Free Marathi Books Download

आज प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद हा असतोच अणि तो असायलाच हवा. कारण छंद हा असा एक दुवा आहे जो आपल्या जीवणातील निरसता दुर करत असतो व आपल्या जीवणाला अधिक आनंदी अणि रसाळ अणि मधाळ बनवत असतो अणि याच छंदामुळे आपण उत्साहाने भरून जात असतो व त्याच बरोबर त्यामुळे आपण आनंद मनोरंजना बरोबरच ज्ञानही मिळवित असतो.

असाच एक छंद म्हणजे वाचन.

  • भरपूर वाचन असलेला व्यक्ती हा संकुचित विचार कधीच करत नसतो.
  • वाचनामुळे आपल्याला अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती तसेच त्यांची संस्कृती कळते तिच्याविषयी माहीती प्राप्त होत असते.
  • वाचनामुळे आपल्याला आपल्यातील उणिवा तसेच दोष लक्षात येतात.
  • वाचनामुळे आपल्याला खुप आनंद मिळत असतो. नवीन गोष्टी जाणुन घेण्याचा तसेच आपले अनुभव विश्व अधिक समृद्ध करण्याचा आनंद आपल्याला मिळत असतो.
  • वाचनामुळे आपल्याला इतिहास कळत असतो त्याची माहिती मिळत असते. भुतकाळात घडुन गेलेल्या घटना प्रसंग तसेच व्यक्तींविषयी माहीती प्राप्त होत असते.
  • वाचन हे आपण कुठेही बसुन करु शकतो त्यासाठी विशिष्ट अशा जागेची गरज पडत नाही पण एकांतात केलेले वाचन कधीही चांगले असते कारण त्याच्याने आपल्याला एकाग्रपणे वाचन करता येते तसेच कोणी आपल्याला वाचताना डिस्टर्बही करत नसते.
  • वृद्ध,तसेच लहान मुले यांना तर वाचनामुळे खुपच मदत होते. जसे की वृद्ध लोकांना वयोवृद्ध झाल्यामुळे कुठे बाहेर जाता येता येत नसते त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी माहीती कळत नसते पण वाचनामुळे त्यांची ही उणीव भरून निघत असते ते ही फक्त एका ठिकाणी बसुन वाचन केल्यामुळे.
  • वाचनामुळे माणुस जुना राहत नाही तर तो नवा बनत जातो. त्याच्या ज्ञानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते अणि मग तो जुना राहत नाही अधिक नवा बनत जातो.

Books are good company, in sad times and happy times, for books are people – people who have managed to stay alive by hiding between the covers of a book. – E.B. White

पुस्तके वाचायला कोणाला नाही आवडतं? आणि त्यातही ती पुस्तके मोफत असली तर..! मग तर दुग्धशर्करा योग..

प्रत्येकाला पुस्तक विकत घेण्याचा खर्च आणि त्यांचा सांभाळ परवडत नाही पण वाचायची इच्छा मात्र प्रत्येकाला असते. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ५००० हुन अधिक पुस्तकांची ग्रंथ-संपदा..

खाली आम्ही पुस्तकांची विभागानुसार वर्गीकरण केलेले आहे. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही विभागामध्ये जाऊन आपण ते डाउनलोड करू शकता आणि निवांत वाचन करू शकता.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: