वार्षिक राशिभविष्य २०२३ : कन्या

कन्या राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची –कन्या’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे कन्या राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

चिकित्सक आणि दूरदर्शीपणा या गुणांमुळे तुम्ही जीवनात खूप पुढे जाऊ शकता. मनात थोडा गोंधळ असला तरी खूप चांगलं संशोधन करू शकतात. काही वेळेस स्वतःहून संकटे ओढवून घेतात. सुबत्ता असली तरी संशयी स्वभावामुळे जीवनात आनंद उपभोगता येत नाही. या लोकांना यावर्षीचं ग्रहमान काय फळ देणार ते पाहू या.

यावर्षी राशीच्या षष्ठस्थानातून शनी ग्रहाचे भ्रमण होणार. आहे. पुन्हा तो नेपच्यून सारख्या ग्रहाबराबेर असणार आहे. त्यामुळे जुनी दुखणी डोके वर काढतील. रोगाचे निदान लवकर होणार नाही. औषध घेताना पारखून घ्या. पायाची दुखणी जाणवतील. ऐन परीक्षेच्या वेळी संतती आजारी पडणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते. माणसांची पारख यावर्षी तुम्हाला चांगली होणार आहे. त्यामुळे कोणाशी किती अंतर ठेवून वागायचे हे तुम्हाला बरोबर कळणार आहे. राशीच्या सप्तम आणि अष्टम स्थानातून गुरू महाराजांचे भ्रमण होणार आहे. प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील, यावर्षी थोड्या थोड्या गोष्टींसाठी रागाचा पारा चढेल. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही आयुष्यात घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल.. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. वैवाहिक जीवनात छोटी मोठी वादळे मन अस्वस्थ करतील. अशावेळी जास्तीत जास्त तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. वारा येईल तशी पाठ फिरवावी लागेल.

जानेवारी २०२३सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. तेव्हा व्यवहार करताना स्वतःचा फायदा लक्षात घेऊन व्यवहार करावे लागतील. संततीसाठी एरवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब कराल. कौटुंबिक जीवनात भावनिक पातळीवर निर्णय घ्याल. उत्साह आणि आनंदी वृत्तीमुळे सहवासातील इतर व्यक्तींनाही स्फूर्ती द्याल. प्रत्येक बाबतीत चोखंदळपणा आणि आवडीनिवडी जास्त ठेवाल. कलाकारांना आपल्यातील क्षमतेला बाव मिळेल. पराक्रम आणि प्रसिद्धी हातात हात घालून जातील. परिस्थितीचं उत्कृष्ठ निरीक्षण कराल. प्रकृतीकडे लक्ष द्या.
फेब्रुवारी २०२३स्वतःबराबर इतरांची काळजी घेण्याच्या तुमच्या स्वभावामुळे या महिन्यात तुमच्या जवळच्या लोकांचे तुमच्याशिवाय पान हलणार नाही, तुमच्याच मताशी लोकांनी सहमत व्हावे ही भूमिका घ्याल. कर्तृत्वात बाजी मारून अंतर्मुख होऊन लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्याल. कामगार वर्गाचे सहकार्य मिळणार नाही. स्थावर इस्टेटीसंबंधीचे निर्णय या महिन्यात नको. प्रेमप्रकरणात संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होईल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. घरातील तरुणांची मते पटणार नाहीत. चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर यश मिळेल.
मार्च २०२३कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवणारा ठरेल. कोणत्याही आजारासाठी औषध घेताना ते चुकीचे घेत नाही ना याची खातरजमा करावी. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल. परदेशगमनाचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळणार नाही त्यामुळे परस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पावले उचलाल. लांबणीवर पडलेली कामे मार्गी लागतील. पूर्वतयारीशिवाय कोणतीही गोष्ट न करण्याच्या गुणांचा उपयोग होईल.
एप्रिल २०२३एखाद्या गोष्टीमध्ये वाहून न जाता तटस्थपणे विश्लेषण करणे तुम्हाला चांगले जमेल. त्यामुळे तुमचा सल्ला घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील. आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामांचा फडशा पाडाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राजकारणी लोकांचा जनमानसावर प्रभाव पडेल. नोकरीमध्ये अधिकाराच्या जागेवार वर्णी लागेल. जबाबदारीची कामे अंगावर पडतील. खेळाडूंना नवीन संधी मिळतील. दूरदृष्टी ठेवल्याचा उपयोग होईल. स्त्रियांना मासिक पाळीचे त्रास संभवतात. सतत खटपट करण्याच्या स्वभावामुळे अनेक नवी कामे मार्गी लागतील.
मे २०२३कोणतेही काम करताना कष्ट, गुंतागुंत आणि उशीर तुमच्या पाचवीला पुजले आहेत की काय अशी बऱ्याचदा तुम्हाला शंका येईल. तेव्हा योजून ठेवलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळीवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याचा अनुभव घ्याल. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वत:साठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता.
जून २०२३हक्काच्या वस्तूंबाबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. नोकरी व्यवसायात सरकारी अडलेली कामे पार पडतील. महत्त्वाच्या कागदपत्रावर शिक्कामोर्तब करून घ्यावे. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. हजरजबाबीपणामुळे वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. व्यवहारात कोणाशी संगनमत करायचे हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करियरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. नवीन ऑर्डर्स हातात येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल.
जुलै २०२३तुमच्या विनयशील, मनमिळाऊ स्वभावामुळे आत्तार्यंत अडलेली कामे पूर्ण होतील. स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळण्यासाठी घरच्या लोकांना हस्तक्षेप सहन करावा लागेल. आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील. परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा मात्र रहाणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल. विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता अभ्यास करावा.
ऑगस्ट २०२३काळ, काम आणि दाम यांचे गणित जमवता जमवता वैयक्तिक जीवनात त्याचे पडसाद खोलवर उठणार आहेत. एखादा निर्णय तडकाफडकी घेण्यापासून सावधान! तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल, चित्रकार, शिल्पकारांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम काळ आहे. कोर्टकेसमध्ये मनाप्रमाणे दान पडेल. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर रहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल.
सप्टेंबर २०२३या महिन्यात तरुणांना आपला आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी उत्तम काळ आहे. घरात हलकेफुलके वातावरण राहिले तरी शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवायला लागेल. एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नाही त्या गोष्टींवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करियरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल.
ऑक्टोबर २०२३खूप दिवसांपासून रेंगाळलेले पैसे हातात पडतील. त्यामुळे छानशी खरेदीही करावीशी वाटेल. कर्ज फेडण्यासाठी आलेल्या पैशाचा उपयोग कराल., व्यवसायात एखादी नवीन संधी समोर आल्यामुळे त्या बाबतीत संशोधनात्मक पवित्रा घ्याल. यावेळी भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संततीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. ज्यांच्याकडे एखादी एजन्सी आहे. त्यांनी त्या कामामध्ये लक्ष घालावे. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ राखून ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध रहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. मर्दानी खेळात प्राविण्य मिळेल.
नोव्हेंबर २०२३लांबच्या प्रवासाचे योग आहेत. फक्त प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे आर्थिक लाभ चांगले होतील… अडथळ्याच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. त्यासाठी किती कष्ट केले याचा हिशेब करायचा नाही. तुमच्या गोड आणि हजरजबाबी बोलण्यामुळे खूप लोकाचे सहकार्य मिळेल. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. घरामध्ये तरूण वर्गाची ये जा बादल्यामुळे एक नवे चैतन्य अनुभवाल. आत्मविश्वास वाढेल. करियरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल.
डिसेंबर २०२३या महिन्यात नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून जीवनात आनंद निर्माण कराल. लेखक, कवी, पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त रहाण्याचा योग आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब, अधिकाराचे योग संभवतात. चाहने जपून चालवा, जुनी दुखणी डोके वर कातील राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. सकारात्मक विचाराने नवीन वर्षाचे स्वागत करायला सिद्ध व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: