डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |
सोहळा तो झाला | तीरावर ||
झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |
फेसबुक गाव | ‘मेटा’पूर ||
तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |
घे म्हणे आण | विठोबाची ||
हबकला झुक्या | बावरला तोची |
झाली त्याची गोची | देहूगावी ||
लोकांचे मॅसेज | वाचतो चोरून |
प्रायव्हसी हेरून | नाठाळ तू ||
झुक्या म्हणे ना ना | आरोप असत्य |
सांगतो मी सत्य | विश्वासाने ||
तुकाने दिधला | सज्जड तो दम |
सांगितले ठाम | निक्षूनिया ||
तुवा फेसबुक | द्वेषाची ओवरी |
मनी क्लेष भरी | लोकांचिया ||
संवाद साधन | बनले घातक |
याचे हे पातक | तुझ्या माथी ||
होय होय तुका | झुक्या वरमला |
‘मेटा’कुटी आला | पायापाशी ||
तुकाने घेतले | उचलून त्यास |
दिले दोन घास | भाकरीचे ||
~ विनायक होगाडे
Nice. Visit my blog – https://www.bedunechar.in
खूपच छान रचलंय.
मी माझ्या ब्लॉग वर मेटावर्स बद्दल लिहिलंय कृपया वाचा https://knowinmarathi.com/what-is-metaverse-in-marathi/
धन्यवाद!!
हो नक्कीच