वास्तू टिप्स – लक्ष्मीप्राप्ती

हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन-संपत्तीची देवता मानली जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला पैशाची आणि अन्नाची कधीच कमतरता भासत नाही. प्रत्येकाला भरपूर पैसे कमवायचे असतात आणि सर्व सुख-सुविधा मिळाव्यात असे वाटत असते. यासाठी कष्टासोबतच लोक विविध उपायांचा अवलंब करतात.

असे मानले जाते की माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय व्यक्ती धन कमवू शकत नाही. जिथे माता लक्ष्मीचा वास असतो तिथे सदैव सुख-समृद्धी राहते. तसेच अशा व्यक्तीला संपत्तीची कधीही कमतरता नसते. घरात लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही उपाय,

  • घरातून कामानिमित्त बाहेर पडताना थोडेतरी पैसे शर्टाच्या वरच्या खिश्यात ठेवावेतच. मोकळ्या खिशाने बाहेर पडू नये.
  • बाहेरून घरात येताना काहीतरी वस्तू घरात आणावी (विकत अनु नये) रिकाम्या हाताने अनु नये. मग झाडाचे पान आणले तरी चालेल.
  • शुक्रवारी गुलाबाचे फुल विकत आणावे. लाल रंगाचे मिळाले तर उत्तमच. मग नव्या कोऱ्या लाल कपड्यात गुंडाळून कापतात किंवा गल्ल्यात ठेवावे. असे सलग ८ शुक्रवार करावे. ९ व्या शुक्रवारी ती सर्व सुकलेली फुले कापडासहित संध्याकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी.
  • पौर्णिमेपासून रोज श्रीसुक्त वाचावे.
  • कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन करावे. अभिषेक व पूजा करावी.
  • रोज सकाळी स्नानानंतर श्रीलक्ष्मी कवचाचा एक पाठ म्हणावा.
  • आपल्या घराजवळील देवाच्या देवळात जाऊन आपल्या पत्नीच्या हस्ते फुलाची वेणी किंवा गजरा देवीला अर्पण करावा. असे चार शुक्रवार करावे.
  • दर शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. असे अकरा शनिवार करावे.
  • घरात बासरी टांगावी.
  • मुंग्यांना साखरमिश्रीत कणीक खायला द्यावी.
  • रोज नाष्टा करण्यापूर्वी घर झाडून घ्यावे.
  • पांढर्या वस्तूचे दान केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्ना होते.
  • घरात संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: