२८.१२ आजचा विचार

कुणासाठी स्वतःला इतकंही विसरू नये की जगण्याचे खरे अर्थच बदलून जातील. शेवटी तुमच्यापासून दुरावलेली व्यक्ती देखील स्वतःच असं नशीब घेऊन जन्माला आलेली असते. तिचा तुमच्या आयुष्यातला शेअर संपला की ती निघून जाते.जी माणसं अधिक सोबत राहतात त्याच्याशी तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध अधिक काळासाठी ठरलेले असतात इतकच पण शेवटचा प्रवास हा आपला आपल्यालाच एकट्याने करायचा असतो.
एकूणच जीवनाचा एकांगी विचार करणं सोडायला हवं…सहवासात येणारी काही माणसं हवीहवीशी असूनही वेगळी होतात कारण तुमच्या पलीकडे त्यांचं प्राक्तन इतर अनेकांशी जोडलेलं असतं. त्यांच्याही जगण्याचा परीघ आखलेला असतो…. आपण फक्त आपल्या पुरताच विचार करतो आणि दुःखी होतो…
कठीण आहे पण तरीही थोडी अध्यात्मिक विचारसरणी अनुसरावी ज्यायोगे मनाला पोळणारी वेदनेची झळ थोडी कमी त्रासदायक होऊन आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल..
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)