वार्षिक राशिभविष्य २०२३ : मीन

मीन राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – मीन’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे मीन राशींचे २०२३ चे संक्षिप्त राशिभविष्य पाहणार आहोत,

परिस्थितीशी जुळवून घेणे तुम्हाला चांगले जमते. संघर्ष तुम्हाला नको असतो. अनेक कामे हातात घेता. मात्र कोणत्याही कामात पूर्ण लक्ष न घातल्यामुळे मागे पडता. परंतु सर्वांना मदत करण्यासाठी कायम पुढे सरसावता. तुमच्या बा स्वभावाचा फायदा यावर्षी तुम्हाला होणार आहे.

या वर्षी मीन राशीच्या व्ययस्थानातून शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे. एखादी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करावी. आर्थिक लाभ चांगले होतील. फक्त काही अचानक खर्चाना तोंड द्यावे लागेल. समाजात वावरताना एकटं रहायला जास्त आवडेल. जुनी दुखणी डोके वर काढतील. ज्यांना संधीवात, हार्टचे त्रास आहे, त्यांनी काळजी घेणे आवश्यक. गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याला सांभाळावे लागेल. भाग्याच्या दृष्टीने ग्रहमान कसेही असले तरी त्यातील सुसंगत सूर गवसता आला पाहिजे. तुमच्याच राशीतून आणि राशीच्या धनस्थानातून गुरू ग्रहाचे भ्रमण होणार आहे. भावना, प्रेम आणि बुद्धीवाद या सर्वामध्ये ओथंबून निघालेले तुमचे शब्द लोकांच्या मनाची पकड फार चांगल्या रितीने घेतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणान्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकान्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल.

जानेवारी २०२३या महिन्यात व्यवहारापेक्षा दियाची भाषा तुम्हाला जास्त लवकर समजेल. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील. वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. त्यासाठी कर्जाऊ रक्कम मिळेल. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.
फेब्रुवारी २०२३या महिन्यात दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा स्वभाव नसला तरी थोड़ा अहंकाराचा भाग राहीलच. दुसन्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, जोडीदाराकडून बन्याच अपेक्षा पूर्ण होतील, व्यवसायात बरी उलाढाल कराल मनात नसताना प्रवासाला जावे लागे तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. तुमच्या हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडा, राजकारणी लोक आपला मुत्सरीपणा दाखवतील. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो.
मार्च २०२३या महिन्यात भक्तिमार्गाकडे वळाल संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम पाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बन्यापैकी पैसा मिळेल. प्रवास आवश्यक असेल तरच करा.
एप्रिल २०२३घरात सर्वांनी शिस्त पाळावी असं वाटेल परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्यापासून करा. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे. लागेल. कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. घरातील लोकांबाबत ‘ज्याचं करावं भलं’ हा अनुभव येणार असल्यामुळे शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. धंद्यातील कामे अंतिम टण्यावर जाऊन पोहोचतील.
मे २०२३तुम्ही पापभीरू, श्रद्धाळू असलात तरी तुमच्या विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. परंतु अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रसिद्धीचे योग येतील. राजकारणात असलेल्या व्यक्तींना समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोचावे लागेल.
जून २०२३तुमच्या अत्यंत सौम्य आणि गरीब स्वभावामुळे त्याचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल.
जुलै २०२३या महिन्यात तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी कोणताही निर्णय न घेता ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा, नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा. आर्थिक लाभ मिळतील त्यासाठी संबंधीत व्यक्तीशी संपर्क साधल्यास कामे मार्गी लागतील. प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. मुलांसाठी जरा जास्त लक्ष द्यावे लागे. दोन पिढ्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल.
ऑगस्ट २०२३या महिन्यात थोडे ऐषारामी जीवन जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहेच्छूना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो. ज्यांना मधुमेह, सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी पथ्यपाणी सांभाळावे. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल.
सप्टेंबर २०२३इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टींचा उगाचच विचार करीत रहाल. अध्यात्मिक उन्नती साधाल. तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही एका हेलपाट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट काम घ्यावे लागतील. त्वचारोग, पायाची दुखणी त्रास देतील… व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल.
ऑक्टोबर २०२३या महिन्यात घरातील मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. कारण नसताना काळजी करण्याचा स्वभाव बनेल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. परंतु खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. तुमच्या अंगच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश येईल.. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत.
नोव्हेंबर २०२३नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. जुनी येणी वसूल होतील. हातात पैसा येईल.
डिसेंबर २०२३नोकरी व्यवसायात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती या महिन्यात पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. कलाकार आणि खेळाडूना चांगल्या संधी निर्माण होतील. हाताखालच्या व्यक्तीकडून चांगले काम करून घेण्यावर भर राहील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: