठी धडपड करत…
“अहो सोडा ना!!! आई येतील की….
त्यानं डोळे किलकिले केले आणि तिचा हात तसाच पकडून ठेवत तो सरळ झाला आणि तिच्या मऊ मऊ तळव्यावरून आपलं बोट फिरवत म्हणला
“हम्मम्म्मम्म्मम्म”
तिची सुटण्यासाठीची धडपड थंडावलेली… न त्याचं बोट आता तिच्या तळव्यावरून हळू हळू नागमोडी वळणं घेत तिच्या चेहऱ्याकडे सरकत होतं आणि त्यामुळं तिला गुदगुल्या होऊन अगदी खल्लास (भरीपेक्षा पण भारी) लाजत होती…
तोच त्याला कुठूनतरी मोठमोठ्याने बोललेला आवाज येऊ लागला… त्याची झोपमोड झाली!!!
न खरा प्रकार त्याच्या लक्षात आला!!!
मोठमोठ्याने बोलताना दुसरं कोणी नसून त्याचाच पार्टनर होता… साडेआठ झालेले… कंपनीत जायला उशीर झालेला… मित्र बोंबा मारत होते… पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं… त्याच्या मनात एकच विचार घोळत होता… न तो म्हणजे “आता लवकरात लवकर लग्न करायचं!!!”
तळटीप :- कथा पूर्णतः काल्पनिक असून तिचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही… माझ्याशी तर अजिबातच नाही!!!!
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)