सेल्समन

एका अमेरिकन मॉल मधे मालक एका नविन सेल्समन वर ओरडत होता. दिवसभरात फ़क्त एक ग्राहक केले म्हणून.
मालक – “इतर सेल्समननी 20 ते 25 ग्राहक केलेत आणि तू फ़क्त एकच?
किती विक्री केलीस तू ??”
सेल्समन – “$ 99,200 !!”
मालक – “काय? काय म्हणतोस? काय विकलंस तू त्याला.”
सेल्समन – “एक मासेमारी करण्याचा गळ, एक मोठा फिशिंग rod, एक फिशिंग boat, एक ट्रक, एक तंबू, एक बार्बिक्यू, काही किचन वस्तु, एक बेड, एक चादर, एक उशी, एक ऑक्सीजन सिलिण्डर.”
मालक – “पण तो तर मासेमारीचा गळ विकत घ्यायला आला होता, मग हे सर्व तू त्याला विकलं?”
“सर, तो तर डोके दुखतंय म्हणून टेबलेट घ्यायला आला होता !!”
मालकाने हात जोडले व म्हणाला,
“हे मला समजून सांग.”
सेल्समन – “मी त्याला डोके दुखण्यावर मासेमारी हा मन रमविण्याचा चांगला पर्याय आहे व टेबलेटचे दुष्परिणाम सांगितले. मग त्याने गळ विकत घेतला. नंतर त्याला विचारले, तुम्ही मासेमारीसाठी कशाने जाणार? मग त्याला बोट विकली. आता बोट घरी कशी घेऊन जाणार? मग त्याला ट्रक विकला. मासेमारीसाठी गेल्यावर राहणार कुठे म्हणून तंबू विकला, रात्री खाणार काय मग बार्बिकु विकला. रात्री झोपायला बेड आणि इतर वस्तु विकल्या. अजुन मला त्याला मछरदानी, सकाळी उठल्यावरचे लागणारे सामान, अंघोळीसाठी लागणारे साहित्य, गारमेंट्स विकायचे होते.”
मालक – “मग ?
सेल्समन – “त्याच्याकडचे पैसे बोट घेतल्यावर संपले होते. मग credit कार्ड वर ट्रक घेतला. पर्सनल loan करुन बाकी सामान घेतले बिच्याऱ्याने. उरलेले सामान घ्यायला तो उद्या येणार आहे. सोने विकतो म्हणाला.”
मालक –
“तू या आधी कोठे काम करत होता रे ??”
सेल्समन –
“सर, मी भारतात मोठ्या हॉस्पिटल मधे PRO होतो.
साधा ताप आला तरी आम्ही त्याला पहिल्यांदा Covid टेस्ट, मग CT SCAN, X-ray, MRI, 2D eco, troponin, नंतर LFT, all blood test. या एडमिट व्हायच्या आधीच्या test!! नंतर पैश्यासाठी त्याला लोन देणाऱ्याचा नंबर द्यायचो, नंतर उरलेल्या test. मग एडमिट करुन घ्यायचो. मग त्याची बायको सोने विकायची, मग इतर test,….”
🤗😂