जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत?
- सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात.
- तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच.
- कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना जरा सांभाळून फिरावे, तिच पहीलं प्रेम तुमच्या आजूबाजूला असु शकते”.
- कोणतीच जीवंत व्यक्ति २४ तास पुर्णपणे खुश राहु शकत नाही पण काही लोक असे आहेत कि ते २४ तास दुःखी राहु शकतात.
- लढाई कुठलीही असो, अगोदर सामान्य माणसालाच बळी जावं लागतं. राजा स्वतः कधीच सुरुवातीला लढत नाही.
- इथे जवळपास प्रत्येकजण भिकारी आहे. गरीब लोक श्रीमंताकडे भिक मागतात आणि श्रीमंत लोक देवाकडे मागतात.
- आजकाल व्हर्जिन या शब्दाचा खुपच वापर वाढला आहे. “माझा जोडीदार व्हर्जिन असो किंवा नसो मला काहीच फरक पडत नाही, व्हर्जिन असणे किंवा नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे”, असं म्हणणारे ७०% लोक स्वतः व्हर्जिन नसतात.
- जे लोक आयुष्यात खुप जास्त वेळेला हरलेले असतात ते आयुष्यात खुप मोठ्ठे होतात नाहीतर आत्महत्या करतात.
- आजच्या काळात सेक्युरीटी(सुरक्षितता) ही गोष्ट फक्त दिखावा करण्यासाठी अस्तित्वात आहे, अगदी लोकशाही सारखीच.
- कर्म खुप भयंकर गोष्ट आहे. कोणाचं वाईट केलं तर आपलं वाईट कधी ना कधी होणारच.
- माणसापेक्षा निसर्ग खुप बलवान आहे. निसर्गाने ठरवलं तर निसर्ग खुप जिवितहानी करु शकतो.
- लहानपणी पुस्तकात वाचत होतो, ” गर्वाचे घर खाली”. हे सत्य कधीच बदलणार नाही.
- इथे प्रत्येकजण स्वतःची एक वेगळीच लढाई लढत असतो. लोक अजूनच त्या लढाईत भर घालतात.
- लोक म्हणतात प्रेम एकदाच होतं, असं काही नाही. प्रेम कितीही वेळेला होऊ शकतं.
- एकवेळेला वाघावर विश्र्वास ठेवणे चांगले पण माणसावर विश्वास ठेवताना खुप विचार करावा लागतो.
- कुठल्याही टिव्हीवर दिसत नसली तरी भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीत तीव्र मंदी आहे. ‘कमीतकमी’ पुढचे दोन-तीन वर्षे सामान्य माणसासाठी खुपच कठीण आहेत.
- आपण सर्वच गोष्टी चांगल्याप्रकारे करू शकत नाही, आणि त्यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही.
- सोशल मीडिया वरील आनंदी फोटो आणि रोजचे खरे जीवन यात खुप मोठा फरक आहे.
- पुढारी तोच होऊ शकतो जो एकदम काटेकोरपणे खोटं बोलतो.
- तुमचं आयुष्य हे तुमच्या शिवाय दुसरं कोणीही बदलू शकत नाही. पण तुमचं आयुष्य बदलल्यावर खुप जण त्यांनी तुमच्या डोक्यावर कसा हात ठेवला हेच सांगत फिरतात.
- अटळ कठोर सत्य – हे उत्तर लिहीणारा (मि स्वतः) आणि वाचणारे सर्वजण, आपण कितीही प्रयत्न केले, कितीही पैसे खर्च केले तरी कधी ना कधी मरणार आहोत, कधी ते कोणालाच माहित नाही. (फक्त लवकर मरु नयेत हीच इच्छा).
थोडक्यात सांगायच झाल तर आपल्या आयुष्याच्या पुस्तकातले पहीले आणि शेवटचे पान अगोदरच लिहुन ठेवले आहेत. आतल्या सर्व पानांचे लेखक आपण स्वतः आहोत. पुस्तक चांगल्या प्रकारे लिहायचं की वाईट लिहायचं ते आपल्या हातात आहे.
धन्यवाद !!!
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
सामान्य माणुस कध्च स्वतंश्रपणे विचार करु शकत नाहि.कुणितरि बोलले, लिहिले तेच त्याच्या विचीराचे मुळ असते
खरे लिहिले आहे ,सर्वांना हे समजते पण कळत नाही. आपण योग्य शब्दांत लिहिले आहे.
Thank you 🙂