Category Archives: ऐतिहासिक

सरसेनापती हंबीरराव मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा काल म्हणजेच, १६ डिसेंबरला स्मृतिदिन. त्या निमित्ताने…

हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने ‘बाजी’ हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पाहावयास मिळते.

स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते शहाजीराजेंच्या लष्करात होते. ते पुढे कर्नाटकला गेले. त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छ. राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजींचे अगदी जवळचे घराणे झाले. यातील संभाजी मोहितेंचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले.

शहाजीराजांचे भोसले घराणे म्हणजे कर्तबगार. भोसले घराण्याशी आपले संबंध जुळावेत म्हणून प्रांतातील अनेक मराठी घराणी उत्सुक असत आणि त्या काळी भोसले घराण्याशी सोयरीक करणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानीत असत. त्यापैकीच एक घराणे म्हणजे मोहिते घराणे होय. स्वराज्यस्थापनेच्या पूर्वी मोहिते घराण्यातील अनेक पुरुषांनी आपल्या कर्तबगार घराण्याला साजेशी अशी कामगिरी करून दाखवत घराण्याचा नावलौकिक वाढवला होता आणि पुढे छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासामध्येदेखील मोहिते घराण्यातील वीरांनी आपले कर्तृत्व गाजवून हा वसा पुढे चालवला.

मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला, जेव्हा संभाजी व धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. शहाजीराजांसोबत त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले होते. यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीरराव मोहिते होय.

संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या एका नात्यात बांधले गेले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनीदेखील आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र छ. राजाराम महाराजांशी लावून दिला आणि सोयरीक अधिक घट्ट केली. हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घरण्याचा वारसा लाभला होता. आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणतेही संकट असेना, त्याला निधड्या छातीने सामोरे जाणे हाच ते आपला धर्म मानीत असत.

प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खानाविरुद्धच्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले, त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांनी स्वत:हून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सैन्याचा पराभव केला. त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापराव गुजरांसारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून छ. शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली. सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला. अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे ते पहिले सरसेनापती!

हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात भवानी मातेसमोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखानासोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय. या लढाईत त्यांनी सहा तासांत ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर चांदणीच्या आकाराचे सहा शिक्के आढळतात. त्या काळात छ. शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे बोलले जाते. म्हणजे एखाद्या मावळ्याने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले, तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक शिक्का उमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या तलवारीवर सहा शिक्के आहेत. असा पराक्रम अन्य कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही.

राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी वाढली होती. शत्रू सैन्य चहूबाजूंनी टपून बसले होते. अशा वेळी हंबीरराव मोहितेंसारख्या खंद्या सेनापतीने आपल्या महाराजांना पदोपदी साथ दिली.

हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांना. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेंच्या सैन्याने त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूर, वरकडपर्यंत मजल मारीत प्रत्येक मुघलाला हाकलून दिले. दिवसागणिक त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत होता. शत्रू सैन्य हंबीररावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागले. इकडे मुघलांसोबत आदिलशाहीलादेखील त्यांनी जबरदस्त दणका दिला. कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला त्यांनी स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणले.

सरसेनापतीचे पद स्वीकारल्यापासून क्षणाचीही उसंत न घेता, मोहिमांवर मोहिमा काढून हंबीरराव चहूबाजूंना स्वराज्याची पताका फडकावीत होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. स्वराज्य पोरके झाले. शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याची धुरा थोरले पुत्र संभाजी महाराजांकडे येणार होती. परंतु दरबारातील एका गटाने छ. संभाजी महाराजांना गादीवर न बसवता छ. राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट घातला; पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र छ. संभाजी महाराजांना पाठिंबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे छ. संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले.

संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर, त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले. या काळात त्यांनी केलेली बुऱ्हाणपुरची लूट महत्त्वाची मानली जाते. तो विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. या विजयामुळे मुघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला.

रामशेजच्या किल्ल्याची लढाई इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती. यानंतरही मुघल सरदार कुलीचखान, रहुल्लाखान व बहादूरखान आणि शहाजादा आझम यांनादेखील स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना हंबीरराव मोहिते यांनी पराक्रमाची शर्थ केली.

हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार सर्जाखानविरुद्धची लढाई होय. या लढाईतदेखील आपल्या कर्तृत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून १६ डिसेंबर १६६७ रोजी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा; पण त्यांनी आपला अमूल्य हिरा मात्र गमावला.

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते. आपल्या सेनापतीपदाला साजेशी कामगिरी करून दाखवीत, शेवटच्या श्वासापर्यंत लढून हंबीररावांनी छ. शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या श्रीमंत छत्रपती महाराणी ताराराणी यांनीही आपल्या पित्याप्रमाणेच इतिहासात आपले नाव अजरामर केले.

स्वराज्याच्या या सरसेनापतीस स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!

डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

काही अर्थपूर्ण ऐतिहासिक छायाचित्रे

१) राजर्षी शाहू महाराजांचे एक दुर्मिळ छायाचित्र:

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांची पत्नी डॉ. सविता आंबेडकर, त्याचा नोकर सुदामा आणि पाळलेला कुत्रा:

३) ताजमहाल चे इतिहासातील सर्वात प्रथम घेतलेले छायाचित्र:

छायाचित्रकार : डॉ. जॉन मुरे, ईस्ट इंडिया कंपनी, इ.स. १८५०

४) सिकंदर बाग पॅलेसचे अवशेष आणि त्याच्यासमोर १८५७च्या उठतील सैनिकांचे सापळे, इ.स.१८५८:

५) मुलींची राजस्थानमधील शाळा, इ.स.१८७०:

६) रेल्वे इंजिन, दार्जिलिंग, इ.स.१८८०:

७) बंगलोर पॅलेस, इ.स.१८९०:

८) चारमिनार, हैदराबाद, इ.स. १९००:

९) भारतीय सैनिकाला हात मिळवताना एक फ्रँच मुलगा , पाहिले महायद्ध , ३०/०९/१९१४ :

१०) राबिंद्रानाथ टागोर आणि अल्बर्ट आईनस्टाईन, इ.स.१९२०:

११) मद्रास (आजचे चेन्नई) रेल्वे स्टेशन, इ.स.१९२५:

१२) भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि बाकीच्यांना मृत्यूची शिक्षा दिल्याचा पोस्टर, इ.स.१९३० :

१३) सर सी. वि. रमण त्यांच्या विद्यार्थ्यांना ‘रमण परिणाम’ शिकवताना, इ.स.१९३०:

१४) हावडा ब्रिजचे बांधकाम, इ.स.१९३०:

१५) एक तरुण भारतीय १९३०च्या आंदोलनात सहभागी होताना, मुंबई :

१६) झेब्रा गाडी, कलकत्ता, इ.स.१९३०:

१७)ग्रेट गामा आणि त्याचा यय इमाम बक्ष ह्यांची लाल किल्लासमोरील कुस्तीची स्पर्धा, इ.स.१९४०:

१८) तीन महान व्यक्ती सर मॉरिस गॉर, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन् शांतिनिकेतन मध्ये:

१९) नेताजी सुभाषचंद्र बोस आणि एडॉल्फ हिटलर हात मिळवताना, बर्लिन, इ.स.१९४२:

२०) नेताजी सुभाषचंद्र बोस पोलीस कास्टडीमध्ये जाताना (ह्यानंतर त्यांना कोणीच पकडू शकले नाही):

२१) संविधान समितीचा पहिला दिवस, ०९/१२/१९४६ :

२२) लॉर्ड माउंट बॅटन आणि जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेताना, १५/०८/१९४७:

२३) ग्रंथालयात होणारी भारत-पाक पुस्तकांची होणारी फाळणी, इ.स.१९४७:

२४) दुसऱ्या महायुद्धात C-46 विमानात शस्त्र चढवताना केलेला हत्तीचा वापर, भारत:

२५) डॉ. राजेंद्रप्रसाद आणि राष्ट्रपती सुरक्षारक्षक, चांदणी चौक:

२६) आकाश पाळणा , वाराणसी, इ.स. १९६० :

२७) इंदिरा गांधी, चार्ली चॅप्लिन आणि जवाहरलाल नेहरू ह्यांचा स्वित्झर्लंडमधील फोटो इ.स.१९५३ :

२८) जयपूरच्या महाराणी गायत्री देवी त्यांच्या लग्नाच्या दिवशी :

२९) प्रथम Digital Computer जवाहरलाल नेहरूंना दाखवताना प्रो. म. स. नरसिंह आणि डॉ. होमी भाभा, Tata Institute of Fundamental Research :

धन्यवाद.

स्वराज्य आणि रामराज्य..

श्री शिवछत्रपतींच्या इतिहासात अनेक लेखकांना त्यांच्या स्वमताला अनुकूल असणारे मत शोधायचा ध्यास लागलेला असतो. विविध हेतू ठेऊन निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय संघटना स्वत:चे मत हे समाजमत म्हणून मान्यता पावले जावे म्हणून शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये अक्षम्य ढवळाढवळ करतात. जदुनाथ सरकारांना तर शिवछत्रपतींच्या इतिहासाची खोली ही राजकीय सत्ते बरोबर सांस्कृतिक सत्तेपर्यंत होती हे उमगले नाही. कॉ शरद पाटील, गोविंद पानसरेंना शिवछत्रपतींच्या इतिहासात निव्वळ साम्यवाद दिसला. राजवाड्यानी इतिहासमांडणीआडून वर्णव्यवस्थेच्या पाठराखणीची हौस भागवून घेतली.

मूळात शिवछत्रपतींच्या अधीन असलेल्या मध्ययुगाच्या बाबतीत एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कि तत्कालीन भक्तीमार्ग आणि संप्रदायाशी तत्कालीन समाज एकरुप झाला होता. वारकरी, भागवत संप्रदायाची अध्यात्मिक चळवळ ही त्यांच्या परमोच्च बिंदू वर होती. त्याच भक्तीमार्गांशी तादात्म पावलेल्या देवता श्रीरामश्रीकृष्ण ह्यांचा पगडा लोकमानसावर असणे अगदीच साहजिकच होते. परमानंदाने जो शिवभारत ग्रंथ शिवछत्रपतींची थोरवी सादर करण्यात लिहिला त्याचं ऐतिहासिक दृष्ट्या महत्व थोर आहे ह्या शिवभारताचं नाव “अनुपुराणे सुर्यवंशम “असे येते. महाराजांचा वंशवेल हा प्रभू रामचंद्रां पर्यंत जातो हि धारणा तत्कालीन समाजात होती. परमानंदाने शिवभारताच्या दहाव्या अध्याया मध्ये श्लोक क्रमांक ३४ ते ४० च्या दरम्यान महाराजांनी अध्ययन केलेल्या ज्या शास्त्र ग्रंथांची यादी दिली आहे त्यात श्रुति,स्मृती ह्या बरोबरच रामायणाचा उल्लेख स्वतंत्र रित्या केला आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की तत्कालिन हिंदू समाज व्यवस्थेत राजा म्हणून श्री रामचंद्राची क्षत्रिय दिनचर्या आदर्श होती.

अज्ञातदासाच्या पोवाड्यात जी लोककला मानली जाते त्यात जेधे आणि बांदलांच्या बाबतीत अंगद आणि हनुमंताची उपमा येऊन शिवछत्रपती साक्षात प्रभू रामचंद्रांच्या ठायी आहेत. वनवासासाठी निघताना भरताला गादीवर बसवा म्हणणारे जसे प्रभू रामचंद्र दिसतात तसेच ह्याच पोवाड्यात उमाजीस म्हणजे महाराजांच्या पुतण्यास गादीवर बसवा असा थेट उल्लेख आहे. रामायणातला भ्रातृभाव आपल्याला शिवछत्रपतींच्या इतिहासात स्पष्ट दिसतो. व्यंकोजीराजांसोबत झालेल्या संघर्षात महाराजांची बाजू न्याय असताना महाराज पराभूत झालेल्या व्यंकोजीराजांबाबत रघुनापंतांना लिहितात.’व्यंकोजीराजे आपले धाकटे बंधू आहेत. मूलबुद्धी केली, त्यास तोही आपला भाऊ, त्यास रक्षणे, त्याचे राज्य बुडवू नका” महाराजांनी रामायण आत्मसात केलं ते असं आणि रामायण सांगण्यावर नंतर अधिकार गाजवणारे रामाचं रघुनाथ नाव धारण करू राहत्या घरात पुतण्याला ठार मारणारे पेशवाईत निपजले हा सुद्धा इतिहासच.

स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला असलेल्या “सुवेळा “व “संजिवनी” माची ही रामायणाशी अंतर्धान पावणारी नावे ही परंपरा इथेच न थांबता रायगडाच्या “कुशावर्ता” पर्यंत जाते हे विशेष. राजगडी पालथे निपजलेले ‘रामराजे” हे शिवछत्रपतींच्या श्रीराम आस्थेचा आविष्कार. समर्थांच्या रामदासी संप्रदायाला महाराजांनी कायम आस्था दाखवली मग ती चाफळ च्या मठाला दिलेली सनद असेल अथवा आपली लष्करी ठाणी आश्रमासाठी रामदासी मंडळींना बहाल करणे असेल. महाराष्ट्रात खासा औरंगजेब उतरला तेव्हा ह्या संप्रदायाला तंजावरकर भोसलेंनी राजाश्रय दिला. पुढे जाऊन तर भोसले कुलोत्पन्न नागपूरकरांनी आपले कुलदैवत प्रभू रामचंद्र म्हणून स्विकारले.
महाराष्ट्रात आजही बाळाच्या बारश्याला राम, कृष्णाच्या बरोबरीने शिवछत्रपतींचा पाळणा गायला जातो. दंडकारण्यात श्री भवानी प्रभू रामचंद्रास वर देऊन रामवरदायनी झाली. त्याच वरदायनीला बत्तीस दाताच्या बोकडाचा बळी देणारे महत्तम मर्यादा पुरूषोत्तम श्री शिवछत्रपती मराठ्यांच्या काळजावर कोरलेत ते त्यांच्या “रामराज्य स्वराज्या” मुळे..

सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख,
बारा मावळ परिवार.

हनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :

१) सर्वशक्‍तीमान
जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे.
२) भुते आणि मारुति : –
सगळ्या देवतांमध्ये केवळ मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते आणि तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.
३) महापराक्रमी : –
राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्‍चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले – ‘वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.’ हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य विरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरि आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.
४) बुद्धीमान :-
मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा ? मित्रांनो, जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. आजपासून आपणही मारुतिसारखी भक्ती करून बुद्धीमान होऊया !
५) भक्‍त: –
दास्यभक्‍तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अद्याप मारुतीच्या रामभक्‍तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व आणि ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचे मिश्रण ! हनुमान म्हणजे भक्‍ती आणि शक्‍ती यांचा संगम !
६) अखंड सावधता आणि साधना : –
युद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची.
७) मानसशास्त्रात निपुण आणि राजकारणपटू :-
अनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामानेही याचा समादेश (सल्ला) मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता मारुतीने ‘त्याला घ्यावे’, असे सांगितले आणि रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वतःच्या (रामाच्या) आगमनाविषयी भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठवणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता आणि मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्‍वास डळमळीत केला.
८) जितेंद्रिय : –
मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो; पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही.
९) संगीतशास्त्राचा प्रवर्तक : –
मारुतीला संगीत-शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध साहाय्यभूत असावा. त्याला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे शिवाचे एक रूप आहे. मारुति हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला; म्हणून शिवाला संगीताचा कर्ता समजतात. मारुतीच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.
१०) नवसाला पावणारा : –
हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात. ‘लग्न न होणार्‍या कुमारिकेने ब्रह्मचारी मारुतीची उपासना करावी’, असे जे सांगितले जाते, त्याचे काही जणांना आश्‍चर्य वाटते. ‘कुमारिकेच्या मनात ‘बलदंड पुरुष नवरा म्हणून मिळावा’, अशी इच्छा असते आणि म्हणून ती मारुतीची उपासना करते’, असेही काही जण चुकीचे सांगतात; पण त्याची खरी कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
११) चिरंजीव : – प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात, तेव्हा ते तेच असतात; मात्र मारुति प्रत्येक अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजिवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात आणि त्यांचे स्थान अतिशय उन्नत असे सात जण घेतात.