वार्षिक राशिभविष्य २०२३ : मेष
मेष राशीच्या जातकाचे यश स्वयंभू, स्वतःच्या ताकतीवर असते. वेगवेगळी आव्हाने स्विकारणे आणि ती यशस्वी करणे यांना आवडते. पण आवडीनिवडीबाबत यांच्या भूमिका ठाम असल्यामुळे बऱ्याचवेळा गैरसमज ओढवून घेतले जातात.
यावर्षी राशीच्या लाभस्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे तुमचे करियर, काम याबाबतीत थोडे उशीरा मिळाले तरी त्याची चांगली फळे नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत. समोरच्या माणसाचा ठाव नेमका तुम्हाला ओळखता येतो. या गुणाचा उपयोग करून संधीचा फायदा उठवाल. ग्रहांच्या कृपेचे छत्र लाभल्यामुळे बरीच उभारी येईल. अनेक कामे सहजगत्या होतील. तसेच राशीच्या व्यय व लग्नस्थानातून होणारे गुरूचे भ्रमण मिश्र फळे देणारे ठरेल. भाग्याची साथ चांगली मिळणार आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी व्यय स्थानातील गुरु नेप. चे भ्रमण मनःशांती ठरेल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे मार्गी लागतील. फक्त कोणत्याही गोष्टी टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. यावर्षी २८ नोव्हें. २३ पर्यंत राहचे भ्रमण राशीमध्येच होणार केतूचे राशीच्या सममस्थानातून होणार आहे. वैवाहिक जीवनात विनाकारण वाद घालायचे टाळा. थोडी चिकाटी आणि संयम ठेवला तर बाजी मारून जाल. गुप्त शत्रूंचा थोडा त्रास होईल पण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने योग्य दिशेने केलेले मार्गदर्शन उपयोगी पडेल. एखादे काम करायचा निश्चय कराल आणि ते काम तडीसही नेणार आहात.
आता साधारणपणे महिन्यानुसार या वर्षीचे राशीभविष्य काय आहे ते पाहू या.
जानेवारी २०२३ | या महिन्यात पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. महिन्याच्या मध्यावर महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. ‘सरकारी नोकरीतल्या लोकांना मानमरातब, प्रमोशन मिळण्याचे. योग येतील. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. लेखकांना लिखाण करण्यासाठी चांगल्यापैकी मूड लागेल. |
फेब्रुवारी २०२३ | ईश्वराने काम करण्याची ताकद तर तुम्हाला चांगली दिली आहेच त्याचा उपयोग चांगल्याप्रकारे करून घ्याल. जुनी येणी वसूल होतील. बरेच दिवसानंतर कर्जफेडीसाठी बाब मिळेल. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. नोकरी व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. ग्रहांच्या कृपेचे छत्र लाभल्यामुळे बरीच उभारी येईल. अनेक कामे सहजगत्या होतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय, नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. |
मार्च २०२३ | तुमच्या सडेतोड बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. नोकरी व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. बेकारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. उष्णता आणि पित्ताचे त्रास वाढतील. मुलांशी पटवून घ्यावे लागेल. घर बदलाचे योग येतील. मधुमेह, पाठीची दुखणी आहेत त्यांनी पथ्यपाणी सांभाळणे इष्ट. |
एप्रिल २०२३ | या महिन्यात तुमच्या बुद्धीचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. किर्ती, प्रसिद्धीच्या मागे न लागता योग्य माणसांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायाबाबत अडथळ्यांची शर्यत करावी लागली तरी यश निश्चित आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. आपल्या चीज वस्तू सांभाळणे आवश्यक. स्वतःची आवडनिवड जपण्याकडे कल राहील. रूचेल ते खाण्यापेक्षा पचेल ते खाण्याकडे कल ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. शेजाऱ्यांशी वादविवादाचे प्रसंग संभवतात. |
मे २०२३ | या महिन्यात तुमच्या परखड, स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याचा इतरांना थोडा त्रासच होईल. करिअरमध्ये मोहाचे प्रसंग येतील. अशावेळी तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. पैशाला कमी पडणार नसले तरी खर्चाचे प्रमाणही हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नवीन पिढीचे मोठ्या लोकांशी पटणे जरा अवघडच. तरुणवर्ग स्वतःच्या मताशी ठाम न राहिल्यामुळे थोडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. |
जून २०२३ | एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्वयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. तरीसुद्धा आर्थिक गुंतवणूक या महिन्यात करणे धोक्याचे राहील. कुटुंबाला जास्त प्राधान्य द्यावे लागेल. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. उत्साह वाढेल. घरामध्ये वर्चस्व राहील. कामगारांचे प्रश्न सुटतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. |
जुलै २०२३ | उतावीळपणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक इतरांकडून केले जाईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कलेच्या आणि संगणक क्षेत्रात असणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. घरात. आणि घराबाहेर मानसिक अस्वस्थता जाणवली तरी आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ रहाल. |
ऑगस्ट २०२३ | कोणत्याही परिस्थितीत अती भावनाप्रधान न होणे तुम्हाला जमत नाही. या गोष्टीमुळे थोड़े गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाचा मेळ घातला तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग संभवतात. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणायांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा एखादेवेळी फायदाच होण्याची शक्यता आहे. |
सप्टेंबर २०२३ | या महिन्यात स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये असलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याची शक्यता आहे. अविचाराने कर्ज काढू नका. हसे फेडताना त्रास होईल. नोकरी व्यसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून महीसलामत बाहेर पडाल. ग्रहांची साथ चांगली मिळेल. स्वत:चा मान राखून जेवडी कामे उरकता येतील तेव्ही अकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला काळ. |
ऑक्टोबर २०२३ | व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाली विवेकाचे लगाम चालावे लागतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. कुटुंबानील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळे उठतील. परंतु कोणतेही टोकाचे निर्णय घ्यायचे टाळायला हवे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. |
नोव्हेंबर २०२३ | या महिन्यात प्रत्येक गोष्टीला धडाडीने सामोरे जाण्याची तुमची धमक इतरांना लाजवणारी असेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. त्यामुळे नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे, परंतु तुमच्यातील शक्ती आणि बुद्धी यांचा सुरेख संगम या महिन्यात झालेला दिसेल. तरुणवर्ग आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गाठीभेटी घेतील. |
डिसेंबर २०२३ | या महिन्यात दुसन्याला सहकार्य करण्यात तत्पर रहाल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. लेखकांना लिखाण करण्यासाठी उत्तम काळ. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खटके उडण्याची शक्यता नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल, परंतु तेथील वातावरण मात्र उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक काहीतरी करून दाची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. |