वास्तू टिप्स – दिशा

आपले घर हे केवळ चार भिंतींची इमारत नसून दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्या जीवाला विसावा देणारी अशी वास्तू असते. घर बांधताना किंवा खरेदी करताना ते वास्तूशास्त्रानुसार आहे का? तसेच घराची सजावट करीत असताना वास्तूसाठी शुभ असणाऱ्या वस्तूंचा घरामध्ये आवर्जून समावेश करण्याबाबत आपण जागरूक असले पाहिजे कारण घरामधील वातावरण प्रसन्न असावे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असावा, घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अस्वास्थ्य, ताणतणाव, आरोग्याशी संबंधित तक्रारी असू नयेत, आर्थिक सुबत्ता नांदावी यासाठी वास्तूशास्त्रानुसार घराची रचना असणे अगत्याचे आहे. पण अनेकदा घाई-घाई मध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे घरामध्ये वास्तुदोष असेल तर अशा वास्तूत नकारात्मक वातावरणाचे संचरण होऊन घरामध्ये सतत लहान मोठ्या अडचणी, आर्थिक नुकसान, तब्येतीच्या तक्रारी उद्भवू लागतात.

अशा समस्या टाळण्यासाठी घराची रचना करताना वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या दिशांचे महत्व समजून घेतले पाहिजे. या लेखात वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करताना विविध दिशांचे काय महत्व आहे, तिथे काय असायला हवे आणि जर वास्तुदोष उत्पन्न होणार असेल तर काय करायला हवे हे स्पष्ट केलेले आहे,

 • पूर्व:
  • पूर्व दिशा ही उगवती दिशा असून या दिशेचा स्वामी किंवा प्रमुख देवता इंद्र आहे.
  • पूर्वाभिमुख वास्तुमुळे सूर्याची किरणे रोज घरात येऊन वातावरणातील सूक्ष्म जीवजंतूचा नायनाट होतो. तसेच ईश्वराची कृपा होते.
  • आपल्या वास्तूमध्ये रोजचे रोज सूर्य प्रकाश येणे फार गरजेचे आहे.
  • सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये डी जीवनसत्व असते.
  • या दिशेला मुख्य द्वार आले तर उत्कर्षकारक मानले जाते.

 • पश्चिम:
  • पश्चिम दिशेचा स्वामी वरून आहे.
  • वरुणादीविहीत देवता म्हणजे पाऊस.
  • या वरुनाबरोबरच इतर ९ देवतांचा वास या दिशेला मुख्य द्वार आले असता जीवन समाधानी राहते.

 • उत्तर:
  • लक्ष्मीचा भाऊ कुबेर याची हि दिशा असुन उत्तराभिमुख वस्तू असेल तर भरभराट होते.
  • कुबेरासमवेत असणाऱ्या ७ देवता याही शुभ फलदायी आहेत.
  • त्यामुळे उत्तराभिमुख वास्तू भरभराटीस येते.

 • दक्षिण:
  • दक्षिण दिशा ही महत्वाच्या कामांना निषिद्ध मानली जाते.
  • या दिशेची देवता आहे यम. यमदेव हे मृत्यूचे देवता आहेत.
  • दक्षिणेला कधीही दिव्याचे दिव्याचे तोंड केले जात नाही.
  • जेव्हा कोणी मृत्यू पावतात तेव्हा दक्षिणेला तोंड करून दिवा लावतात म्हणजे दिव्याची वात दक्षिणेला असते.
  • दिवाळीच्या एका दिवशी यमदीपनाचा दिवस असतो.या दिवशी घरातील सौभाग्यवतीने दक्षिणेला कणीकेचा दिवा व दोन मुटके करावेत. दक्षिणेला वात करून यमाची पूजा करावी. संपूर्ण वर्षात एकदाच यमाचे पूजन करतात.
  • दक्षिणेलगतच्या इतर सात देवता असुन शुभकार्याकरिता या दिशेस मान्यता नाही पण सौंदर्य प्रसाधने, सुवर्ण अलंकार, कोळसा,टायरचे व्यवसाययासारखे व्यवसाय दक्षिणेस भरभराटीस येतात.

 • आग्नेय:
  • पूर्व दिशा आणि दक्षिण,दिशेच्या मध्ये कोन्यात आग्नेय दिशा असते.
  • अग्नी हि या दिशेची देवता आहे.
  • आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर असावे किचन ओटा,पूर्वेस तोंड करून असावा.
  • स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात गस किंवा चूल असावी.
  • हॉलच्या आग्नेयस मुख्य दरवाजा असेल तर घरात विनाकारण कटकटी होतात पण त्या किरकोळ असतात.

 • ईशान्य:
  • ईशान्य दिशेचा स्वामी देवता ईश्वर आहे.
  • हि दिशा पवित्र दिशा आहे. या दिशेला कोणतेही पवित्र कार्य करावे.
  • अपवित्र कामासाठी या दिशेचा वापर करू नये.
  • ईश म्हणजे ईश्वर आणि ईशान्य म्हणजे देवतांचे वास्तव्य असणारे घर

 • नैऋत्य:
  • दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्यातील दिशा नैऋत्य दिशा असते.
  • पुतनाराक्षणीस हि या देशची देवता आहे. या दिशेला प्रमुख द्वार कधीही नसावे. चोऱ्या होतात.
  • नैऋत्य दिशेला शुभ कार्ये करू नयेत. हि दिशा अडगळ आणि जड वस्तूंनी भरावी.
  • नैऋत्य दिशेला या व्यतिरिक्त काहीही नको.

 • वायव्य:
  • वायव्य या नावातच आपणास वायुदेवतेचा उद्बोध होतो. हि प्राणवायू निर्माणकर्ती दिशा मानली जाते.
  • या दिशेला मोठी खिडकी असणे आवश्यकआहे.
  • वायव्य दिशा भिंतीने, पडद्याने, पार्टीशन किंवा मोठी झाडे लाऊन अडवल्यासत्याचे अशुभ परिणाम मिळतात.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: