स्त्रीप्रधान

एका राजाने,
एक सर्व्हे करायचा विचार केला .
आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतं
बायको की
स्वतः नवरा,,,,,??
🤷🏻‍♂🤷🏻‍♂
त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,
ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात येईल,
आणि
ज्यांचं घर बायकोच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक सफरचंद मिळेल,,🍎

त्यानंतर राजवाड्यात रांग वाढत गेली होती
प्रत्येक जण येत होता आणि गुपचूप दिलेलं बक्षीस सफरचंद घेऊन जात होता.
मात्र इकडे राजाला चिंता लागून राहिली होती काय ही आपल्या राज्याची दशा इतका मोठा महापराक्रमी मी
माझ्या राज्यातील लोक हे असे 😏❓😡
बायकोच्या इशाऱ्यावर घर चालवतात? 🤔🤔🤔
इतक्यात एक पिळदार शरीराचा उंच, धिप्पाड, लांब लांब मिशा असणारा एक पहिलवान दरबारात आला आणि म्हणाला महाराज मला द्या घोडा, माझ्या घरात माझाच हुकूम चालतो.
हे ऐकून राजा खूप खुश झाला,
जा तुला हवा तो, आवडेल तो, घोडा खुशाल घेऊन जा.
राजा मनोमन खुश झाला साला एक तरी गब्रू जवान मिळाला आपल्या राज्यात ज्याच्या इशाऱ्यावर त्याचं घर चालतं.
😀😀 इकडे तो पिळदार पैलवान काळा घोडा घेऊन गेला आणि,,,
थोड्याच वेळात घोडा घेऊन परत आला🤔

राजा:- काय पैलवान काय झालं परत का आलात❓
पैलवान :- माझी बायको म्हणाली काळा रंग अशुभ असतो आणि सफेद हा शांतीच प्रतीक असतो तुम्ही सफेद घोडा आणा. 😭😭😭

हे ऐकून राजाला खूप राग आला तो म्हणाला ते समोर सफरचंद ठेवलंय ते गुपचूप उचल आणि चालू पड. 😡😡

अशा पद्धतीत दिवस संपला,
दरबार रिकामा झाला.
पण राजा विचार करत तिथेच बसला होता. तितक्यात घरी गेलेला प्रधानजी परत आला आणि राजाला म्हणाला
राजे साहेब एक सुचवू का??
तुम्ही जे बक्षीस ठेवलं आहे त्या ऐवजी थोडं वेगळं म्हणजे एक मण गहू किंवा किंवा सोन्याची मुद्रा असं काही बक्षीस ठेवलं असतंत तर पहिलवान परत आला नसता आणि तुम्ही पण खुश राहिला असतात. 😒

राजा : प्रधानजी अहो मी देखील असंच काहीसं बक्षीस ठेवणार होतो
परंतु राणी सरकारांनी सांगितलं घोडाच बक्षीस म्हणून ठेवा.
👊🤛👊🤛😏😏😡😡😂😂😂😂
मग काय ठेवलं तेच बक्षीस!! 😔😔
प्रधानजी:- 🧐🧐
महाराज एक सफरचंद तुमच्यासाठी कापू 🤪🤪
राजा सुध्दा त्याच्या हसण्यात सामील झाला आणि म्हणाला पण प्रधानजी हे तर उद्या दरबारात देखील विचारु शकला असतात. तुम्ही इतक्या उशिरा परत का आलात विचारायला❓
प्रधानजी:-
काय सांगू राजे साहेब बायकोचा हुकूम. 😏😔😡 ती म्हणाली आताच्या आता जा आणि या नक्की विचारून म्हणून…..
राजा:- त्याच बोलणं थांबवत राजा म्हणाला, *प्रधानजी तुम्ही तुमचं सफरचंद स्वतः घेऊन जाताय की टोपली घरी पाठवू😂

Moral Of The Story:

समाज कितीही समाज पुरुष प्रधान असेल पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल. संसार स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान वगैरे अफवा आणि अंधविश्वास आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका..!!😂तर मग मित्रांनो तुमचं सफरचंद इथेच खाणार की घरी घेवुन जाणार😂

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: