अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं | मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं ||
प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो | गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही | अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण | वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो | चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो ||
इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे | हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे || चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही | एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे | फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे ||
योग्य तिथे रेघ मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली | हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही | फक्त एकदा पाहून जा | दहा पैकी दहा मार्क आणि सही तेवढी देऊन जा ||
एकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते आणि मी एकटा राहात होतो.
मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सर्वत्र वावर करत होतो. मग मी लग्न केले. बूट दाराबाहेरच काढायचे असतात हे अमोघ ज्ञान मला प्राप्त झाले.
आंघोळ करून आलो की मी टॉवेल बेडवर टाकायचो, संध्याकाळी घरी परत आलो की तो टॉवेल वाळलेला असायचा. बेडला पण गारगार वाटत असणार. पण मग मी लग्न केले आणि टॉवेलने दोरी धरली ( म्हातारीने खाट धरली अश्या टोनमध्ये वाचावे ) आणि बेडच्या नशिबातला गारठा नष्ट झाला.
एकेकाळी जेंव्हा मी एकटा राहायचो तेंव्हा फ्रीजला माहीत नव्हते की त्याच्या अतिशील कप्यात मैदा, रवा वगरे पण ठेवातात. काल का परवा मी अतिशील कप्प्याला एकांतात रडतांना ऐकले. काय झाले म्हणून विचारावे तर तो म्हणाला तुझ्या बायकोने मला गरम मसाला सांभाळायला दिला आहे रे. त्याचे सांत्वन करायला लागलो तर अवघा फ्रीज रडायला लागला. का रे बाबा काय झाले असे मी म्हणायचं अवकाश, त्याने बिस्किटाचे पुढे माझ्यावर फेकले आणि म्हणाला, लग्न करायच्या आधी ठेवायचा का कधी बिस्किटे फ्रीजमध्ये.
एकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते. मी गावभर चतकोर चड्डीत फिरायचो. माझ्याकडे कोणीही वाईट नजरेने बघत नसे किंवा शिट्टी मारत नसे. पण मग मी लग्न केले आणि स्वतःच्या घरातल्या हॉलमध्ये देखील चतकोर चड्डीत येणे माझ्यासाठी खून करण्या इतका मोठा गुन्हा झाला. दूध भाजी आणायला देखील मी फुल पॅन्टमध्ये जाऊ लागलो. माझी आग उगलती जालीम जवानी झाकायला बायकोने डोक्यावर मफलर टाकायचे अनेक प्रयत्न केले आहेत पण उन्हाने माझी बाजू लढवत मला सांभाळून घेतले आहे.
एकेकाळी माझे लग्न झाले नव्हते आणि माझ्याकडे सहा पांढरे शर्ट आणि सहा निळ्या जीन्स होत्या. आता लग्न झाल्यावर माझ्याकडे फ्लोरोसंट ग्रीन, रेड, पिंक, ब्ल्यू, मरून, येलो रंगाचे पण शर्ट आहेत.
एकेकाळी माझे लग्न झाले नव्हते आणि गाय म्हैस बकरी वगरे माझ्यासाठी साधे प्राणी होते, दूध देणारे. लग्न झाले आणि इईईईई म्हशीचे दूध कोणी पिते का असा शोध मला लागला. गाईचे दूध म्हणजे अमृताचा प्याला असे समजून मी नाक बंद करून प्यायला लागलो.
एकेकाळी माझे लग्न झाले नव्हते. मी भसकन माझ्या मित्राच्या घरी जात असे, त्यांच्या किचनमध्ये घुसून कोणत्याही डब्यात हात घालत असे. सोफ्यावर मांडी घालून फतकल मारत असे, रात्री बे रात्री टीव्हीवर काहीतरी बघत काकू चहा टाका न असे सांगत असे. मग माझे लग्न झाले. आता मी मित्राच्या घरी जातो, टेबलावर मस्त चकल्या असतात, घट्ट दही असते पण माझ्या गब्बरने माझे हात छाटलेले असल्याने त्या चकल्या मला उचलता येत नाही, टीव्हीवर आपल्याला हवे ते चॅनेल लावता येत नाही आणि जीभ छाटलेली असल्याने काकू चहा टाका असे सांगता येत नाही.
एकेकाळी मी अलग्न होतो, गर्लफ्रेंड होती. गर्लफ्रेंड भारी होती. बोल्ड होती, मॉडर्न होती, पण मग आम्ही घोडचूक केली. लग्न केले. का तर म्हणे आग आणि लोणी एकत्र न जळता राहू शकत नाही. गर्लफ्रेंड बायको झाली आणि घरात लोकशाही जाऊन हिटलरशाही आली.
आता मी वाघावर स्वार झालो आहे. उतरलो की माझी शिकार होणार हे पक्के आहे !!!!
कोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर…!
काय आहे ही जिलेबी..? जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या ताटातील हा पदार्थ कधी लोकांच्या ताटात आला, ते कळलेच नाही. एरवी सणासुदीला, लग्नसमारंभात आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ ओळखला जातो तो मुलगी झाल्यानंतर आनंद साजरा करण्याचा पदार्थ म्हणून. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवसापासून खरेतर जिलेबी खाण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल काही आगळाच. खाण्याच्या बाबतीत आपले तोंड आणि हातही आखडता न घेणा:या कोल्हापुरकरांना खाण्यासाठी एखादे निमित्तच हवे असते. जिलेबी खाणोही याला अपवाद नाही. खरंतर, कोल्हापूर म्हटले, की आठवते तो तांबडा आणि पांढरा. परंतु आठवडय़ातून एकदा तरी यावर ताव मारणा-या कोल्हापुरातच स्वातंत्र्यदिन असो, की प्रजासत्ताक दिन, जिलेबी खाण्याचीही एक आगळीवेगळी परंपरा जपलेली आहे. कोल्हापुरात चौकाचौकात जिलेबीचे स्टॉल्स लागलेले असतात. मोजायचेच झाले तर त्यांची संख्या हजारावर जाते. पावशेर का होईना, जिलेबी घरात येतेच येते. मग तो कितीही गरीब असो, वा श्रीमंत. या आनंदाच्या प्रसंगी जिलेबी आवर्जून आणलीच जाते आणि आवडीने खाल्लीही जाते. कोल्हापुरकर सण असो वा नसो, रोज सहा हजार किलो जिलेबी फस्त करतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाला तर हा आकडा 90 हजार किलोच्या घरात जातो. कोल्हापुरात आजही जिलेबी तयार करणारी 100 च्या वर दुकाने आहेत. किरकोळ विक्री करणारे 300 हून अधिक स्टॉल्सही असतात. केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी 90 हजार किलो जिलेबीची विक्री होत असते. शिवाय 80 लाखांची उलाढाल होत असते. कोल्हापुरात जिलेबी अशी उत्सवी उत्साहाने खाण्यापाठीमागे कारणही तसेच उत्सवी आहे. जिलेबी हा मोघलांचा खाद्यपदार्थ. पंचपक्वानामध्ये त्याचे स्थान. पण तेथून तो राजघराण्यातील व्यक्तींच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचला.
जिलेबीचा इतिहास कोल्हापुरात 88 वर्षापूर्वी जिलेबी आली असावी. कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांनी सर्वप्रथम मल्लांनी कुस्ती मारली की त्यांचे तोंड गोड करण्यासाठी 88 वर्षापूर्वी जिलेबी वाटण्याची प्रथा सुरु केली, ती आजही कायम आहे. आज त्यांची चौथी पिढी म्हणजे निखिल मधुकर माळकर हे या व्यवसायात आहेत. इतकेच नव्हे तर पुण्यात आयटी क्षेत्रत नोकरी करणारे सागर माळकरही घरचा उद्योग असल्यामुळे घरच्यांना मदत म्हणून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला चार दिवस रजा काढून येत असतात. माळकरांची पाच भावंडेही याच व्यवसायात आहेत. माळकरांचे दुकान आज ज्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या चौकात आहे, त्यालाच माळकर तिकटी असे नाव आहे. महानगरपालिकेची इमारत नव्हती, त्या आधीपासून माळकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात आहे. शाहू महाराजांच्यानंतर राजाराम महाराजांर्पयत शाही कार्यक्रमात, कुस्तीगीरांना वाटण्यासाठी, सणासुदीला जिलेबी वाटण्याची प्रथा कायम होती. शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ सापडतो आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जिलेबीचा इतिहास हा तसा जुना आहे. राजाराम महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळय़ातही माळकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचे संदर्भ सापडले आहेत. राजघराण्यातही माळकर यांच्याकडून किती शेर जिलेबी आणली, याचे कागद सापडले आहेत. राजघराण्यातही महाराजांकडे रोज हजारभर रयत भोजनासाठी पंगतीला असे. त्यांच्यासाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले जाते. शाहू महाराज मात्र, पंगतीला बसताना आपल्या सवंगडय़ाच्या हातातले पिठलेभाकर खात, अन त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण पंगतीने इतरांना वाढले जात. समारंभात मात्र पंचपक्वाने बनत असत. त्यासाठी सोवळेकरी असंत. माळकरांबरोबरच चोपदार हॉटेलही जिलेबीसाठी प्रसिध्द. गणपतराव कृष्णराव भोसले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी गावचे. त्यांनी शिवाजी पुतळय़ाजवळ हॉटेल टाकून तेथे जिलेबी देउ लागले. करवीरनगरी कुस्तीसाठी प्रसिध्द. त्यामुळे देशविदेशातील मल्ल येथे येत. शिवाजी पुतळय़ाजवळील चौक हा रहदारीचा. आजही आहे. तेथे गर्दी असायची. त्यामुळे पहिलवानांसाठी तेव्हा तुपातील जिलेबी, लोणी, कांदा भजी आणि चहा हे हॉटेल चोपदारचे पदार्थ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या आठवणी आज नव्वदीत असलेले हारुण शेठ, आनंदराव सूर्यवंशी, शंकरराव काटे यांच्या स्मरणात आहेत. सादीक पंजाबी आणि गामा पंजाबी या पाकिस्तानी मल्लातील कुस्तीवेळी त्यांनी चोपदार हॉटेलमध्ये जिलेबी खाल्याची आठवण श्रीकांत चोपदार सांगतात. माळकर, चोपदार यांच्याशिवाय पूर्वी उरुणकर, खत्री, ढिसाळ, विजय भुवन, सुखसागर, मिलन, आहार येथे जिलेबी मिळत असे. सातारकरांनीही सांभाळली परंपरा देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी, क्रांतीवीरांच्या साता:यातील कृष्णा सीताराम राऊत यांनी त्यांना झालेला आनंद स्वत:पुरता ठेवला नाही. त्यांनी तब्बल 11 किलो जिलेबी सातारभर वाटली आणि हा आनंद साजरा केला. आजही ही परंपरा सातारकरांनी जपून ठेवली आहे. स्वातंत्र्यदिनी येथे परस्परांना जिलेबी देण्याची पद्धत आहे. ही अनोखी पद्धत साता:यात सुरू करण्याचे श्रेय कृष्णा राऊत यांनाच जाते. स्वातंत्र्यानंतर वाटलेली जिलेबी सातारकरांच्या लक्षात राहिली. पुढच्यावर्षी लोकांनी यंदा जिलेबी नाही का? अशी विचारणा केली. त्यावर्षीही राऊत यांनी जिलेबी वाटली आणि पुढे 69 वर्षे सातारकरांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
अशी बनते जिलेबी.. पूर्वी केवळ रिफाईन्ड तेलातील जिलेबी उपलब्ध होती. आता काळ बदललाय. वनस्पती आणि साजुक तुपातील जिलेबींना ग्राहक पसंती देत आहेत. असे असले तरी अजूनही रिफाईन्ड तेलातील जिलेबीला मोठी मागणी आहे. जिलेबीमध्ये पनीर जिलेबी, इमरती, डॉलर जिलेबी, केशर, दूध, वेलची जिलेबी व रसभर जिलेबी, मावा जिलेबी असे काही प्रकार आहेत. जिलेबी किंवा पाक तयार करताना लाकडाचा वापर केला तर त्याचा स्वाद अधिक खुलतो. शुगर फ्री जिलेबीही मधुमेहींच्या रुग्णांसाठी मिळते. मात्र, त्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही जिलेबी साखरेच्या पाकात न टाकता ती शुगर फ्री सिरपमध्ये टाकली जाते. खंबीर लावणं, जिलेबीचे पीठ एक दिवस आधी भिजवले जाते. कोमट पाणी, दही आणि उच्च