कविता: Whatsapp Admin साठी
सोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं
आईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं
‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट
अँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट
जरी त्यात त्याची काहीच नसते चुक,
तरी सुद्धा बिचा-याला रहावं लागतं मुक
सर्वांचे हित त्याला मनात धरावे लागते,
ईच्छा नसली तरी एखाद्याला ‘रिमूव’ करावे लागते
काही सन्माननीय सदस्य कायम असतात गप्प,
ग्रुपचा कारभार तेव्हा होऊन जातो ठप्प
तरी सुद्धा त्याला मुकाट्याने बसाव लागतं,
ईच्छा नसली तरी उगीच हसावं लागत.
प्रवास करावा आम्ही त्याला भरावा लागतो टोल,
चुकीच्या पोष्ट चे त्यालाच चुकवावे लागते मोल
अल्प मतातील सरकार सारखं त्याला निमुट बघावं लागतं,
कितीही चढला पारा तरी शालिनतेनं बघावं लागतं
स्वतः दुखःत राहून वसवतो आनंदाचे गाव,
माझ्या मते त्याचे अँडमीन ऐसे नाव
बाकी सब बकवास है.
अंधारलेल्या वाटे साठी तारा असतो अँडमीन,
गुदमरणा-या जिवा साठी वारा असतो अँडमीन
रखरखणा-या वाळवंटातील हिरवळ असतो अँडमीन,
अत्तराच्या कुप्पीतील दरवळ असतो अँडमीन
सुदाम्याच्या मनाची ओढ असतो अँडमीन,
शबरीच्या बोरासारखा गोड असतो अँडमीन
किलबिणा-या पाखरांचा थवा असतो अँडमीन,
भळभळणा-या जखमेसाठी दवा असतो अँडमीन
कोकिळेच्या कंठातील गित असतो अँडमीन,
यशोदेची हळवी प्रित असतो अँडमीन
कधी कधी फुल कधी अंगार असतो अँडमीन,
लढणाऱ्याच्या शमशेरीची धार असतो अँडमीन
बहरणा-या प्रतिभेचा श्रुंगार असतो अँडमीन,
सरस्वतीच्या गळ्यातील हार असतो अँडमीन
एक गोष्ट ध्यानात ठेवा ऊगीच नसतो अँडमीन,
तुम्ही झोपी गेलात तरी जागीच असतो अँडमीन
कर्णा सारखं भरभरून दान देतो अँडमीन,
बघा बरं किती मोठा मान देतो अँडमीन
तुमच्या हाती हुकुमाचं पान देतो अँडमीन,
स्वतःच्या काळजात स्थान देतो अँडमीन
शब्दांच्या दरबारावर पहारा देतो अँडमीन,
सारे सोडून जातात तेव्हा सहारा देतो अँडमीन
वा-यावर झुलणारं पातं असतो अँडमीन,
जिवापाड जपावं असं नातं असतो अँडमीन
अजून काय लिहू? बाकी सारं कॉमन आहे,
एवढंच म्हणतो शेवटी अँडमीनजी फक्त तुमच्यासाठी…
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)