नीरजा भनोत

आज आपल्या पैकी खुप जणांना नीरजा_भनोत कोण हे ही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने १९८६ साली  तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवीले आणि वयाच्या २३ वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हां वीरता पदक मिळविनारि भारतीय ठरली होती . पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला  विसरून गेले.

नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am ७३ या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी.

५ सप्टेम्बर १९८६ मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am ७३ एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. निरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते.

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते .

निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले .

निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले. निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे  सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या.

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यां पैकी तिन जणांना मारून टाकले. निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला. निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तीचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला .

निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे .

भारताने निरजाला ‘अशोक चक्र‘ हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले .
पाकिस्तानने ‘तमगा-ए-इन्सानियत’ हां सर्वोच्च पुरस्कार दिला .
अमेरिकेने ‘जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड’ हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .

संकलन/संपादन: टीम स्पंदन
साभार: लेखक/कवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: