वार्षिक राशिभविष्य २०२३ : कर्क
कर्क राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – कर्क’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे कर्क राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,
हे लोक अतिशय महत्त्वाकांक्षी, धडपडे, मुत्सद्दी असतात. खूप प्रेमळ परंतु तेवढेच चंचल असतात, अती संवेदनशील स्वभावामुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. यावर्षी राशीच्या भाग्य आणि दशमस्थानातून गुरूचे भ्रमण होणार आहे. एप्रिलपर्यंत भाग्येश भाग्यातून जात असल्यामुळे गुरूची साथ चांगली मिळेल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. मेंदूपेक्षा तुमचे हृदयच जास्त बोलतं. परंतु व्यवहारात याचा उपयोग वाजवीपेक्षा जास्त केलात तर गोत्यात येण्याचा संभव आहे. यावर्षी आर्थिक ओढाताण संपेल. त्यामुळे जुनी देणी देऊन टाकाल. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. कामाचे उत्तम नियोजन यावर्षी करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. संधीवाताचा त्रास असणारांनी मात्र काळजी घ्यावी. वातविकार होऊ शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. यावर्षी नवीन विचार, नवीन तंत्रज्ञान यांचा सहजपणे स्वीकार कराल.
जानेवारी २०२३ | तरुणांना प्रेमात पडण्यासाठी उत्तम काळ आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष लागेल. परीक्षेच्या काळात आजारी पडू नये अशी त्यांची काळजी घ्यावी. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापटपणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. ज्यांना त्वचाविकार आहे त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. |
फेब्रुवारी २०२३ | तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सांगता येत नाही आणि त्यातून कामावरील वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामांवर त्यांचा परिणाम होईल. त्यामुळे कामातील शिस्त पाळलीच पाहिजे. नोकरीत कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. इथे तुमचा आत्मविश्वास पणाला लागेल. प्रामाणिकपणे स्पष्ट विचार मांडाल. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे बांच्या सल्ल्याने गुतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. |
मार्च २०२३ | तरूण वर्गामधील वैवाहिक जीवनाबद्दलच्या आधुनिक कल्पना ऐकून घरातील मोठ्या व्यक्तींना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मतभेद निर्माण होतील. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघडच. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल, प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. |
एप्रिल २०२३ | या महिन्यात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल, तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल.. |
मे २०२३ | लोकप्रियता, समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रामध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. विद्याथ्र्यांनी आपले करियर निवडताना विचार करून निवडावे. बुद्धी, क्षमता, कष्ट घेण्याची तयारी आणि आवड या सर्व गोष्टींचा विचार करून पावले न टाकल्यास माघारी येण्याची शक्यता आहे. नोकरी. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाची गती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. हाताखालच्या लोकांची उत्तम साथ मिळेल. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. |
जून २०२३ | एखाद्याला आपलेस करून घेण्याचे कौशल्य तुमच्यात आहे. हे कसब या महिन्यात पणाला लागेल. जरा जास्तच संवेदनशील बनाल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होतील. जुनी येणी वसूल झाल्यामुळे खिशात पैसे खुळखुळतील तसेच खर्चही होतील. जगापुढे चार पावले चालण्याची क्षमता तुमच्यात राहील परंतु यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी बाहेरगावी असल्यामुळे संभ्रमात पडाल. |
जुलै २०२३ | प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. थोडा मानसिक त्रास आणि काल्पनिक चिंता सतावतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल. नोकरी व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. ओळखी वाढतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातीन. ज्यांना बोलण्याच्या व्यवसायातून पैसा मिळतो त्यांना फायदा होईल. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. |
ऑगस्ट २०२३ | नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. दूरचे नातेवाईक घरी हजेरी लावतील. दुसऱ्याच्या मनाचा अचूक अंदाज घेता येईल. घर सजवण्याच्या उत्साही मुडमध्ये घरातील लोकांच्या गूढ वागण्याचे मात्र तुम्हाला कोडे पडेल. त्याचा थोडा ताण येईल. भावंडांशी वाद संभवतात. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल. काम करताना अती आत्मविश्वास नडेल. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. |
सप्टेंबर २०२३ | या महिन्यात जे बोला ते करून दाखवण्याचा प्रयत्न अवश्य करा. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. एखादेवेळी आपली पोझिशन जपण्यासाठी अपेक्षेबाहेर खर्च कराल. त्यामुले मानमरातब मिळेल. आनंदी आणि उत्साही मूड राहिल्यामुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी करून जाल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. |
ऑक्टोबर २०२३ | कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल, अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. शेजान्यांच्या वागण्यामध्ये बदल जाणवेल. तो का झाला हे मात्र कळणार नाही. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. उद्योग व्यवसायात आपल्याला असणाऱ्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्याल. आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी उपासनेत मन रमून जाईल. मन:शांती मिळेल. परंतु कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा. |
नोव्हेंबर २०२३ | घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. मुलांच्या बाबतीत वाजवीपेक्षा जास्तच विचार कराल. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील आपसातील मतभेद बाढू नयेत म्हणून सुवर्णमध्य काढावा लागेल. कोणताही विषय जास्त ताणू नये. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. |
डिसेंबर २०२३ | शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात यश प्रवासाचे, सहलीचे बेत ठरतील. करियरमध्ये तुमच्या चपळ कार्य क्षमतेमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उतरवणार आहात. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. वाहनसौख्य मिळेल. अपेक्षित पैसा समोर दिसत असून हातात मात्र पडणार नाही. |