लॉकडाउन आणि उद्योगधंदा
लिहावेस वाटले म्हणून…
लेखक: राजेश केशव शिंदे..
विषय :- लॉकडाउन आणि लॉकडाउन मधला उद्योगधंदा.

आज सर्वत्र पून्हा लॉकडाउन लागलय..
पण काही निम्मिताने ऑफिस गेलेलो. काम आटोपून दुचाकीवरून घराकङे येत असताना नकळत नजर एका बाकङे मांडून केळी विकणार्या मुलावर गेली.
जेमतेम २५ वर्षाचा असेल, खाली मान घालुन भर उन्हात ६ ते ७ ङझन केळी घेऊन बसला होता. तसे सकाळी ऑफिसात जाताना मी बघितलेतलेले त्याला, पण पुन्हा भर उन्हात बघून मनाला राहावले नाही.
गाङी नकळत बाकाजवळ थांबली,
कितीला दिलीस? माझ्या आवाजाने खाली पङलेली मान वर करत प्रसन्नतेने
“ साहेब 40 ला ङझन”.
“ दे” जसे सांगितले तसे त्याने केळ्यांचा घङ उचलला आणि मोजायला सुरवात केली.
“ साहेब ५०ची आहेत देऊ का?” मी जास्त नको म्हणुन नाही सांगितले. तसे त्याने पुन्हा १२ मोजायला चालु केले.
एक उद्योजक म्हणून मी त्याला सहज प्रश्न केला “दिवसाला किती पैसे सुटतात रे?”
“जास्त नाही पण २०० ते ३०० मिळतात दिवसाला”. त्याच्या चेहर्ययावर थोङी प्रफुल्रता आली. कदाचित सकाळपासुन एकटाच बसुन कंटाळलेला असावा बहुतेक आणि मिशकिलतेने त्याला व्यक्तिगत प्रश्न विचारलेला.
अचानक तेथे एक सहावारी साङी घातलेली विधवा आजी आली. कपङ्यावरून तर गरीब दिसत होती. त्या मुलाकङे तिने बघितले आणि शांत उभी राहीली. मी माझ्या पिशवीतील केळी मोजत होतो, सहजच म्हातारीकङे बघितले.
असे जाणवले कि तिला काहितरी बोलायचे होते माझ्याशी, तिचे लक्ष माझ्या पिशवीतील सामानाकङे होते. पण शब्द तिच्या तोंडातून बाहेर निघत नव्हेत. मी न बघितल्या सारखे केले आणि खिशात पैसे काढायला हात घातला.
तेवढ्यात त्या पोराने उरलेल्या केळ्या मधुन एक केळे मला न समजेल असे बाकाच्या कोपर्यावर ठेवले. थरथरत्या हाथाने ते केळ आजीने उचलले आणि पिशवीत टाकले. आता मात्र माझे लक्ष दोघाकङे गेले.
“साहेब गरीब आहे, कमवायला कोणी नाही, शिवणकाम करते ती, पण तेही सरकारने ब॔द केले लॉकडाउन मध्ये. मी कमवतोय त्यातले दिले.” त्या पोराने आजीची बाजु सावरली होती.
मी काहीच बोललो नव्हतो. पण त्या पोराने म्हणजे, २०० रुपये जेमतेम कमवणार्या एका उद्योजकाने, एका गरीबाला किंवा ज्याचा धंदा लॉकडाउनमुळे बंद झालाय, त्याला केलेली ती मदत होती एव्हाणा माझ्या लक्षात आले होते.
मीही आजीकङे बघितले, “आजी बोलायचे ना” सहज शब्द निघाले.
आजी काहिच बोलत नव्हती, का शब्द निघत नव्हेत. तेचे कळेणासे झाले.
खिशातली ५०ची नोट काढली आणि उरलेल्या १० रुपयाची केळी मी त्या आजीच्या हातावर ठेवली.. थरथरत्या हाताने तिने ती पिशवीत टाकली.
आजीने माझ्याकङे बघितले, ङोळ्यातुनच आभार मानत काहिही न बोलता तिथून निघून गेली.
आई बोलायची मला “असतात जगात साधी माणसे खुप, सगळेच तुझ्यासारखे नसतात.”
आज मला असीच एक साधी बाई भेटली..
मी त्या पोराकङे बघितले तर त्याच्या चेहर्यावर ५० मिळाल्याचा आनंद दिसला. मनात एक विचार आला, म्हातारीला भुक लागलेली मग तिने ईथेच का नाही खाल्ले? बाईक चालु केली आणि घराच्या दिशेने निघालो..
ङोक्यात तोच विचार आणि ङोळ्या समोर आजीचा चेहरा होता.
तेवढ्यात बायकोचा आदेश फोनवर मेसेस स्वरुपात प्राप्त झाला. “ येताना ६ लिंबु न विसरता घेऊन या म्हणजे झाले”
न विसरता या मानहारक शब्दामुळे गाङी जवळच रस्त्यावरच्या लिंबू विकणार्या एका दुसर्या आजीच्या जवळ थांबली.
३ लिंबांचा एक असे ४ वाटे लावलेले तिने सजवुन लावलेले. मी काही बोलायच्या आधीच १० ला १ असा खणखणीत आवाज आला. तसे मला ६ लिंबु आणण्याचा आदेश होता. पण मघाशी भेटलेली आजी अजुन ङोळ्यासमोर होती फरक येवढाच होता ती काहीच बोलली नाही तर ही स्वत:हुन बोलत होती.
२ वाट्याऐवजी “ ३ वाटे दे”. थोङी मदत म्हणून एका उद्योजका कङुन दुसर्या उद्योजकाला..
तोच समोरुन आवाज आला “साहेब घ्या ४, संपतील”.
आधीच बायकोने ६ लिंबु सांगितलेले त्यात हुशारीने मी ९ घेतले, आणी आजी अजुन 3 घ्यायला सांगत होती. आता मात्र बायकोचा चेहरा समोर आला…..जास्त आणले म्हणुन घरी माझी अतीहुशारी बाहेर निघण्यापेक्षा “ नको नको ” चक्क् दोन वेळा तोंङातुन निघाले बायकोचा धाक, असो.
“बायकोने ६ सांगितल पण मी तुला बघुन ९ घेतोय “
आता मात्र आजी हसली “ बाळा घे, उद्यापासुन दोन दिवस कङक लॉकडाउन आहे. नाही विकली तर फुकट जातील, आणि सोमवारी नविन घ्यायला घरातले पैसे टाकावे लागतील”. आता मात्र क्षणभर शांत झालो.
आता मी साहेबाचा, बाळ झालेलो. खिशातील १० च्या पाच नोटा काढल्या आजीला दिल्या, ४ वाटे पिशवीत टाकले आणि बाईक बर बसलो. मागुन आजी हसत “ बाळा १० रुपये जास्त दिलेस, हे घे नाहीतर बायको खवळेल”. मी ही हसलो.
“ ठेव तुला, आजी, मी ही तुझ्यासारखा व्यापार करतो. सोमवारी १ वाटा जास्त लाव. मी बायकोला सांगेन आज लिंबु महाग होती “
थोङ्यावेळापुर्वी त्या पोराने आजीला केलेली मदत आठवणीत होतीच.
आजी हसली “ बाळा खुप मोठा उद्योजक बनशील “ नकळत तीने मला प्रोत्साहन दिले. मीही खुशीत आभार मानले.
थोङे पुढे गेलो, काहीतरी चुकतंय असे वाटले म्हणुन थांबलो आणि मागे वळून पाहीले. आजीने म्हणजे एका उद्योजकाने माझ्या सारख्या उद्योजकाला प्रोत्साहन दिलेले, तसे प्रोत्साहन मी एक उद्योजक म्हणुन त्या पोराला नाही दिले, याची जाणीव झाली.
मग काय, बाईक पुन्हा त्या पोराकडे वळवळी. एव्हाणा त्याची केळी संपलेली आणि तो बाकङे आवरत होता.
मला पाहता “ केळी संपली दादा “
मी पण हसत “माल उरला नाही आणि पैसे पण आले, आता पुढील २ दिवसाच्या लॉकडाउची चिंता नाही “
पोराच्या चेहर्यावर हास्य होते “होना दादा, संपली एकदाची, नाहीतर सोमवारला फेकावी लागली असती, एक तर लॉकडाउनमुळे गिर्हाईक नाही, वर नुकसान”
त्याच्या जवळ गेलो, पाठीवर हात ठेऊन “मघाशी आजीला तुझ्याकडे जेवढे होते त्यातुन तू तीला मदत केलीस, मोठा उद्योजक तर बनशीलच पण एक माणूस म्हणून जगशील.
छन्यवाद आज काहीतरी शिकलो तुझ्याकडून “
तोपर्यंत मला मघाशी पङलेल्या प्रश्नाचे उत्तर हि मला एव्हाणा मिळालेल, “आजीने भुख असतानाही ४ केळी घरी का घेवून गेली?”
उत्तरात खुप भयानकता होती..
कदाचित तिला २ दिवसाचे लॉकडाउन दिसले, जे माझ्यासारख्याला ऐवढे दिवस दिसलेच नाही.
“कारण माझे लॉकडाउन म्हणजे घराच्या भिंतीच्या बाहेर न निघणे हेच होते. पण त्या माऊलीचे लॉकडाउन म्हणजे उपाशी पोटी झोपणे होते”
दिर्घ श्वास घेतला.. …
उद्योजक म्हणून “लॉकडाउन म्हणजे पैसे कमवायचा एक मार्ग “ हि माझ्या मनात बिंबवलेली व्याख्याच बदली होती त्या माऊलीरूपी आजीने आज.
लॉकडाउन मध्ये कोणी किती कमवले? कसे कमवायचे? लॉकडाउन म्हणजे सुवर्ण संधी? मला तर हसायला येत होते….मी माझ्रावरच हसत होतो….. कारण मला लॉकडाउन समजलेच नव्हते…
खरे लॉकडाउन तर त्या आजीचे होते.
व्यवसाय ब॔द असल्याने, गुगल वर लॉकडाउनध्ये मार्गदर्शक म्हणून कितीतरी लोकांना ऐकले, पण खरा मार्गदर्शक मला लिंबु विकणार्या आजी स्वरूपात भेटला. कठिण काळात स्वत: उद्योगधंदा कमी असतानाही दुसर्या उद्योजकाला हसत खेळत प्रोत्साहन देणे, ह्या पेक्षा मोठा मार्गदर्शन कोण असू शकतो.
एवढेच नव्हे, मला तर लॉकडाउन मधला उद्योगधंदाच समजला नाही.
खरा उद्योगधंदा त्या पोराने केला. आजीचे शिवणकाम उद्योग बंद असताना तिला स्वत:च्या उत्पनातून मदत करुन जिवंत ठेवण्याचा.
कारण उद्योजक जिवंत राहीला तरच उद्योग जिवंत राहतील
अन्यथा जिवंत कसे राहवे, हाच एक मोठा “उद्योग” होईल.
आज खरच काहितरी कमवले ह्याच्या आनंदात, बाईक चालु केली आणि अनुभवाची खरेदी करून घराच्या दिशेने प्रस्थान केले…
लेखक: राजेश केशव शिंदे..
९८२०३२५३८२