प्रतीचा मैदा असं एकत्न करून दह्याच्या मुरवणाप्रमाणो हे मित्नण भिजवून ठेवावे लागते. याला खंबीर लावणं असं म्हणतात. खंबीर उठणं आणि खंबीर बसणं यावर जिलेबीची चव आणि आकार अवलंबून असतो. खंबीर नीट जमलं नाही तर जिलेबी कडे धरत नाही किंवा साखरेचे पाणी शोषून घेत नाही. जिलेबी करताना 85 टक्के खंबीर आणि 15 टक्के मैदा एकत्न केले जाते. या मिश्रणाला पाणी न लागण्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी डोळय़ात अक्षरश: तेल घालून बसावं लागतं. जिलेबीचं पीठ जेवढं मुरतं तितकी छान चव जिलेबीला येते.जिलेबी तळण्यासाठी पूर्वी पंढरपूरहून जिलेबीवाले येत. एकावेळी ते तीसभर जिलेबी गोलाकार तळत असतात. अलिकडे या पंढरपूरच्या कारागीरांची संख्या रोडावली असली तरी स्थानिक कामगार मात्र तयार झालेले आहेत. जिलेबीची कूळकथा इसवी सनाच्या तिस:या शतकात पामिरन साम्राज्याचा राजा सेप्टिमियस ओडिनाथस याचा खून झाला. तो गेल्यानंतर त्याची दुसरी पत्नी ङोनोबिया हिच्या हाती सर्व सत्ता आली. तिने इजिप्तवर आक्रमण केले व पामिरन साम्राज्य वाढविले. लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, पॅलेस्टाईन, तुर्कस्थान हे देशही तिने स्वत:च्या अंमलाखाली आणले. नंतर ङोनोबियाने नवी शहरेही निर्माण केली. त्यापैकी जुळय़ा शहराचे नाव होते हलाबिया आणि झलाबिया. युफ्रेटिस नदीच्या काठावरील या शहरातच तिस:या किंवा चौथ्या शतकात जिलेबीचा जन्म झाला असावा. येथे एका हलवायाने मैद्याच्या आंबलेल्या पिठात अंडी घालून कुरकुरीत जाळीदार गोल बिस्किटे तळून तयार केली, आणि त्यात मध सोडला आणि या नव्या पदार्थालाच आपल्या शहराचे झलाबिया असे नाव दिले. हीच ती जिलेबी.सीरियातून झलाबिया उत्तर आफ्रिका आणि आखातातील देशांत पोहोचली. सण आणि आनंदाच्या प्रसंगी ही झलाबिया खाण्यात येऊ लागली. जसजसे या पदार्थाचे स्थलांतर होत गेले, तसतसे त्याचे रुपही बदलत गेले. या बिस्किटाला नंतर शामिय्या असे नाव मिळाले. शम्स हे सीरियाचे प्राचीन अरबी नाव. सीरियातून आलेला झलाबिया म्हणून तो झलाबिया शामिय्या. एका खानसाम्याने हे आंबलेले मैद्याचे पीठ तेलात तळले आणि मधात घोळले. या पदार्थाला त्याने झलाबिया मुशब्बक असे नाव दिले. यालाच आपण जिलेबी म्हणतो. या जिलेबीलाही जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. सीरियातीलच अल्पेपो या प्राचीन शहराचे हलब हे मूळ नाव, म्हणून सीरियात झलाबिया मुशब्बक, इराणमध्ये झुलबिया, टय़ुनिशिया व पॅलेस्टाईनमध्ये मुशब्बक हलब, बांगला देशात ङिालपी, भारत आणि पाकिस्तानात जलेबी किंवा जिलेबी असे नाव आहे. झलाबिया प्रथम भारतात आली ती महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तेथून तिचा प्रवास देशभर झाला. या देशांशिवाय तुर्कस्थान, ग्रीस, सायप्रस, टय़ुनिशिया, सीरिया, इराण, इराक, इजिप्त, येमेन, मोरोक्को येथेही सणासुदीला जिलेबी खातात. ऑक्सफर्ड कंपॅनियननुसार तेराव्या शतकातील अल बगदादीच्या पुस्तकात जिलेबी तयार करण्याची पध्दत असल्याचे म्हटले आहे. भारतीय वंशशास्त्रचे अभ्यासक पी. के. गोडे यांनी 1943 मध्ये लिहिलेल्या न्यू इंडियन अॅटीक्युरी या पुस्तकात जिलेबीची रेसिपी असल्याचे नोंदविले आहे. 1450 मध्ये लिहिलेल्या प्रियामकर्णरपकवा या जैन ग्रंथात तसेच 17व्या शतकातील रघुनाथ यांनी लिहिलेल्या भोजन कुटहला या ग्रंथातही जिलेबीचा संदर्भ आहे. तर अशी हि जिलेबी. कोल्हापूरात 26 जाने आणि 15 ऑगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात.