Tag Archives: inspirational quotes in marathi with images

०६.०२ आजचा विचार

तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते तर तुमचं वागणं तुमचे संस्कार…

०५.०२ आजचा विचार

उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असते
माणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…

०३.०१ आजचा विचार

आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होत नसतात काहींशी तडजोड ही करावीच लागते.. 🎯

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

०२.०१ आजचा विचार

आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात..

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

२८.१२ आजचा विचार

कुणासाठी स्वतःला इतकंही विसरू नये की जगण्याचे खरे अर्थच बदलून जातील. शेवटी तुमच्यापासून दुरावलेली व्यक्ती देखील स्वतःच असं नशीब घेऊन जन्माला आलेली असते. तिचा तुमच्या आयुष्यातला शेअर संपला की ती निघून जाते.जी माणसं अधिक सोबत राहतात त्याच्याशी तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध अधिक काळासाठी ठरलेले असतात इतकच पण शेवटचा प्रवास हा आपला आपल्यालाच एकट्याने करायचा असतो.
एकूणच जीवनाचा एकांगी विचार करणं सोडायला हवं…सहवासात येणारी काही माणसं हवीहवीशी असूनही वेगळी होतात कारण तुमच्या पलीकडे त्यांचं प्राक्तन इतर अनेकांशी जोडलेलं असतं. त्यांच्याही जगण्याचा परीघ आखलेला असतो…. आपण फक्त आपल्या पुरताच विचार करतो आणि दुःखी होतो…
कठीण आहे पण तरीही थोडी अध्यात्मिक विचारसरणी अनुसरावी ज्यायोगे मनाला पोळणारी वेदनेची झळ थोडी कमी त्रासदायक होऊन आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल..

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)