वार्षिक राशिभविष्य २०२३ : वृषभ

वृषभ राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – वृषभ’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे वृषभ राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

निश्चयाचा महामेरू असे या राशीचे वर्णन करता येईल, पैसा मिळविण्यासाठी कष्ट करणारीवीच खर्चिक, राम नवनिर्मितीची ऊर्जा यांच्याकडे आहे. घरात रमणारी आणि बदल नको असलेली, पण तेवढीच रसिका स्वार्थ आणि परमार्थ अशी दोन्ही साधणारी ही राम आहे.

राशीच्या दशमस्थानातून शनीचे भ्रमण होरार आहे. धर्म आणि कर्माचा सुरेख संगम अनुभवाला येईल. ज्यांचे परदेशाशी संबंध आहेत त्यांनी आपली प्रगती करून घ्यावी. थोडे पाडस जोखीम घ्यायची तयारी ठेवावी लागेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितिजे साद घालतील. परंतु त्यांचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. जोडीदाराबरोबर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.

राशीच्या लाभ व व्यस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण लाभ देणारे ठरेल. तसेच आध्यात्मिक उन्नतीही साधून देईल. कर्ज काढताना अवरूण पाहून पाय पसरा असे सांगणारे ग्रहमान आहे. वैवाहिक जीवनात प्रवेश करणान्यांनी निर्णय व्यवहाराच्या पातळीवर जाऊन घेणे श्रेयस्कर ठरेल. मधुमेही व्यक्तींनी पथ्याची जास्त काळजी घ्यावी. पूर्णपणे मित्रांच्या भरवशावर राहून चालणार नाही, प्रसिद्धीचे योग येतील, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. यावर्षी २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहूचे भ्रमण राशीच्या व्यय स्थानातून तर केतुचे भ्रमण राशीच्या षष्ठस्थानातून होणार आहे. परदेशगमनाची इच्छा असेल तर ती फलद्रूप होऊ शकते, कोणत्याही बेकायदेशीर कामाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आपल्या मनातील गुम गोष्टी फलद्रूप व्हायच्या अगोदर कुठेही बोलू नका. उष्णतेच्या विकारांपासून सावध रहाणे इष्ट ठरेल.

जानेवारी २०२३विवाह इच्छूचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात पार्टनरच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. या महिन्यात कष्ट, त्रास, थोडी निराशा या सगळ्याचा अनुभव येणार आहे. पण त्यावेळी जीवनाकडे पहाऱ्याचा दृष्टीकोन खेळकर हवा. प्रवासयोग संभवतात. परदेशी जाण्यासंबंधात काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. जुनी येणी वसूल झाली तरी हातात पैसा टिकणार नाही. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील.
फेब्रुवारी २०२३दीर्घोद्योगीपणा, कष्टाला न डगमगता काम करण्याची वृत्ती यामुळे या महिन्यात कामाची गती चांगली ठेवाल. त्यामुळे पैशाची परिस्थिती सुधारेल. हाताखालच्या नोकरांच्या अडचणी थोड्या काळासाठी तरी सुटतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. न बोलता काही कामे केलीत तर आप्तेष्टांमध्ये लोकप्रिय व्हाल. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील.
मार्च २०२३स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. आपले प्रेम व्यक्त करण्याचे प्रसंग येतील. स्त्रिया फॅशनच्या जगात जास्त वावरतील. महिन्याच्या उत्तरार्धात मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीळ बसण्याची शक्यता आहे. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. मुलांशी मतभेद होतील. अती भावनाप्रधानता टाळायला हवी. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी.
एप्रिल २०२३समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. त्यासाठी आर्थिक झळही सोसाल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडणाचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेला बरा. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम, सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. यासाठी मित्रमंडळींच्या सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु तेथे मात्र निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील.
मे २०२३वैवाहिक जीवनात नव्याने प्रवेश करू इच्छाणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून पावले टाकावीत. नोकरीत दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण आठवत कामाचे वेळापत्रक आखावे. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील तरी कामे व्यवस्थित पार पाडण्याकडे कल राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. त्यासाठी आर्थिक नियोजन थोडे ढासळले तरी उभारी धरून ही संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे.
जून २०२३कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल, कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. बेकारांना कामे मिळतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
जुलै २०२३कोणतीही कर्तव्य कठोरता जपताना आपण भावनाशून्य होत नाही ना? याचा अंतर्मुख होऊन विचार करा. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण दीर्घकाळपर्यंत प्रसन्न राहू शकते. घरातील वातावरण थोडक्या कारणाने ढवळून निघू शकते. मुलांची मध्यस्थी स्वीकारून हे वातावरण तुम्हाला चांगले ठेवता येईल. बाहेरच्या जगात तुमच्यातील लपलेला कलाकार लोकांच्या नजरेसमोर येईल. योग्य तेथे मान नक्कीच मिळेल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक कराल. तुमच्या हिशेबी स्वभावाला साजेसे ग्रहमान आहे. जोडीदाराला फक्त बोलण्यानेच खूष करून टाकाल.
ऑगस्ट २०२३चेहऱ्यावरील रेषा हलू न देण्याचा निश्चय आणि मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव या महिन्यात घ्याल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता.
सप्टेंबर २०२३या महिन्यात विद्यार्थीवर्गाला अपाल्या करियरच्या बाबतीत विचार करताना खूप वेगळा, टोकाचा विचार करून चालणार नाही. सर्व दृष्टीने झेपेल अशा अभ्यासक्रमाची निवड करायला हवी. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल, बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील.
ऑक्टोबर २०२३मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल. परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात हाताखालच्या कामगारांचे सहकार्य लाभेल. परंतु त्याबरोबरच त्यांच्या मागण्यांचा विचारही करावा लागणार आहे. अचानक धनलाभाच्या कोणत्याही मार्गाला न जाणेच इष्ट ठरेल. शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत.
नोव्हेंबर २०२३नेहमीपेक्षा घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. थोडक्या कारणावरून रागाचा पारा चढल्यामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कर्ज काढताना अंथरूण पाहून पाय पसरा असे सांगणारे ग्रहमान आहे. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल.
डिसेंबर २०२३या महिन्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. काही भाग्यदायक घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. फक्त सांधेदुखीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काही वेळेस गैरसमजाच्या वादळाला तोंडही द्यावे लागेल. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे संकल्प करा आणि कामाला लागा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: