भावकीतील विकृती …

आमची भावकी चांगली आहे असे म्हणणारे फार दुर्मिळ नालायक भावकी कोणाचीच नाही, असे म्हणणारे खूप आहेत…., खरेच आपल्याच रक्ता मासांची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत..? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे.

अनेक पिढ्या, घरेदारे, मोठमोठी घराणी यात भूईसपाट झाल्याचा इतिहास आहे, मराठा साम्राज्याचे पतन यामुळेच होत चालले आहे. गद्दाराच्यामुळे शहाजीराजे, शिवराय, शंभूराय यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत, पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला आहे. ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत, थोडक्यात यातून कोणाचीच सुटका होत नाही,

कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व दडलेला असतो, त्याचा मत व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो. आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद… यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमी पहीला राहीला आहे. त्यात एखाद्या अर्धवटाकडे चार रूपये आले की लगेच माज येतो अवगुण दाखवतो, लावा लाव्या करतो अरेरावीची उध्दटपणाची भाषा करतो, अर्धवट मेन्दू असेल तर वाटोळेच.

उत्पन्नाचा किती भाग आज समाज यावर खर्च करतोय, अल्प असलेल्या आयुष्यात किती वेळ सत्कारणी लागतोय, आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय..? हे प्रश्न जरी स्वतःला आपण दररोज विचारले आहे…. तरी आपल्यात बदल होऊ शकतो, भावकीला बदलवणे सर्व धर्मातील रथी महारथी, सत्ताधीश यांना जमले नाही, आपल्यालाही ते जमणार नाही. बदल स्वतःत केला पाहीजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका, आणि थोरले असाल तर माफ करायला शिका. आमचे सहकारी पत्रकार अविनाश देशमुख यांनी या विषयावर केले असलेले लिखाण देखिल महत्त्वाचे ठरते आहे ते म्हणतात की..

कितीही भांडा,
प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा, भावकीच्या खांद्यावरच होणार..

भावकीशी बोलताना शक्यतो प्रतिक्रिया टाळा, त्यांनी खोडी काढली तर प्रतिशोध टाळा, सर्वात महत्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि दुसऱ्या कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर मात्र ऐकून घेऊ नका आणि सहनही करू नका. त्यांनी साद घातली तर प्रतिसाद द्यायला विसरू नका, भावकीच्या यशाचे मन आणि तोंडभरून खरे कौतुक करायची सवय लावून घ्या. अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतः होऊन पुढे करा, कारण भावकी मेली तरी  भावकीच्या पुढे मदतीसाठी हात पसरत नाही, तो हात आपणहून समोर केला तर त्याच्यासारखे दुसरे समाधान नाही, हे सर्व खूप अवघड आहे, पण आजच्या काळात खूप

भावकीच्या भांडणात ‘देव’ ही हरला आहे, तो जिंकला असता तर महाभारत घडलेच नसते, भावकीतील वाद संपवणे हे देवापेक्षा मोठे काम आहे, म्हणतात ना… आग विझविणाराच्या यादीत नाव राहिल, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. म्हणूनच आमच्या पूर्वजांनी संस्कृतीने अंत्ययात्रेसाठी चार पैकी दोन ते तीन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे… बघा काय सुधरायला जमतेय का..?

गरजेचे आहे, कारण आपण सर्वजण खूप अडचणीत आणि संकटात आहेत, आमच्यासारखी जातो, कारण भावकीतील व्यक्तीला आणि हेच आपल्या हातात आहे. प्रतीहल्ला टाळा, त्यांच्या क्रियेला आहोत, या क्रियेने एकवेळ भावकीची साथ नाही मिळाली तरी चालेल, पण भावकीचा त्रास वाचला तरी हे थोडे नाही, कारण आयुष्यातील निम्मी शक्ती, संपत्ती आणि बहुमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे. सुधारायचे असेल तर ही शक्ती, संपत्ती आणि वेळ सत्कारणी लावता आला पाहीजे.

(संकलन: टीम स्पंदन, साभार: लेखक/कवी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: