ओळख राशींची – वृश्चिक

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनू
मकर
कुंभ
मीन

वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास आहे. ‘विंचू’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही जल तत्त्वाची व स्थिर रास आहे. ही स्त्री राशी व बहुप्रसव रास आहे. ‘मंगळ’ या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. भक्ष मिळविण्यासाठी टपून बसलेला विंचू हे या राशीचे स्वरूप आहे. मंगळ हा ग्रह उग्र आहे. तामसी आहे. आपल्याकडे यामुळे असामान्य धर्य, दृढ इच्छाशक्ती, विलक्षण मनोबल या गोष्टी असतात. काम परिपूर्ण करण्यासाठी जी चिकाटी लागते, जे सातत्य लागते, ते आपणाकडे असते. एखाद्या कामाला चिकटून बसणे, ते काम परिपूर्ण करणे याला जी चिकाटी व सातत्य लागते ते आपल्याकडे भरपूर असते.

आत्मसंयमन, विवेक, निग्रह, निश्चयात्मकता, निर्धार या ज्या गोष्टी यशासाठी लागतात, त्या आपणाकडे भरपूर आहेत. कोणतेही काम मनावर घेतल्यानंतर ते तडीला नेण्याची, ते काम शेवटापर्यंत नेण्याची जी निग्रह शक्ती लागते ती आपणाकडे असते. अव्याहतपणे, अप्रतिहतपणे, अविरतपणे, अखंडपणे काम करण्यामुळे यश मिळविण्याच्या बाबतीत वृश्चिकव्यक्ती आघाडीवर असतात. एखाद्या कामाचा ध्यास घेणे, परिपूर्णतेने त्यात मन ओतून काम करणे, जीव ओतून काम करणे, उत्कटतेने काम करणे व एकाच ध्येयावर लक्ष ठेवून ते काम पार पाडणे यामध्ये वृश्चिकव्यक्ती नि:संशयपणे यशस्वी होतात. मंगळाची ही रास असल्यामुळे आपली रास लढावू आहे. अत्यंत उत्साहाने, आशावादीपणाने, तडफेने काम करणारी आपली रास आहे. संकटाला सामोरी जाणारी, कठीण काळात न डगमगणारी, हार न मानणारी, शरण न पत्करणारी आपली रास आहे. रणांगणावर चमकणारी, क्षात्र तेजाने लढणारी आपली रास आहे. त्यामुळे पोलीस क्षेत्रात, सनिक क्षेत्रात, ज्या ज्या ठिकाणी धाडसाची, आत्मविश्वासाची, धर्याची गरज आहे, त्या ठिकाणी आपण यशस्वी होत असता. कोणत्याही कामात शिखर गाठणे, यशाच्या टोकापर्यंत जाणे, एखाद्या क्षेत्रात उच्चांक प्रस्थापित करणे यामध्ये वृश्चिकव्यक्ती अधिक आढळून येतील.

आत्मसंयमन, मनोबल व विवेकशक्ती या गोष्टी वृश्चिकराशीकडे मोठय़ा प्रमाणावर असतात. तपश्चार्या करण्याकरिता, व्रत, वैकल्य, यम-नियम व कसलेही काबाडकष्ट करण्याची वृश्चिकराशीची तयारी असते. कष्ट करण्यात वृश्चिकव्यक्ती कोणालाही हार जाणार नाही. आपल्याकडे महत्त्वाकांक्षा असते. आपला आपल्या कार्यशक्तीवर, बुद्धिमत्तेवर, आपल्या अंगभूत गुणांवर प्रचंड विश्वास असतो. चिकाटी, सातत्य, आत्मविश्वास यामुळे स्पर्धा परीक्षा, आयएएस, आयपीएस अशा ठिकाणी वृश्चिकव्यक्ती विशेष आढळून येतील. तसेच सन्यात व पोलीस दलात वृश्चिकव्यक्ती विशेष कामगिरी करताना आढळून येतात. तसेच मोठमोठय़ा कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, उद्योग समूहामध्ये वृश्चिकव्यक्ती अधिक आढळून येतात. कोणतेही मोठे काम अंगावर घेऊन पार पाडण्याची धमक व कुवत वृश्चिकव्यक्तींकडे असते.

आपण कोणाच्याही सहजासहजी आहारी जाणार नाही. भावनेच्या आहारी न जाण्याचा आपला स्वभाव असतो. आपल्याकडे महत्त्वाकांक्षा आहे. मुत्सद्दीपणा आहे, धोरणीपणा आहे, थोडासा कावेबाजपणा आहे. आपल्या स्वत:कडे आत्मशक्ती, आत्मविश्वास व कर्तृत्व विशेष असल्यामुळे कुटुंबातील, घरातील व्यक्तींनी आपल्या तंत्राप्रमाणे, आपल्या धोरणाप्रमाणे, आपल्या अधिपत्याखाली वागावे असे वाटत असते. आपले वागणे थोडेसे अधिक निष्ठूर व कडक असते. कोणताही कठोर निर्णय घेण्यासाठी आपण मागे-पुढे पाहणार नाही. आपल्यात चाणाक्षपणा आहे. दुस-याच्या मनात काय चालले आहे, ही जाणण्याची आपल्याकडे कुवत आहे. सर्वत्र चौफेरपणे लक्ष देण्याची आपली पद्धत आहे. आपल्याकडे प्रसंगावधान आहे.

कोणत्याही गोष्टीत आपल्याला उधळमाधळ चालणार नाही. प्रपंच किंवा संसार वृश्चिकव्यक्ती अतिशय व्यवस्थितपणे, शिस्तीने व काटकसरीने करणार. वृश्चिकव्यक्तींना बेशिस्त व आळशीपणा चालणार नाही. आपल्याकडे चाणाक्षपणा अधिक आहे. भाबडेपणा, भोळेपणा या गोष्टी आपणाकडे चुकून सापडणार नाही. दुस-याकडून फसवले जाण्याची शक्यता फार कमी असते. यामुळे सीआयडी खात्यात, हेर खात्यात, गुन्हा अन्वेषण खात्यात, संशोधन क्षेत्रात वृश्चिकव्यक्ती अधिक यशस्वी होतात. नाकासमोर चालण्याचा आपला स्वभाव आहे. आपले काम, आपला व्यवसाय व आपले कुटुंब याच्या पलीकडे न जाण्याचा आपला स्वभाव आहे.

काही वृश्चिकव्यक्तींकडे अतिंद्रीय ज्ञान असू शकते. गूढशक्ती असू शकते. संमोहन शक्ती असते त्यामुळे इतरांवर प्रभाव पाडण्यासंदर्भात वृश्चिकव्यक्ती पुढे असतात. काहींच्याकडे अतिंद्रीय शक्ती व अद्भुत शक्ती असते. कोणत्याही गोष्टीचे आपण योग्य मूल्यमापन करू शकता. त्यामुळे काही व्यक्ती मांत्रिक असू शकतात, चमत्कार करू शकणा-या असू शकतात. सर्व राशींमध्ये वृश्चिकरास ही अत्यंत गुंतागुंतीची रास आहे. वृश्चिकराशीमध्ये गुणावगुणांचे विलक्षण मिश्रण झालेले असते, गुंतागुंत असते. त्यामुळे वृश्चिकव्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण करणे हे थोडे अवघड कारण या राशीमध्ये अत्यंत टोकाच्या, चांगल्या व अत्यंत टोकाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळून येतील. कारण या राशीचा स्वामी जो मंगळ आहे. तो कशा स्वरूपाचा आहे, याच्यावर बरेचसे अवलंबून आहे. त्यामुळे या राशीचे परीक्षण करणे हे ज्योतिषांना आव्हान आहे.

वृश्चिकरास व विशाखा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – अल्प क्रोधी, लहानसहान बोलण्याने उत्तेजित होणारे, वादविवाद करणारे, आरडाओरडा करणारे; परंतु संवेदनशील, जिज्ञासू, भावुक, परिवाराची काळजी घेणारे.

वृश्चिकरास व अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – हौशी, कलाकौशल्याची आवड असणारे, गायन, वादन, नृत्यकला आवडणारे, न्यायप्रिय, मन मानेल तसे करणारे, आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारे, गुप्त कार्यात निपुण, खोटे भाष्य करणारे, काही वेळा दुस-यांचे न ऐकणारे, हट्टी, सूड घेण्याची वृत्ती.

वृश्चिकरास व ज्येष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – उत्तम कार्यशक्ती, वादविवादपटू, स्पष्टवक्तेपणा, ऐश्वर्यशाली, धार्मिक, धनयुक्त, उत्तम स्मरणशक्ती, साहित्य, गूढशात्र इत्यादींची आवड असणारे, परस्त्रीची अभिलाषा बाळगणारे, काहीवेळा मत्सरी व सूड घेणारे

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
विशाखा नक्षत्र – तो
अनुराधा नक्षत्र – ना, नी, नू, ने
ज्येष्ठा नक्षत्र – नो, या, यी, यू

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: