Last Name
आज कॉलेजला सुट्टी होती.. बायको मुलांसोबत बाहेर गेली होती.. मी गच्चीत बसून पावसाचा आनंद घेत होतो…
आणि मला ते दिवस आठवायला सुरू झाले…
पावसाळ्याचे दिवस होते मी नुकताच कोल्हापूर ला रहायला आलो होतो.. अगदी आवडीने नाही पण जॉब तो मिळाला म्हणून मी lectureship स्विकारली होती… त्यामुळे मी तितकासा excited नव्हतो.. कोल्हापूर ला आल्यानंतर आठवड्यात माझं कॉलेज सुरू झालं… मी जॉईन झाल्यानंतर मला कळलं की माझा एक मित्र आशिष ही तिथेच जॉब करतो.. मी थोडा रिलँक्स झालो.. मग काय आमच्या गप्पा चांगल्या रंगायच्या.. तो एक वर्षापूर्वी लागला होता तिथे जॉबला लागला होता.. पहीला महीना असाच गेला.. मी बर्यापैकी रुळलो होतो..
एक दिवस असचं आमचं department सोडून canteen ला जात असताना दोन मुली canteen मधून बाहेर येताना दिसल्या.. मी त्यांना पहील्यांदा च पहात होतो.. त्यांचे लक्ष नव्हतं आमच्याकडे.. आशिष मला काहीतरी सांगत होता.. पण माझी नजर त्या मुलींमधल्या एकीवरुन हललीच नव्हती.. त्या दोन मिनीटात मी तिची प्रत्येक हालचाल टिपली होती.. मी आशिष बोलत असताना मी त्याला मध्येच विचारल… , “त्या कोण आहेत.?”
त्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला , “ह्या… मानसी मँम आणि सुप्रिया मँम.. cs department”
“ ओ…” मी म्हणालो… इतक्यात त्या समोर आल्या..
आशिष त्यांच्यासोबत बोलू लागला.. त्याने माझी ही ओळख करून दिली..
“ मंदार ह्या मानसी मँम आणि ह्या सुप्रिया मँम cs department…”
मला तेव्हा तिच नाव कळलं मानसी.. किती सुंदर नाव आहे तितकीच सुंदर ती… तिने handsheak करता हात पुढे केला.. मी क्षणाचाही विलंब न करता लगेच हात तिच्या हातात दिला…. आशिष बोलण्याची वाट न पहाता मी स्वतःची ओळख स्वतः च करुन दिली..
“मी मंदार.. मंदार पाटील… Mechanical department.”
ती गोड हसली.. हसत हसत तिने माझा हात सोडला.. मी तिच्या चेहर्याकडे एकटक पाहत होतो… Formality म्हणून मी सुप्रिया च्या हातात ही हात दिला.. त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या… मी मात्र मनाने अजूनही तिथेच होतो.. राहून राहून मला तिचं ते हस्य आठवत होत..
त्यानंतर माझी शोध मोहीम सुरू झाली… पण अजूनही मी confuse होतो.. नक्की मला ती आवडते की नाही.. एकदा पुन्हा त्याच canteen च्या वाटेवर ती मला दिसली.. मी आशिष सोबत होतो.. आणि ती सुप्रिया सोबत.. पण यावेळी ती canteen मध्ये चालली होती. आशिषने तिला आमच्यासोबत चहाला चला असा आग्रह केला… आणि ती तयार ही झाली…
पूर्ण चहा होईपर्यंत माझ्या तोंडून एक अक्षर ही निघालं नव्हतं.. निघणार तरी कसं जी रोज स्वप्नात येते ती समोर बसली होती.. तिच्यावरुन नजर हलली तर मला सुचेला ना बोलायचं… मी सार काही observe करत होतो, तिची चहाचा कप पकडण्याची पद्धत.. वाक्या-वाक्या ला बदलणारे तिचे हावभाव.. हसताना गालावर पडणारी छोटीशी खळी.. सार काही…
त्या दिवसानंतर ती माझ्याशी ही बोलायला लागली होती.. Semister बदलली आणि माझे lectures first year ला लागले… मी खूप वैतागून गैलो होतो lecture ला.. मला first year ला lecture नको होते.. कारण फक्त एकच होत दोन मजले उतरुन खाली जाव लागायचं.. माझं lecture सुटून पाच मिनीटे झाली होती.. मी तरीही क्लास मध्येच होतो.. इतक्यात दार नॉक झालं.. मी बाहेर आलो तर मानसी होती दारात.. मला पहाताच तिने छान smile दिली..
“ hi.. Good morning… तुमच lecture असत का आधीचं.. वाह… बरं झालं म्हणजे कधी लेट झाला तर तुम्ही extent कराल…”
“ हहह.. हो.. Sure why not.. तुम्ही या निवांत..”
“ ok..bbye नंतर भेटू..”
“ हा… Byee.,”
आता मी ते जिने चारदा उतरायला ही तयार होतो… मी नंतर रोज काही ना काही बहाण्याने तिचं lecture संपेपर्यन्त तिथेच थांबायचो.. आणि तिच्यासोबत वरती यायचो.. तिचं सगळं काही perfect असायचं.. Lecture ची वेळ, प्रत्येक dress ला suit होईल असाच look.. इतके दिवसात मी तिला इतक नक्कीच ओळखलं होतं की ती कुठेही adjust होऊ शकते.. अगदी high class party मध्ये सुद्धा आणि घरी सत्यनारायणाच्या पुजेला सुद्धा..
आमचं बोलणं आता फोनवर ही होत होतं.. तिला मनातल सांगायचं होत.. पण धाडस होत नव्हतं..
एक दिवस आशिष चा मला फोन आला..
“मंदार… यार प्रोब्लेम झालाय…”
“काय रे काय झाल..”
“तु कुठेस.. मी येऊ का रुमवर..”
“आश्या ये ना.. विचारतोस काय…”
आशिष येईपर्यंत मी tension मध्ये होतो.. काय झाल असेल.. मनात नाही नाही ते विचार येऊन गेले.. आशिष आला.. तो खूप depressed वाटत होता. मी काही विचारायच्या आधीच तो म्हणाला…
“यार… ती नाही म्हणली यार आता..”
“कोण..??? काय बोलतोय तू..??”
“मानसी..”
नाव ऐकून मी सुन्न झालो होतो.. “हे काय नवीन… मानसी.. माझी मानसी आशिष ला आवडते…”
त्याने त्याच उरलेलं बोलणं पूर्ण केल..
“मानसी नाही म्हणते रे… म्हणते की मी कधीच तसा विचार केला नाही.. आणि करु ही शकत नाही..”
मी निशब्द होतो बोलणार तरी काय होतो.. त्याच्या इतकाच मलाही धक्का बसला होता..
“तू कधी विचारलं तिला याबाबतीत..???” मी आशिष ला विचारलं..
“मला ती आधीपासून आवडते रे.. फक्त बोललो नव्हतो.. ती support करते प्रत्येक गोष्टीत मला.. आणि मी त्याचा अर्थ लावला की, तिला पण मी आवडतो..”
मी अजूनही confuse होतो काय react होऊ.. मी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन बसून होतो. आशिष थोड्यावेळात झोपून गेला.. मी मात्र रात्रभर जागा होतो.. १०० वेळा आमचे जूने conversations वाचत.. तिचे ४ मेसेज आले होते पण मी एकही रिप्लाय केला नव्हता…
दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ती पुन्हा समोर आली.. पुन्हा त्याच उत्साहानं ती म्हणाली…
“ good morning.. Hows u..??? झोप नाही का झाली..”
अरेच्चा..!! हिने कस काय ओळखलं.. मी shock झालो..
“Good morning.. हा तब्येत बरी नाही..”
“ohhh take care.. का आलात मग… रेस्ट घ्यायची ना..”
“no.. Its fine..”
“still take care”
अस बोलून ती क्लास मध्ये गेली.. मी आज थांबलो नाही… थोड मन कठोर केल आणि तिला न सांगताच वर निघून आलो.. मी तिला avoid करायला सुरू केल होत.. मला माझा आशिष होऊ द्यायचा नव्हता.. जर नसेल मनात तर आहे ते नात सुद्धा गमवायचं नव्हतं.. मी तिला पाहायचो पण तिच्या नकळत.. अवघ्या ३ दिवसात तिला कळलं होतं ते.. आणि तिसर्या दिवशी संध्याकाळी तिचा मला फोन आला.. मी आजही तो दिवस विसरु शकलो नाही..”
(Present day)
“बाबा…”
मी गच्चीतून हॉलमध्ये आलो… बायको आणि मुलं परत आली होती.. विरेन विहान दोघे ही पळत पळत येऊन मला बिलगले..
“आई कुठे आहे..??”
“ही काय आली ना..”
“चला.. Change करा पटकन..” बायको मुलांना घेऊन रूम मध्ये गेली… इतक्यात door bell पुन्हा वाजली… मी दाराकडे पाहील..
“मानसी मंदार पाटील… पार्सल आहे..”
मी गालातल्या गालात हसलो.. तोपर्यंत ती पुन्हा बाहेर येऊन पार्सल घेऊन आत गेली ही.. “मानसी मंदार पाटील.. त्या दिवशी संध्याकाळी फोनवर हुंदके देत देत ती हेच म्हणली होती..
(Past day)
“hello.. मानसी मँम बोला ना..”
“dnt be formal tell me why are u ignoring me,.???
“मी.. आहो…”
तिच्या हुंदका ऐकू आला मला इतक्यात..
“मानसी काय झाल..,,”
“तेच मी विचारत आहे ना मी.. का avoid करत आहेस मंदार..??”
ती एकेरी नावाने बोलावत होती..
“अग.. तस काही नाही आहे..”
“मग कस आहे.. मंदार can I ask something.???”
“yess..”
“ Can I use ur name as my last name..??”
मी पुन्हा shock होतो…
“मंदार बोल ना..”
“ sure manasi… Actually मीच हे विचारायला हव होता.. मला खूप आवडेल… मानसी मंदार पाटील..”
तेव्हा पासून आजपर्यंत मला तिचं नाव घेतल की ती संध्याकाळ नक्की आठवते….
~ काजल कामिरे.
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)