वास्तूशास्र – लिविंग रूम (हॉल)

  • हॉल वास्तुच्या पश्चिमेला किंवा पुर्वेलगत असावा किंवा उत्तरे लगतही असणे उत्तम ठरते. अर्थात हॉलला पूर्व किंवा उत्तरेला दर असावे.
  • वस्तूच्या नियमानुसार दक्षिण व पश्चिम बाजू फर्निचर शोकेसने युक्त असाव्यात.
  • घरातील प्रामुख्याने बसण्यासाठी नेहमी दक्षिणेला पाठ करावी.
  • उत्तर किंवा पूर्व दिशा कर्त्याने पहावी. कर्त्या पुरुषाची एक खुर्ची कायम फिक्स असावी,त्यावर इतरांनी बसू नये.
  • दूरदर्शन संच आग्नेय कोपऱ्यात ठेवावा. दूरध्वनी पूर्व भिंतीला किंवा पश्चिम किंवा उत्तर भिंतीला लागून मधोमध ठेवावा.
  • देवदेवतांचे भारंभार फोटो हॉलमध्ये नसावेत. हिंस्त्र प्राण्याची चित्र किंवा रडकी किंवा जीवन उदध्वस्त झालेली चित्रेही नसावीत महाभारताची चित्रे, युद्धाची चित्रे अजिबात लावू नये.
  • भिंतीवरचा फिरता पंखा किंवा कूलर वायव्येस असावे.
  • हॉलमधून वरच्या मजल्यावर जाणारा जिना तसेच तो वाकडा-तिरपा, तिरपा जिना नसावा.
  • कित्येक ठिकाणी उजव्या सोंडेचे आणि उभे किंवा तांडव करीत असलेल्या रुपातले गणपती ब्रांझ किंवा बीड या धातूपासून बनवलेले दिसून येतात तर या मूर्ती घरादाराच्या नाशास कारणीभूत होतात.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

हेही वाचा,

%d bloggers like this: