वास्तू टिप्स – कलर

वास्तू रंगांचा लोकांवर महत्त्वपूर्ण मानसिक प्रभाव असतो हे एक सत्यापित झालेले सत्य आहे. घर ही अशी जागा आहे जिथे एखादी व्यक्ती आपल्या जीवनाचा मोठा काळ घालवते. म्हणूनच, ताजेतवाने वाटण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी घरामध्ये वास्तू रंगांचे योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.

 • प्रत्येक रंगाचा मानवी शरीरावर, मनावर, मेंदूवर आणि अध्यात्मिक आयुष्यावर प्रभाव पडत असतो. जर रंगांचा वास्तूत योग्यप्रकारे वापर केला तर ते आपल्या वास्तूतील दोष कमी करू शकतात.
 • जर आपण आपल्या घरात तीन वर्षातून एकदा रंगकाम केल तर त्याचे उत्तम परिणाम पहावयास मिळतात. आता जे नवीन रंग बाजारात आलेले आहेत (टेफ्लोन रंग) ते नवीन पद्धतीनुसार बनवलेले असतात व ते घरात अशांतता निर्माण करतात.
 • नवीन रंग हा घराला नवीन दृष्टी देतो तसेच घरातील विचारसरणी, आरोग्य व वास्तुनिष्ठ्तेमध्ये सुधारणा घडवून आणतो.
 • आपल्या घरातील दिशेनुसार कोणता रंग द्यावा त्याबद्दल माहितीपुढीलप्रमाणे दिलेली आहे,
  • उत्तर आणि दक्षिण दिशेला आकर्षक रंगानी रंगवावे.
  • दक्षिण आणि पश्चिम दिशा या चमकदार रंगानी रंगवाव्या.
  • घराला कधीच फिकट रंगानी रंगवू नये. ते आपल्या घरात तणाव निर्माण करतात.
  • उत्तर, ईशान्य, पूर्व या दिशेच्या भिंतीना आकर्षक रंग द्यावा. उदा. पांढरा, फिकट पांढरा, नैसर्गिक रंग
  • दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या भिंतीना पिवळा, क्रीम, डार्क क्रीम, वेणीला असे रंग द्यावे.
  • पश्चिम आणि वायव्य दिशेच्या भिंतीना निळा, फिकट पांढरा, चांदी रंग असे आकर्षक रंग द्यावेत.
  • दक्षिणेकडच्या खिडक्यांसाठी तुम्ही पिवळ्या काचांचा वापर करू शकता.
  • पश्चिमेच्या खिडक्यांसाठी तुम्ही निळ्या काचांचा वापर करू शकता.
  • उत्तर व ईशान्य दिशेच्या खिडक्यांसाठी पारदर्शी काचांचा वापर करू शकता.

वास्तूनुसार भिंतींचे रंग:

खोलीवास्तू नुसार सुचवलेले रंगवास्तू नुसार टाळण्यायोग्य  रंग
मुख्य शयनकक्षनिळालाल रंगाच्या गडद छटा
पाहुण्यांसाठी खोलीपांढरालाल रंगाच्या गडद छटा
ड्रोइंगरूम /दिवाणखानापांढरागडद रंग
जेवणाची खोलीहिरवा, निळा किंवा पिवळाराखाडी
सीलिंगपांढरा किंवा ऑफ-व्हाइटकाळा आणि राखाडी
लहान मुलांची खोलीपांढरागडद निळा किंवा लाल
स्वयंपाकघरनारंगी किंवा लालगडद राखाडी, निळा, तपकिरी आणि काळा
स्नानगृहपांढराकोणत्याही रंगाच्या गडद छटा
हॉलपिवळा किंवा पांढरागडद रंगातील कोणताही रंग
पुजेची खोलीपिवळालाल
घराचे बाह्यरूपपिवळसर पांढरा, ऑफ व्हाईट, हलका जांभळाकाळा
मुख्य दरवाजा/प्रवेशद्वारपांढरा, चंदेरी किंवा लाकडी छटाचे रंगलाल, गडद पिवळा
अभासिकाहलका हिरवा, निळा, क्रीम किंवा पांढरातपकिरी, राखाडी
बाल्कनी/व्हरांडानिळा, क्रीम, गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या हलक्या छटाराखाडी, काळा
गॅरेजपांढरा, पिवळा, निळाकाळा, तपकिरी
जिनापांढरा, बेज, तपकिरी, हलका राखाडी, फिकट निळालाल आणि काळा

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: