झप्पी : प्यार की…
प्रेम ही व्यक्त करण्यासारखी भावना आहे. नात्यात प्रेम व्यक्त करता आलं आणि ते झालं, तर नातं वाढीस लागतं. त्यामध्ये आपुलकीचे बंध जुळू लागतात. कृतीतून किंवा मनांमधून प्रेम व्यक्त केल्यानंतर जोडीदाराला हायसं वाटतं.
आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी सोबत आहे, ही भावना त्याला किंवा तिला सुखावून जाते. मात्र, जोडीदाराला अनेकदा गृहीत धरलं जातं. काहींना प्रेम व्यक्त करणं, आपल्या भावना जोडीदारापर्यंत पोचवणं जमत नाही.हीच गोष्ट नात्याला मारक ठरण्याची शक्य ता असते. असं होऊ नये म्हणून स्वतःचे काही नियम महत्त्वाचे आहेत. आता यासाठी काही केसस्टडी नाही. साध्यासुध्या टिप्स आहेत. पाहा तर अजमावून…
• एकमेकांना वेळ देणं सगळ्यांत महत्त्वाचं.
• कामानिमित्त दोघंही व्यग्र असतात हे मान्य; पण त्यातल्या त्यात वेळ काढणं आवश्य क.
• तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा किंवा महत्त्वाची, हे जाणवून द्या.
• काम आपल्यासाठी आहे, कामासाठी आपण नाही, हे लक्षात घ्या.
• ऑफिसचं काम, शेड्यूल, ताण हे नात्यांमध्ये येता कामा नये.
• रोजच्या छोट्या-छोट्या मेसेजमधून प्रेम व्यक्त करता येईल.
• कधीतरी जोडीदाराला ऑफिसमधून अचानक न्यायला जा.
• रात्री झोपण्यापूर्वी थोडावेळ का होईना गप्पा मारा.
• साध्या मिठी मारण्यातून आणि जवळ घेण्यातूनही प्रेम व्यक्त करता येतं.
• जोडीदाराचा स्पर्श सगळ्यांत जास्त सुख देणारा असतो.
• जोडीदार कंटाळला असेल, कामानं त्रस्त असेल, तर फक्त ‘प्यार की झप्पी’ द्या…
• नात्यात बोलण्यापेक्षा ऐकणं महत्त्वाचं असतं.
• अनेकदा काही परिस्थितीत जोडीदाराला सल्ले नको असतात.
• समोरच्यांनी फक्त आपलं ऐकून घ्यावं, अशी इच्छा असते.
• मार्ग काढण्यासाठी जोडीदाराला मोजकाच सल्ला द्या, आधी त्याचं ऐकून घ्या.
• नात्यात नुसतं प्रेम असून उपयोगाचं नाही, ते व्यक्त करता आलं पाहिजे.
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)