ऊसाच्या मुलांची लग्न..

ऊसाला झाली दोन दोन पोरं,
मोठा मुलगा ‘गुळ’ 👨🏾‍🦱 अन्
धाकटी मुलगी ‘साखर’ 👩‍🦳

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,
गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर 😀

साखर तशी स्वभावाला गोड,
तिच्यात उणेपणा शोधणं अवघड 😉

गुळ मात्र स्वभावाला चिकट,
समोर दिसला की ईतरांना वाटे संकट 😅

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई,
गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही 😧

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,
गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ‘ओबडधोबड’ 😆

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,
बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले 😍

तीला झाला एक मुलगा
दिसायला होता तो गोरागोरा,
यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले ‘शिरा’ 😘

ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची,
त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? 🤔

ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग,
सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग 😥

बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना,
काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना 😔

ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप 🤓
त्याने प्रयत्न केले खुप,
अन् ऊसाला आला हुरुप 🤪

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,
जी दिसायला होती बेत्ताची 🥰

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,
होते ऊसाच्या तोलामोलाचे,
ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे 😁

अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड,
रुपाला साजेसे, नांंव होते तीचे ‘भरड 🤩

गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना,
तो कशाला करतो नसत्या वल्गना ? 😂

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,
लग्न जमले अन् सारे तयारीला लागले 😎

किचन ओटा झाला,
लग्नासाठी बुक,
स्वयंपाकघर पण सजविले खुप 😌

‘भरड’ ला तूप कढईत घेउन गेले,
तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले 🙆‍♂

भरपुर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी,
गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’ 🥰

लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले,
अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले ☺

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश 🥳

मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला,
‘भरडी’ चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला 😇

काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता,
कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता 😋

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,
थाटामाटात बारसे झाले,
नांव ठेवले लापशी 💃

आवडली ना !!!😊😊😊🤣🤣🤣

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

One thought on “ऊसाच्या मुलांची लग्न..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: