वास्तू टिप्स – वृषभ रास

वृषभ राशींबद्दल सविस्तर विवेचन आम्ही ओळख राशींची – वृषभ’ या लेखामध्ये केलेले आहे. जर आपण यावर भेट दिली नसल्यास अवश्य द्या. आज आपण येथे वृषभ राशींचे संक्षिप्त वर्णन आणि शास्त्र संमत सल्ले/तोडगे पाहणार आहोत,

वृषभ ही राशी चक्रातील दुसरी रास आहे. धष्टपुष्ट बैल ही या राशीची आकृती आहे. भरपूर ताकद व शक्ती, धिमा व शांत; परंतु खवळला तर उग्र असे सामान्यत: बैलाचे स्वरूप असते. ही पृथ्वी तत्त्वाची व शुक्राच्या अंमलाखालील रास आहे. ही अर्थ तत्त्वाची, बहुप्रसव व स्त्री राशी आहे.
आपले पाय जमिनीवर स्थिर असतात. व्यवसाय, नोकरी, जागा वरचेवर न बदलण्याचा आपला स्वभाव असतो. मैत्रीला व शब्दाला आपण पक्के असता. श्रद्धा व निष्ठा या बाबतीत आपण कमालीचे तत्त्वप्रधान असता. अनुयायी म्हणून आपली रास अत्यंत चांगली असते. आपल्या नेत्याला आपण आपली निष्ठा अर्पण केलेली असते. त्यामध्ये अस्थिरपणा नसतो. घेतलेल्या निर्णयाला चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो.

आपण सहनशील व सोशिक आहात. गोड, आर्जवी व प्रिय बोलण्यामुळे आपण सर्वाना हवेहवेसे असता. शुक्र या ग्रहाचा अंमल आपल्या राशीवर असल्याने आपणाकडे एक प्रकारची आकर्षण शक्ती असते. आपल्याकडे विनयशीलता, नम्रता व प्रेमळपणा हे गुण असतात. आपण रसिक आहात. साहित्य, कला, संगीत, नाटय़, चित्रपट यांची आपणास विशेष आवड असते.

वृषभ राशींसाठी काही सल्ले/उपाय:

 • सोमवारी बेलाची पाने आणून सावलीत सुकवावीत. नंतर गाईच्या दुधात हे चूर्ण मळावे व रोज त्याचा तिलक करावा. याने सर्वजण वश होऊन आपले काम सिद्ध होशील, पण कोणास फसवणूक करण्याकरिता याचा वापर करू नये.
 • ११ प्रदोष उपवास करून शंकराचे पिंडीवर अभिषेक करावा.
 • तिथीनुसार आपल्या वाढदिवसाच्या आपले जेवढे वय पूर्ण झाले तेवढे तुपाचे शंकराच्या पिंडीसमोर लावावेत व निम्मे दिवे नंदिसमोर लावावेत.
 • दर शुक्रवारी लिंबाच्या किवा कडुलिंबाच्या झाडास न चुकता पाणी घालावे.
 • आपल्या ऐपतीनुसार तांब्याचा कलश घेऊन त्यात गाईचे तूप भरावे. त्यात सोन्याचा मणी घालावा व हे पात्र ब्राम्हणास किवा मंदिरात दान करावे.
 • देवीच्या मंदिरात जाऊन तेथील हळदी-कुंकू पुडीत बांधून जवळ ठेवावं.
 • ओम एं क्लीं श्री: या मंत्राचा नियमित जप करावा.
 • आचरण शुद्ध ठेवावे व व्यसनापासून दूर राहावे.
 • घरामध्ये पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले असलेल रोप लावावे.
 • शुक्रवारी किवा मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरावी, असे पाच शुक्रवार किवा मंगळवार करावे.
 • गरजू सुवासिनी स्त्रीस आर्थिक मदत करावी.
 • बहिणींचा मानसन्मान करावा.

वृषभ रास थोडक्यात:

आद्याक्षरेइ, उ, ओ, वा, वी, वू, वे, वो
स्वरूप‘बैल’ हे तिचे स्वरूप आहे.
अधिपती (स्वामी)आपल्या राशीचा स्वामी शुक्र हा आहे.
निवासस्थानेगुरांचे वाडे, पठार, शेतजमिनी व अरण्य हि वृषभ राशीची निवासस्थाने सांगितली आहेत.
रंगवृषभ राशीचा रंग गोरा आहे.
गुणहि रास रजोगुणी आहे.
अवयवशरीरातील मुख या अवयवावर हिचा अंमल चालतो.
द्रवेतांदूळ इत्यादी खरीपाची धान्ये वृषभ राशीच्या अंमलाखाली येतात.
गुणधर्मवृषभ ही रास पृथ्वीतत्वाची रास असून शरीर विषयक ऐहिक सुखोपभोगाकडे प्रवृत्ती असणारी राशी आहे. ह्स्वदेही असून बहुप्रसव राशी आहे. वृषभ ही मूलसंज्ञक रास आहे. वृक्षापासून तृणापर्यंत चे सर्व पदार्थ हे मूलसंज्ञक होत.
साडेसातीचा कालवृषभ राशीला मेष, वृषभ, मिथुन, राशीत शनीचे परिभ्रमण होत असता साडेसाती असते. त्यापैकी मेष राशीतले शनीचे परिभ्रमण म्हणजेच पहिली अडीच वर्ष त्रासदायक जातात.
स्त्री पुरुष तत्ववृषभ रास ही स्त्री-तत्वाची रास आहे.
स्वभाव वर्णनवृषभ रास ही ‘स्थिर’तत्वाची रास आहे.
वर्ण‘वैश्य’ वर्ण आहे.
नक्षत्रया राशी मध्ये कृत्तिकेचे तीन चरण, रोहिणी आणि मृग नक्षत्राचे दोन चरण येतात.
वृषभ हि शुक्राची स्वगृह्राशी असून चंद्र ,राहू या राशीत उच्चीचा होतो. स्वग्रहाचे व उच्चीचे ग्रह बलवान असतात. म्हणजेच वृषभ राशीत शुक्र,चंद्र,राहू उत्तम फळे देतात. तिचे राशीतील ग्रह अशुभ फळे निर्माण करतात. वृषभ राशीत नीच होतो. मूलत्रिकोण राशीत ग्रह बलवान होतो. चंद्राची वृषभ हि मूलत्रिकोण रास आहे. स्वगृह राशीपासून सातव्या राशीत ग्रह निर्बली होतात. मंगळ वृषभ राशीत पराजित होतो.
आवडता महिनावैशाख महिना व वसंत आणि ग्रीष्म ऋतू वृषभ राशील आवडतो.

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

%d bloggers like this: