ब्लॉक अनब्लॉक
मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔
थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल..
हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते ब्लॉक करतात..🚫 नंबर ब्लॉक होतो 🚫 😪.
परंतु प्रेम ब्लॉक होतं का..? आठवणी ब्लॉक होतात का..? तर नाही..☺ ज्या आठवणी कायमच्या ह्रदयात ब्लॉक असतात..त्या अशा नंबर ब्लॉक करून मिटतात का..?
हो..त्या माणसांचा संवाद थांबतो एकमेकांशी होणारा..पण एकमेकांचे विचार थांबतात का..? विचार ब्लॉक होतात का..? पण संवादाची जागा वादानी घेतली की नंबर ब्लॉक होतो..हे कटु सत्य आहे 😪 परंतु नंबर ब्लॉक करण्याऐवजी आपल्यातल्या अहंकारालाच ब्लॉक 🚫 केले तरच नंबर अनब्लॉक होईल..👍☺
माणसं अहंकाराच कवच इतकं कठिण करुन का फिरतात 😇😇
आपल्याच माणसांसाठी आपण हे कवच फोडू शकणार नाही का..?
अहंकार ब्लॉक केला तर प्रेम हे अनब्लॉक होईल..आपल्या प्रियजनांसाठी आपण एक पाऊल स्वतः उचलले तर..स्वाभिमान ज्याला आपण म्हणतो तो कमी होतो म्हणे..असं मन सांगत..
अरे अहंकारी मन जपण्यात कसला आलाय रे स्वाभिमान..ब्लॉक करण्यासाठी एकमेकांच्याजवळ किती वाईट गोष्टी आहेत..??
कि ती म्हणजेच राग, द्वेष, मत्सर, गैरसमज, कटुता..हे सगळं ब्लॉक करूया कि..नंबर ब्लॉक केल्याने हे सगळे जिंकतील रे..!!
तूम्ही यांना फक्त २ दिवस ब्लॉक करून पहा..मगच तूम्हाला कळेल एखाद्याचा प्रेम रूपी मोबाईल कितीदा रिंगटोन देऊन गेलाय तुमच्या मनात..एकदा तुही कॉल करुन पहा एखाद्याच्या प्रेमाला..मग मला सांगा तुमच्या प्रेमाची जी कॉलरट्युन तुम्ही ठेवलीए ती किती गोड वाजते ते..ती ऐकण्यात मंत्रमुग्ध व्हाल तुम्ही..!!!
पण एकदाच एखाद्याचे प्रेम अनब्लॉक करून तर पहा..एकदा तर रिसीव्ह करून पहा एखाद्याच्या मनाचा कॉल..मगच ठरवा..हवं तर..त्याच्या तूमच्या मनातील भावना..नंतर च ठरवा ब्लॉक करायचे की अनब्लॉक..!!!
” आयुष्य खूपच सुंदर आहे ” 🏞
तूम्हीही आनंदाने जगा व दुसऱ्यांनाही आनंदात राहु द्या. ❤☺👍🙏