स्वप्न पडत नाहीत असा माणूस भूतलावर सापडणे अशक्य आहे. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हटले जाते. हे जरी खरे असले तरी काही स्वप्ने सूचक असतात व भविष्यात घडणाऱ्या गोष्टी स्पष्ट करतात असे आपले शास्त्र सांगते. पण बऱ्याच वेळा आपल्याला त्या स्वप्नांचे संकेत समजत नाहीत. प्राचीन ऋषीमुनींनी सखोल अभ्यास करून स्वप्नांचे अर्थ स्पष्ट केलेले आहेत. रात्री १ ते २ च्या दरम्यान पडलेली स्वप्ने ६ महिन्यात साकार होतात. रात्री तीन ते चारच्या दरम्यान पडलेली स्वप्ने ३ महिन्यात पूर्ण होतात. व ४ ते ५ मध्ये पडलेली स्वप्ने लगेच पूर्ण होतात. म्हणूनच म्हणता कि पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात.
स्वप्नांवरून भविष्यकाळातील घटनांचा अंदाज येऊ शकतो. हि स्वप्ने शुभसूचक किंवा अशुभसूचक असतात. असे सांगितले आहे कि अशुभ स्वप्ने पडल्यास नंतर जागे राहू नये पुन्हा झोपावे,त्यामुळे त्या स्वप्नापासून मिळणाऱ्या अशुभ फळांची तीव्रता कमी होते.शुभ स्वप्न पडल्यानंतर झोप लागत नसेल तर जबरदस्तीने झोपण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे शुभ स्वप्नांची फळे मिळत नाहीत अशी धारणा आहे.चारही वेदांमध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये, पुराणामध्ये स्वप्न आणि त्याचे विविध अर्थ स्पष्ट केले आहेत. भृगु संहितेत स्वप्नांचे विविध संकेत तपशीलवार स्पष्ट केलेले आहेत.
शुभ स्वप्न:
- स्वप्नात जर आपण श्रीसत्यनारायणाची पूजा करत आहोत, तीर्थयात्रा करीत आहोत किंवा दत्तगुरूंची, हनुमंताची, किंवा शिवलिंगाचे दर्शन घेत आहोत असे दिसेल तर ते स्वप्न शुभसूचक समजावे. फायदा होतो, हातातील कार्यात यश मिळते.
- स्वप्नात जर आपली चांगली फळे, गोड पदार्थ किंवा दुधभात खात आहोत असे दिसले तर शुभ फळे मिळतात.
- स्वप्नामध्ये घर पडून टाकले आहे किंवा दरवाजा काढून मार्ग मोकळा केला आहे असे दिसल्यास व्यक्ती संकटमुक्त होतो.
- स्वप्नात स्वत:ला मृत पहिले असता चिंतामुक्त होतो तर स्वत:ला वृद्ध पहिले तर आदरसत्कार होतो.
- जर स्वप्नात आपली जमीन उत्तम पिकांनी भरलेली पहिली किंवा आपल्या परसात विहिरी,फुलांची-फळांची झाडे पाहणे हे सर्वथा यशाचे, भाग्याचे लक्षण आहे.
- स्वप्नात आपण जहाजात बसलेलो आहोत व दूरवर दिवे दिसतात त्याचे पुढील आयुष्य सुखात जाते.
- स्वप्नामध्ये पतंग उडवित आहोत किंवा स्वतः उडत आहोत असे दिसले तर यश, मान याचा लाभ होतो.
- मृत माणसाबरोबर आपण स्वप्नात बोलताना दिसले तर प्रसिद्धी मिळते आणि नुसतीच दिसली तर धनलाभ होतो.
- स्वप्नामध्ये नोकरीचा राजीनामा दिलेला दिसला तर नोकरीत प्रगती होते.
- स्वप्नात पाहत किंवा सूर्योदय पाहिले असता उत्तम आरोग्यदायी होते.
अशुभ स्वप्ने:
- स्वप्नात म्हैस, रेडा किंवा उंदीर, काळ्या तोंडाचा वानर, डुक्कर दिसले असता अशुभ असते. आजारपण येते.
- स्वप्नात आपण धर्मशाळेत राहिलेले पाहिल्यास दारिद्र्य येते.
- स्वप्नात आपण दिवा लावत आहोत आणि तो वारंवार विझत आहे असे दिसल्यास संकट कोसळणार हे नक्की.
- स्वप्नात घराचे छप्पर जळताना दिसल्यास अशुभ असते. घरातील चीजवस्तूंची मोठ्या प्रमाणात चोरी होते.
- स्वप्नात पितळ, पितळेची भांडी पहिली तर विश्वासघात होतो. लोखंड पहिले तर दारिद्र्य येते आणि शिसे पहिले तर कुटुंबात कलह निर्माण होतो.
- स्वप्नात आपण ऊस खात आहोत असे पहिले तर धनहानी होईल.
- स्वप्नात वाळलेले फूल पहिले अगर त्याचा वास घेताना पहिले तर कार्य पूर्ण होत नाही.
- स्वप्नात भूत दिसले तर कायद्याचे संकट येणार.
- स्वप्नात नरक पहिले असता अशुभ असते.
- स्वप्नात नदीत पडलेले पहिले तर लवकरच आपण कारस्थानी शत्रूच्या तावडीत सापडणार हे नक्की.
- स्वप्नात आपण स्मशानात भोजन केलेले पहिले तर दारिद्र्य येते.
(संकलन: स्पंदन टीम, साभार)