स्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता
🟠
नोबेल पारितोषिक विजेते
सुप्रसिद्ध भारतीय साहित्यिक
स्व. रवींद्रनाथ टागोर यांची एक
सुंदर कविता –
जेव्हा मी नसेन,
तेव्हा माझ्यासाठी
तू घळघळा रडशीलही,
पण ते मला कसं कळणार
त्यापेक्षा आज
माझ्यासमोर रड ना….
तू माझ्यासाठी पुष्पगुच्छ
पाठवशील,
पण ते पहायला मी नसेन
मग मी असतानाच
मला तू तो दे ना….
तू माझ्याबद्दल
खूप छान बोलशील
पण मला ती ऐकू नाही येणार.
त्यापेक्षा मी असतानाच
बोल ना…..
माझ्या चुकांसाठी तू
मला माफ करशील
पण मी समोर नसेन…..
मग मी असतानाच
मला क्षमा कर ना….
तेव्हा तुला माझी आठवण येईल
पण तुझी भावना
मला कळणार नाही…
मग मी असतानाच मला भेट ना…
तेव्हा तुला खूप वाटेल
माझ्यासोबत
आणखी वेळ देता आला असता तर,
मग मी असतानाच
मला वेळ दे ना….
मी गेल्याचं तुला कळेल
तेव्हा नाहीतरी
मला श्रद्धांजली वाहायला तू
माझ्या घरी येशील, पण कित्येक
वर्षांपासून आपण साधं
बोललोही नाही.
बघ, लक्ष देऊन ऐक आणि मला
आताच उत्तर दे….
आपल्या सभोवती असलेल्या
प्रत्येकाला मग ते आपले
कुटुंबिय, मित्र वा परिचित
असोत, वेळ द्या आणि त्यांना
आनंदी ठेवण्यासाठी आपल्या
प्रयत्नांची पराकाष्ठा करा कारण
काळ केव्हा त्यांना आपल्या
नजरेसमोरून नेहमीसाठी दूर
नेईल याची आपल्याला
कल्पनाही नसते….
एकटे असताना आपण केवळ
बोलू शकतो, साथीनं आपण
बोलणी करून शकतो.
एकटे असताना आपण
मौज करू शकतो,
पण साथीनं आपण उत्सव साजरा
करू शकतो.
एकटे असताना आपण केवळ
हसू शकतो, साथीनं हास्याचा
फवारा उडवू शकतो..।।
मनुष्याच्या नात्यांचं
हेच तर सौंदर्य आहे.
एकमेकांना नेहमी धरून रहा…।।
अतिशय साध्या शब्दात खूप मौल्यवान भावना पोचविल्या आहेत.
Thank you 🙂