वास्तू टिप्स – पाण्याची टाकी

  • पाण्याची टाकी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात असावी.
  • जमिनीत असेल तरीही आणि घराच्या वर असेल तरीही ईशान्य कोपरा पाण्यासाठी महत्वाचा आहे.
  • पाण्याचे बोअरिंग ईशान्य कोपऱ्यात असावे. इथल्या टाकीचे पाणी संडासासाठी वापरू नये.
  • पिणे किंवा स्नानासाठी किंवा चांगल्या कामाच्या वापरासाठीच याचा वापर करावा.कारण पूर्वेकडून येणारी किरणे या पाण्यात शोषली जाऊन त्यामध्ये पावित्र्य येते.
  • दक्षिणेला किंवा नैऋत्यला पाण्याची टाकी असल्यास त्यामध्ये अपवित्र आत्मे आणि वाईट शक्ति शोषल्या जातात.
  • वास्तूच्या मधोमध पाण्याच्या टाकीने ब्रह्म वास्तू जड करू नये.
  • पाण्याची टाकी हि पांढऱ्या रंगाची नसावी.
  • काळी किंवा निळ्या रंगाची टाकी चालेल. कारण किरण शोषणे आवश्यक आहे आणि पांढरा रंग परावर्तन करतो.
  • संडासावर पिण्याची टाकी असू नये.
  • पाण्याची टाकी गळकी नसावी.
%d bloggers like this: