गुरु ग्रह राशी परिवर्तन
गुरु ग्रह राशी परिवर्तन
दिनांक: २२ एप्रिल २०२३
वार: शनिवार
सकाळी– ५:३८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करेल.
गुरु ग्रह १ मे २०२४ पर्यंत मेष राशीतच राहील .

आपल्या राशीला कोणता गुरु आहे ?
मेष — १
वृषभ — १२
मिथुन — ११
कर्क — १०
सिंह — ९
कन्या — ८
तूळ — ७
वृश्चिक — ६
धनु — ५
मकर — ४
कुंभ — ३
मीन — २
ज्या राशींना गुरु २, ५, ७, ९, ११ आहे, त्यांना शुभ फळं प्राप्त होईल.
ज्या राशींना गुरु १, ३, ६, ११ आहे, त्यांना मध्यम म्हणजेच मिश्र फळ प्राप्त होईल.
ज्या राशींना ( वृषभ १२, कन्या ८, मकर ४) गुरु ४, ८, १२ आहे, त्यांना अनिष्ट फळ प्राप्त होईल.
त्यांनी गुरुचा जप, शांती करावी. त्यायोगे संकटाचे निवारण होईल.
वृषभ, कन्या, मकर या राशीच्या मुला-मुलींचे विवाह २२ एप्रिल २०२३ ते १ मे २०२४ या १३ महिन्यांच्या कालावधीत करावयाचे असेल तर त्यांना गुरु जप करावा लागेल.
श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा यांची भक्ती करावी. गाईला केळी, हरभरा डाळ खायला द्यावी.
केळीच्या झाडाजवळ हरभरा डाळ अर्पण करावी.
गुरुवारी पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे.
गुरु स्तोत्र, गुरु मंत्र रोज म्हणावा.
ओम ब्रुम बृहस्पतये नमः हा मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.