
मेष राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ‘ओळख राशींची – मेष’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे मेष राशींचे संक्षिप्त वर्णन आणि शास्त्र संमत सल्ले/तोडगे पाहणार आहोत,
‘मेष’ ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नी तत्त्वाची व रजोगुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ही पुरुष रास आहे. तसेच अल्पप्रसव व चररास आहे. मेंढय़ाप्रमाणे लढऊपणाने व निकराने कोणत्याही प्रसंगात टक्कर घेण्याचा आपला स्वभाव आहे. आपण शूर व करारी आहात. स्वातंत्र्याचे भोक्ते आहात. त्यामुळे कोणाच्याही हाताखाली चाकरी करणे आपल्याला नापसंत असते. प्रत्येक क्षेत्रात बाणेदारपणे, तडफदारपणे व आत्मविश्वासाने काम करण्याचा आपला स्वभाव आहे.
आपला स्वभाव कडक असतो. तापट असतो. काहीवेळा फटकळही असतो. दुस-यावर वर्चस्व गाजविण्यात आपल्याला आनंद वाटतो. नमते घेणे, माघार घेणे आपल्या स्वभावात नसते. आपल्याला चटकन संताप येतो. आपण थोडेसे भांडखोर असता. मात्र आपल्याकडे चिकाटी आहे.
मेष राशींसाठी काही सल्ले/उपाय:
- मंगळवारी पिंपळच्या झाडाच्या बुंध्यात ‘ ओम अश्वत्थाय नमो नमः ‘ या मंत्राने पांढरे तीळ युक्त दुध सोडावे.
- रोज रात्री झोपताना नवनाथ भक्तिसार कथा संग्रहातील पाचवा अध्याय वाचवा.
- दर मंगळवारी हातापायची नखे काढून पुरचुंडी बांधून घरबाहेर टाकावी. तसेच दर मंगळवारी पक्षांना मसूर डाळ टाकावी व गाईला गुळ टाकावा.
- तांब्याचे कुबेर यंत्र लाल फडक्यात गुंडाळून पैसे ठेवण्याच्या कपाटात ठेवावे.
- रोजच्या रोज पिंपळाला पाणी घालवे.
- ओम एं क्लीं सौ: या मंत्राचा नियमित जप करावा.
- श्री गणेशाची उपासना करावी. दर मंगळवारी गणपतीस लाल फुल वाहून त्याचे दर्शन घावे.
- श्री मारुतीचे दर्शन घावे.
मेष रास थोडक्यात:
आद्याक्षरे | चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ |
स्वरूप | ‘मेंढा’ हे तिचे स्वरूप आहे. |
अधिपती (स्वामी) | आपल्या राशीचा स्वामी मंगळ हा आहे. |
निवासस्थाने | धातू व रत्ने ह्यांच्या खाणी ज्यात आहेत असा प्रदेश हे मेष राशीचे निवासस्थान सांगितले आहे. |
रंग | मेष राशीचा रंग रक्तासारखा लाल आहे. |
गुण | हि रास रजोगुणी आहे. |
अवयव | शरीरातील ‘शीर’ (डोके) या अवयवावर हिचा अंमल चालतो. |
द्रवे | वस्त्रे इत्यादी द्रवे मेष राशीच्या अंमलाखाली येतात. |
गुणधर्म | मेशरास हि अग्नितात्वाची असून शरीर विषयक ऐहिक सुखोपभोग प्रवृत्ती असणारी राशी आहे. सुवर्ण ह्स्वदेही असून अल्प-प्रसव रास आहे. रात्री बली असून पूर्व दिशेचे स्वामित्व हिच्याकडे आहे. मेष हि धातुसंद्यांक रास आहे. सुवार्णापासून मृतीक्केपार्यंत सर्व पदार्थ हे धातुसंधक आहेत. |
साडेसातीचा काल | मेष राशीला मीन, मेष,व वृषभ या तीन राशीत शनीचे भ्रमण चालू असताना साडेसाती असते. त्यापैकी मेष राशीतील शनीचे भ्रमण म्हणजे अडीच वर्षे जास्त त्रासदायक जातात. |
स्त्री पुरुष तत्व | मेष रास हि पुरुषत्वाची रास आहे. |
स्वभाव वर्णन | मेष रास हि ‘चर’ तत्वाची रास आहे. |
वर्ण | ‘क्षत्रिय’ वर्ण आहे. |
नक्षत्र | या राशीमध्ये अश्विनी, भरणी, आणि कृतिका नक्षत्राचे पहिले चरण येते. मेष हि मंगळाची स्वगृहाराशी असून ‘रवि’ या राशीत उच्चीचा होतो. स्वगृहाचे व उच्चीचे ग्रह बलवान असतात. म्हणजेच मेष राशीत मंगल आणि रवि उत्तम फळे देतात. नीच राशीतील ग्रह अशुभ फळे निर्माण करतात. मेष राशीत शनि नीचेचा होतो. मुलत्रिकोण राशीत ग्रह बलवान होतो. मंगळाची मेष मूलत्रिकोण रास आहे. स्वगृह राशीतून सातव्या राशीत ग्रह निर्बली होतात. शुक्र मेष राशीत अस्तंगत, पराजित होतो. |
आवडता महिना | चैत्र महिना व वसंत ऋतू मेष राशीला आवडतो. |
(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)