वार्षिक राशिभविष्य २०२३ : मकर

मकर राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – मकर’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे मकर राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. चिकाटी आणि सोशिकपणाच्या जोरावर विलक्षण रितीने तुम्ही जगासमोर येता. देश तसा वेश घेतल्यामुळे तुमच्यामध्ये खूप गतीमानता असते. तुमच्या या स्वभावाचा फायदा यावर्षी तुम्हाला होणार आहे.

राशीच्या धनस्थानी तुमच्याच राशीचा स्वामी शनी स्वराशीत विराजमान असल्यामुळे यावर्षी पैसा कसा मिळेल याकडे तुमचे लक्ष जास्त राहणार आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे हे तुम्हाला यावर्षी चांगले समजणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. तुमच्या बोलण्यात कडवटपणा असूनही प्रचंड गतीशील परंतु थोडे स्वकेंद्रित असे तुमचे व्यक्तिमत्त्व राहील. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. तसेच राशीच्या तृतीय आणि चतुर्थस्थानी गुरूचे भ्रमण होणार आहे. भाग्याची साथ त्यामुळे तुम्हाला चांगली मिळणार आहे. संततीला येणाऱ्या अनेक अडचणींवर मार्ग सापडेल. संततीसौख्य मिळेल. उपासनेत प्रगती होईल. प्रकृतीस्वास्थ्यात सुधारणा झाली तरी अचानक काही तक्रारी उद्भवल्यामुळे मनःस्वास्थ्य मिळणार नाही. धंद्यामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे सुधारणा होईल. परदेशगमनाचे योग येतील. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल.

जानेवारी २०२३यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच शक्ती खर्च करावी लागेल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्याअगोदर १० वेळा विचार करावा लागेल. स्वाभिमान आणि अहंकार यातील पुसटशी लक्ष्मणरेषा ओळखली तर यश तुमचेच आहे..
फेब्रुवारी २०२३ईटका जवाब पत्थरसे देऊन दुसऱ्यावर राग धराल. परंतु याचा तुम्हालाच त्रास होईल, ज्यांना खांदे, हाताची दुखणी आहेत त्यांनी योग्यवेळी व्यायाम, औषधोपचार चालू करावेत. अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रंगाळलेली कामे उत्तरार्धात गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल.
मार्च २०२३नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले. असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. बौद्धीक बाबतीत हा महिना चांगला जाईल. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. त्यामुळे गुप्त शत्रूचे काही चालणार नाही. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला नाम ग्रहमान आहे. गुडघेदुखीचा त्रास असणारांनी काळजी ध्याची देश तसा वेष घ्याल आणि यश मिळवाल. नोकरीबदल सभवतो. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल..
एप्रिल २०२३परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. स्पष्ट बोलाल त्यामुळे काहींना ते आवडणार नाही. नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत.
मे २०२३आपण बरे नी आपले काम बरे हीच भूमिका या महिन्यात घ्याल. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता. प्रकृतीस्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. अंगची कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ रहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल.
जून २०२३व्यवसायात अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोषातून कायमचा हद्दपार कराल. स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी, निश्चय, जिद्द आणि स्थैर्य या ४ गोष्टींच्या जीवावर कामाला बरीच गती येईल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल, खांदेदुखी, गुडघेदुखी आणि पोटाचे विकार यासाठी औषधे घ्यावी लागतील. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे विचार मनात येतील आणि ते अमलातही आणाल.
जुलै २०२३प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. अशावेळी चुकते कुठे हे कळण्यासाठी त्यातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. तुमच्यातील आत्मसंयम, गांभीर्य या महिन्यात तुम्ही बाजूला ठेवाल आणि वारा येईल तशी पाठ फिरवाल. जुन्याचा बुरखा टाकून देऊन नवीन गोष्टींची कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल.
ऑगस्ट २०२३आर्थिक बाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. या काळात कामाचा डोंगर उपसाल. फक्त जवळच्या व्यक्तींवर नको एवढा विश्वास टाकू नका. वैवाहिक जीवनाचा प्रांत नाजूक आणि बिकट झालेला जाणवेल. तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळेच उत्साही आणि आनंदी वातावरण लाभेल. बऱ्याच दिवसांनी मनासारख्या घटना घडतील. दुसऱ्यांना शिकवण्याची संधी मिळेल.
सप्टेंबर २०२३दुसऱ्याची गुलामगिरी करण्याची वृत्ती नसल्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. आता विचार केला तर आपल्याला आवडेल अशी सुंदर जागा तुमच्यातील कलाकार जागा होईल. आर्थिक घडी चांगली बसण्यासाठी आवश्यक असलेला पाया या महिन्यात घातला जाईल. नोकरीत तुम्ही मन लावून केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूष होतील. प्रत्येक गोष्टीत हिशेबी वृत्ती ठेवून चालत नाही; हे या काळात कळून चुकेल. कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र लक्षात ठेवल्यास फायदा होईल.
ऑक्टोबर २०२३या महिन्यात लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. थोडेसे धूर्त, संयमितपणाबरोबरच धोरणी रहाल. काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योगप्रियतेमुळे यशाला खेचून आणाल.
नोव्हेंबर २०२३बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. नोकरी व्यवसायात मनासारखे दान पडल्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. जिद्दीने कामाला वाहून घेण्याची तुमची सवय नवीन नाही परंतु या महीन्यात अजिबातच विश्रांती मिळणार नाही. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल.
डिसेंबर २०२३तुम्ही मूळ सोशिक आहात परंतु प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. या महिन्यात नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. एकप्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कालच्या अपयशाला आजच्या सबळ प्रयत्नांची साद घालत नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा आणि नवीन उमेदीने कामाला लागा.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: