पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन..


☺☺☺☺☺☺☺


दोन जिवाभावाचे मित्र……
अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी सोबत सोबत होती..

योगायोग इतका जबरदस्त की, तीनच महिन्यांपूर्वी दोघांचं गेल्या जानेवारीत लग्न झालं…..

तीन महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ते एका कॉफीशॉप मध्ये भेटले.
इकडच्या तिकडच्या गप्पा आटोपल्यावर साहजिकच विषय निघाला लग्नानंतरच्या आयुष्याचा….

एकाने दुसऱ्याला उत्सुकतेने विचारले….
“बोल दोस्ता, काय म्हणते लाईफ???”

दुसऱ्याची टेप लगेच सुरु झाली…

“अरे, झकास यार…
अगदी माझ्यासारखाच हिला पण प्युअर दुधाचा चहा आवडतो….

पण हिच्यावर झालेले माहेरचे काटकसरी संस्कार…
काही केल्या नुसत्या दुधाचा चहा करणं,
हिला अजिबात पटत नाही….

मग काय?????

मी मस्त आलं घालून प्युअर चहा बनवतो राजाराणीसाठी….

चहा आटोपला की, लगेच ती सिंकवरचा नळ उघडते, आणि मी कपबश्या विसळून ठेवतो….

ज्यादिवशी तिला भाजी सुचवायचा कंटाळा येतो, त्यादिवशी मी माझ्याच आवडीची भाजी करतो..

तिला पण माझा चॉईस आवडते….

स्वच्छतेच्या बाबतीत हिचा कुणीच हात धरू शकत नाही..
पण शेवटी मी नवरा आहे तिचा.
पटकन तिचा नाजूक हात धरतो,
फरशी पुसायचा कपडा हळुवार हिसकून घेतो आणि अगदी लख्ख फरशी पुसून काढतो…..”

“बरं, माझं जाऊ दे..
तुझं कसं काय सुरु आहे??” त्याने दुसऱ्याला विचारले….

माझं काय होणार डोंबलं???
तुझ्याइतकीच बेइज्जती माझी पण सुरु आहे..
पण मला तुझ्यासारखं आकर्षक पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन नाही बनवता येत…..
😀😀😀😀

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: