हिशोब

सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो…..
.
नागपुरी व्यक्ती 😱 :- ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा…??
.
पुणेरी व्यक्ती 😒 :- (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात)
.
इतिहास दफ्तरी नोंद असल्याप्रमाणे मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीराव प्रथम द्वारा १० जानेवारी १७३० रोजी पायाभरणी तसेच २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुशांत केलेली इमारत म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात “शनिवार वाडा” 🏰 ती हिच….!!
.
भाषेवरून विदर्भातले वाटतात, 😒 गाव कोणते तुमचे..???🤔🤔
.
नागपुरी व्यक्ती 😏 :- जशास तसे या मुद्रेत येऊन…..
.
भारतीय उपखंडातील २१’८ उत्तर अक्षांश व ७९’५ पूर्व रेखांश मध्ये येणारे, मध्य भारतात ० मैल स्तंभ असलेले देशाचे केंद्रबिंदू, सिट्रस सिनेन्सिस 🍊 या लिंबु वर्गीय आंबट मधुर चवयुक्त फळाचे उत्पत्ति स्थान,
नाग नदीच्या काठी वसलेले, पुरातन कालीन संबोधले जाणारे दुहेरी अवतरण चिन्हात “फनिन्द्रपुर” वा “नारंगपुर” येथील मी रहिवाशी…!!
पुणेरी व्यक्ती 🤔 :- अहो म्हणजे काय..??
.
नागपुरी व्यक्ती 😀 :- भाऊ, नागपुरचा हायनं मी….!!
.
पुणेरी व्यक्ती 😡 :- अहो मग सरळ सोप्या भाषेत सांगायचे कि…
.
नागपुरी व्यक्ती 😔 :- भाऊ, तुम्ही मले इतिहास शिकवला, 📄 म्या तुम्हाले भुगोल🌍 शिकवला,
हिसोब,,,बराबर
😇😂😃😀😅😆😉😛😜😝😝

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: