अंधश्रद्धा

झोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल! एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी ॲक्सेप्टेबल आहे. पण अमुक एक माणूस झोपलेला असताना त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि म्हणून तो मेला अस ऐकल तर हळहळ वाटण्याऐवजी गम्मतच वाटेल हे नक्की.

पण हे अस खरच होत असत तर आपल जग जगण्यासाठी फारच भयंकर झाल असत हे मात्र नक्की. कॅमेरा हे शस्त्र झाल असतं. तो बाळगायला लायसंस लागल असत. इंस्टाग्राम वगैरे वेबसाईट्स डीप वेब वर कुठेतरी सापडल्या असत्या. सध्या लोक गावठी कट्टे बनवतात तसे लोकान्नी घरातल्या गाड्यांच्या काचा काढून(कर्व्हेचर वाल्या)त्यान्ना पॉलीश वगैरे करून गावठी कॅमेरे बनवले असते. मग त्यांची तस्करी वगैरे. मग सर्फरोश वगैरे सारख्या सिनेमाच्या व्हिलनने, ‘उस जीलेटीन एमल्शन बिना ईस हाथीयार की कीमत झीरो है!’ असे डायलॉग मारले असते. एखाद्या कार्यक्रमात ४-५ म्हातारे एकत्र जमले की अमेरीकन मिलीटरीकडच्या कॅमेर्यान्मध्ये एकद हाय एंड सेंसर्स कसे असतात आणि ‘आपण'(म्हणजे आपली आर्मी) अजून कसे जीलेटीनच्या फिल्मीन्मध्ये अडकलेलो आहोत, अशा गप्पा रंगल्या असत्या. न्यूजपेपरमध्ये ‘पूर्ववैमनस्यातून तरूणाचा फोटो काढून खून’ किंवा ‘मृत्युचे निश्चीत कारण अजून समजलेले नसून झोपले असताना फोटो काढला गेल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत’ अशी वाक्ये छापून आली असती. नॉर्थ कोरीयाकडे एक खूप मोठा कॅमेरा आहे ज्यातून रात्रीबेरात्री ते पूर्ण शहराचा फोटो काढू शकतात, अशा अफवा उठल्या असत्या. आणि काही दिवसान्नी किमबाबून्ने ही अफवा नसून सत्य असल्याचा जगाला निर्वाळा दिला असता.

बंदूकीची गोळी अंगावर कुठेही मारली तर माणूस मरत नाही, ती काही ठरावील जागांवर मारावी लागते. त्याचप्रमाणे झोपलेल्याचा फोटोची क्वालीटी काही ठरावीक क्वालीटीपेक्षा कमी असेल तर माणूस मरणार नाही. लोक हलणार्या पाळण्यान्मध्ये झोपा काढतील, ज्यामुळे कोणी फोटो काढलाच तर तो ब्लर्ड येइल. ‘जीवावर बेतल होत राव, पण फोटो अगेंस्ट लाईट आल्यामुळे बचावलो’ असले डायलॉग सर्रास ऐकू येतील. जंगलात कॅमेरे वापरून कोणी ईल्लीगल शिकार करत असेल तरी त्याला ज्याला मारायच आहे त्या प्राण्याचा फोटो व्यवस्थीत ब्रीदींग स्पेस वगैरे देवून काढावा लागेल. (ईन द रेट्रोस्पेक्ट, या ठीकाणी बंदूकच सोयीची पडेल). कॉफी आणि झोप न आणणार्या गोळ्यांचा खप प्रचंड वाढेल.

हे अस खरच झाल तर फोटोग्राफी ही कला आहे का नाही या वादावर मात्र नक्कीच पडदा पडेल. झोपलेल्याचा फोटो काढलेला मेला तर फोटो पर्फेक्ट होता, नाहीतर नाही!

पण बर झाल अस काही होत नाही. शेवटी फोटो म्हणजे तरी काय असत? सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न! एकदाही मागे वळून न पाहता पुढे पुढेच जात राहण तस क्रूरच, नाही का?

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)

One thought on “अंधश्रद्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: